Рет қаралды 1,861
Lyrics - Ashwini Shende Bagwadkar
Music Composition - Nihar Shembekar
Singers - Sharvari Deshpande & Nihar Shembekar
Music Production - Shark a.k.a Shardul Sakhale
Pianica, Keys, Bass Guitar - Shardul Sakhale a.k.a Shark
Ethnic Percussion - Nihar Shembekar
Flute - Vijay Tambe
ती: पायाखाली मखमल अलगद येणार
घालमेल जीवाची येता जाता होणार
तो: साथ मी देईन गं सोबती होईन
वेचेन उन्हे पायातली सावली होऊन
ती: मन ज्याचे कस्तुरी
तो: हो माझी अस्तुरी
ती: कुणा एका राजाचा हात धरणार..
राणी मी होणार
तो: राणी तू होणार
ती: राणी मी होणार
अंतरा -
ती:
दरवळे सुख जसे
माळला मोगरा..
विरघळे दु:ख जसे
साखर पाण्यात
राजाच्या सोबतीने
राणी सूर लावते
उमलून हसू येई
संसार गाण्यात
होऊन आभाळ करेल तो सांभाळ
अश्या एका नभाचा मी हात धरणार
राणी मी होणार राणी मी होणार
अंतरा -
तो:
ताल तुझे चाल माझी
जुळे न गाण्याची..
सोबत ही अशी कशी
चंचल पा-याची
कसा धरू हात तुझा
पुसू कसे डोळे
फुंकर मी घालेन गं
झुळूक वा-याची
सुकलेल्या आशेचा पाऊस मी होणार
तुझा राजा होऊनी मी मिरवणार
राणी तू होणार राणी तू होणार