याला म्हणतात खरी संस्कृती अन् आपलेपणा, नाहीतर आमच्यात गॅस, मिक्सर, कूकर तरीपण पोळ्याला १२ वाजतयत, अन् सण कमी अन् एकमेकींच्या साड्या, दागिने, अन् मोठेपणा याचीच चर्चा... सलाम तुमच्या संस्कृती अन् एकत्रित कुटुंब पद्धतीला...❤🙏🙏
@varshabhosale3017 Жыл бұрын
खूप छान. शहरात काही स्त्रिया गावापेक्षा कितीतरी पटीने कमी असलेल्या घरगुती कामांसाठी कामात मदतीसाठी आपल्या सासूकडून अपेक्षा करतात आणि नाही केल्यास भांडणे करतात ,अशा वयस्कर व्यक्तींच्या शारीरिक क्षमतैचाही विचार करत नाहीत आज जास्त कमं असल्याने तुमच्या सासूबाईंनी स्वतःहून मदत केली असावी अस वाटत .खरच ताई तुम्ही दोघी खुप छान आहात तुम्ही एवढ्या कष्टातही तुम्ही दोघी बहिणीसारख्या जावा तुमच्या सासुबाईंना कामं सांगत नाहीत आणि खूप गोडीने सासु-सासर्यासोबत वागता. || श्रीगणेशाचा🌸🌸 ||👏👏भरपूर आशीर्वाद तुमच्या एकत्रित सुखी समाधानी कुटुंबावर नेहमी असू देत. तुम्ही सर्व नेहमी असेच हसत आनंदात आयुष्य जगा😢🙏🙏🙏 मकरसंक्रांतीच्या तुम्हा संपूर्ण कुटुंबाला खूप खूप भुभेच्छा
@shekharmane1336 Жыл бұрын
ना कसला बाऊ ना कसली तक्रार.. खुप काही शिकण्यासारखे आहे यांच्या कडून, सगळे सण वार आनंदाने साजरे करतात, एवढे प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा... सुख अजुन ते काय... ❤❤
@mangeshghag8916 Жыл бұрын
उन वारा थंडी पाऊस अंगाखांद्यावर घेऊन सर्व हिंदू सण उत्सव, संस्कृती मनापासून जतन करता.... धन्य धन्य तुमचे कष्ट .... छत्रपतींच्या महाराष्ट्रातुन मानाचा मुजरा तुम्हाला
@vandanakamble713 Жыл бұрын
युट्यूबची हिरॉईन बानाई मानलं पाहिजे तीच्या कष्टाला व्हिडिओ मध्ये फक्त कामकाम
@poonamnanaware4635 Жыл бұрын
मी तुमचा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहिला. मी मेंढपाळ समाजाच्या वस्तीवर गेली वीस वर्षे शिक्षिकेची नोकरी करत आहे. यांचे जीवन मी जवळून पाहिले आहे. त्यामुळे तुम्ही यांचे जीवन जगासमोर आणत आहात, याचा खूप अभिमान वाटतोय. 👍👍
@TulashiramKalamkar Жыл бұрын
खूपच कष्टाळू आणि सुगरण बाणाई. खूप दिवसांनी येळवणी शब्द ऐकायला मिळाला. दादा आणि आई पण आहेत. खा पुरणपोळी आता मस्तपैकी.
@sonalisasane7552 Жыл бұрын
खरंच वहिनी तुम्ही एवढी थंडी असून देखील उठलात व पुरणपोळीचा स्वयंपाक केला धन्य आहे माऊली तुम्ही खरंच बाणाई नाव तुम्हाला शोभते मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्व परिवारांना
@Pratibha_Biraris Жыл бұрын
दादा आजच्या इतक्या थंडीत पण बानाईंनी मस्तपैकी पुरणपोळी केली ❤😋😋 तुम्हाला सर्वांना मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
@manishapatil3137 Жыл бұрын
बानाईचा चेहरा सदा आनंदी असतो❤ मकर संक्रांतीच्या शुभेच्छा!!
@ashashinde88387 ай бұрын
सौभाग्य लेणं कुंकू लावून छान आईनी सुनांना आशिर्वाद दिलं आईवडील देव आहेत आणि त्या चा आदरतिथ्य करणं सून आणि मुलाचं कर्तव्य आहे हे तूम्ही काती साधे पनान दाखवून समाजाला बोध देता
@dipalipatwardhan2024 Жыл бұрын
कमीत कमी साधनामध्ये उत्कृष्ठ, खरा सण तुम्हीच साजरा केलात, बाणाई च्या पोळ्या सुरेख, बांगड्या भरून बायका खुश, थोडक्यात मजा कशी करावी हे तुमच्याकडून शिकण्यासारखे
@Appel123-si7qt Жыл бұрын
आई आणि दादा खरच तुमची सांवली च आहेत ❤🙏
@rameshnarayankale3735 Жыл бұрын
इतक्या प्रचंड थंडीत भल्या पहाटे उठून आमच्यासाठी आपण व्हिडिओ तयार केला याचे कौतुक करावे तितके कमीच आहे. पुरण पोळीचा स्वयंपाक एकदम भारीच झाला आहे. रानावनात कुठेही असाल तिथे सर्व सण समारंभ आवर्जून करत असता जे शहरात राहून लोकांना करता येत नाहीत. आणि जमत नाहीं.अभिमान वाटतो हाके कुटुंबीयांचा. जय मल्हार जय अहिल्या
@sweetsanyu2401 Жыл бұрын
लग्न होऊन पाच वर्षे झाली पाच वेळा मकर संक्रांत झालीव्हिडिओ घेतले सगळं झालं पण तुमची मकर संक्रांत पाहून आमची मकर संक्रांत कुठेतरी वाटते किती सुंदर पद्धतीने
@notoriousbella1875 Жыл бұрын
आज जेवण पूरनपोळी बांगड्यांचा कार्यक्रम संक्रांतीचा ववसा त्या चोघी किती उत्साहित होत्या आनंदी होत्या खूप छान
@sandhyapawar4589 Жыл бұрын
खरच किती हाल सहन करून पण सगळे सण साजरे करतात, अगदी पारंपारीक पध्दतीने. खूप कौतुक
@SuchitaChopdekar-vy2ww Жыл бұрын
अखंड चुडेमंडीत सौभाग्यवतीभव बाणाईवहिनी❤ तुम्ही साक्षात शिवगौरी आहात.
बाणाईची स्वच्छता लय भारी अस मजेशी जीवन खूप छान अशी मजा शहरात - नसते
@SmilingGorge-zz8dq2 ай бұрын
1 no zali puranpoli banai tai ❤❤😊😊😊
@Anuradha-s7oАй бұрын
आपले सण उत्सव केवढ्या उत्साहानं साजरे krtay खरचं खूप कौतुक आहे उन पाऊस थंडी वारा kshichich पर्वा न करता आनंदात उत्साहात राहता Hats of you
@ashakadam1351 Жыл бұрын
अतिशय सुंदर आणि भारी जेवन बनवला 💘💘👌👌👌👌👌
@shamashinde497110 ай бұрын
Banai sunbai khup chhan..
@surekhasankpal667911 күн бұрын
बानाई सगळ्या टिप्स सांगते काहीही लपवत नाही.सलाम तुला बनाई🫡🫡❤❤❤
@sunandasuryavanshi5334 Жыл бұрын
❤ खूप छान सुगरण आहे बानाई ताई.... किती थंडी वारा आहे....पण तिच्या चेहऱ्यावर थोडं ही.... तक्रार नाही किती छान पिशवी तीन वस्तू ठेवते.... काढून पदार्थ तयार करते खरच.... खूप आनंदी आहे ताई.... अशीच सदैव आनंदी राहो आरोग्य दाई... राहो ह्याच... शुभेच्छा
@deepalipatil446410 ай бұрын
Khupch Sundar 😊
@anitawaingankar6785 Жыл бұрын
खूप चांगल्या पद्धतीने संक्रांत साजरी केली खूपचं छान
@deepikabhosale87439 ай бұрын
सिद्धू दादासाहेब आणि बाणाई तुमचा फिरता राजवाडा खरच खूप सुंदर असतो. आयुष्याभर असेच मजेत आनंदात रहा .नांदा सौख्यभरे..!!
@suchitrajadhav688714 күн бұрын
Makarsankranti cha khoop khoop shubecha.
@poojapatade3694 Жыл бұрын
ताई तुमच्या कडून खूप काही शिकण्यासारखे आहे अगदी सगळे सण आनंदाने मनापासून साजरे करता किती मेहनती आहात
@ddurga2017 Жыл бұрын
बाणांनी ताई तुझी एसी जगात कुठेही मिळणार नाही इतकी भारी आहे
@vaishalitribhuvan-km7sh Жыл бұрын
खरंच किती कष्ट तरीही किती आनंदी पुरण पोळी खुप छान 😊
@LaxmiK-e8u6 ай бұрын
Bahuth achha hai, sisters, God bless you, All 🌷👌
@shailadhuri5338 Жыл бұрын
छान प्रकारे पूरणपोळीची रेसिपी झाली व येळवणी सुद्धा छान झाली 😊😊
@pradipbadhe6710 Жыл бұрын
सण,आनंद साजरा करायला परिस्थिती आडवी येत नसते याच उत्तम उदाहरण म्हणजे तुम्ही🎉💐
@reemamankar7596 Жыл бұрын
खूप छान बनवल्या पुरणपोळ्या
@Rajashree-s7n Жыл бұрын
Khup swach ani khup chan rahatat doghi pan
@vijayadhamdhere7944 Жыл бұрын
वहिनीसाहेब.. अगदी मनापासून तुमच कौतुक करते.एवढ्या थंडीत पहाटे ऊठून नवी साडी नेसून आईसाहेब, छोट्या वहिनीसाहेब आणि तुम्ही मिळून छान पुरणपोळी केलीत, बांगड्या भरल्या,ओवसा केलात.. खुप भारी वाटल बघून.. किती उत्साह, किती आनंद..❤
@Anuradha-s7oАй бұрын
भाव तेथे देव हा भाव मनात असेल तर तो भगवंत प्रसन्न का नाही होणार खूप छान व्हिडिओ
@neelamambekar250211 ай бұрын
Waa khupch chan mastach ekmekanna madat karatat
@pratibhapawar5025 Жыл бұрын
Khupch Chan vatly pahun God bless you Happy Makar sankranti 👌👌👍👍🙏🙏🌹🌹👏👏
@shekharwaghmare577 Жыл бұрын
दादा सर्व सण तुम्ही पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात त्यासाठी सलाम🙏
बाणाई ताई तुमच्या सासूबाई खूप समजून घेणाऱ्या आणि प्रेमळ आहेत❤️
@nitinkavankar3045 Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ . मस्त सण साजरा करतात तुम्ही माझा आली
@prashantpuranik255610 ай бұрын
या आधुनिक जीवनात माणूस सकाळपासून रात्रीपर्यंत पैसा का. कमावण्यासाठी धावत आहे. मात्र या सर्वांपासुन दुर असलेला हा धनगर समाज आपल्या परंपरा जपत निसर्गात खरे आयुष्य जगत आहे. छोट्या छोट्या कृतींमध्ये सुख वाटत आहे. त्यांच्या या आयुष्याला सलाम.
काय बोलायचं!! किती मनापासून सगळे धार्मिक कार्यक्रम करता. शहरात सगळे विसरायला लागलेत. तुम्ही संस्कृती जपता. बाळू मामांचा तुम्हा सर्वांना खूप आशीर्वाद असणार आणि हीच प्रार्थना त्यांच्यापाशी करते. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!! 🌹🙏👌👌👌🙌❤️
@alkathorat9924 Жыл бұрын
उदंड आयुष्य लाभो हीच सद्गुरू चरणी प्रार्थना तुम्हा सर्वांना तुम्हा सर्वांना माझा नमस्कार
@prashantjagtap2154 Жыл бұрын
बानाई तुम्ही शांत मनाने आनंदाने हसत मुखाने सर्व पदार्थ छान च करता
@shriswamisamartharts7359 Жыл бұрын
दादा खर सांगू, आम्हला येवढं सुख असून अजून कशाची तरी कमी च राहत. पण thumch जीवन जगणं bagetlyavr खूप छान वाटत.अस वाटत आपण पण अस जीवन जगावं.. खूपच छान.दादा आणि वहिनी तुमचा परिवाराला मकर संक्रांतीचा खूप खूप शुभेच्छा
@deepmalashinde3332 Жыл бұрын
Makar sankraanti chya shubhechchha🙏 sundar Suryodaya barobar banaie cha ruchkar swayampak👍👍 dada 👌👌vedeio👍👍
@swatikamhatre9432 Жыл бұрын
Kiti chhan soondar
@mahanandabhangare3989 Жыл бұрын
Khupach chan, happy Sankranti
@virajhake4636 Жыл бұрын
लय भारी व्हिडिओ 👌👌👍👍
@clt-f Жыл бұрын
मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा.🎉🎉 आम्ही लहान गावाला असताना आपल्या सनांच्या दिवशी आई कधी पुरण पोळ्या बनवायला सुरुवात करते, याची वाटचं बघत असायचो. पण आज या सिमेंटच्या जंगलात तो आनंद हरवूनच गेला. एवढे कष्ट सहन करुन सुद्धा किती समाधानी,सुखी. या भौतिक सुखाच्या मागे धावून आज मी तो आनंद गमावून बसलो आहे. आरोग्य हिच खरी संपत्ती आहे , दवाखान्यात admit झाल्यावर कळले. आज पुष्कळ कमावले आहे, पण ती आरोग्य संपत्ती गमावली आहे.
@pushpadeshpande1573 Жыл бұрын
उन्हात पावसात आनंदानी सर्व सण साजरे करता त्यात भोगी मकरसंक्रांत साजरी केली पुरुषांना पोटभर जेवायला घालून शेजारीनी बरोबर वसा हळद कुंकू तिळगुळ एकमेकींना देऊन सण साजरा केलात खुप कौतुक आजी बानाई अर्चना शेजारी यांचे
@vishalmestry3746 Жыл бұрын
संपूर्ण हाके कुटुंबाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा
@rupalisupekar8301 Жыл бұрын
बाणाई गुलाबी थंडी पडली असे म्हणुन विनोद करते.कारण उघड्या माळरानावर स्वेटर न घालता हसत स्वयंपाक करणारी गृहीणी. तेही दररोज. 🙏
@radhajadhav6327 Жыл бұрын
आई-बाबा बिराड आले तर घर भरल्यासारखं वाटतं म्हाताऱ्या माणसाशिवाय घरात मज्जाच नाही सागर खुप खुश आहे
@mehandi_by_shreyu._ Жыл бұрын
Shree swami Samarth❤ संपूर्ण कुटुंबाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा❤🎉
@raneusha11 ай бұрын
रामाचा ओवसा, सीताचा ओवासा जलम जलम ओवस💐🙏🏾👍❤️ बाणाई, अर्चना, लाडूबाई आणि आई रामाचा ओवसा, सीताचा ओवासा जलम जलम ओवस💐🙏🏾👍❤️
@ranikate8937 Жыл бұрын
खरच ह्या समाजात माया प्रेम आपुलकी आजही खुप पहायला मिळते हे बघून समाधान वाटते
@kisansharma3783 Жыл бұрын
Tum cya sarv privarala makar sankranti cya hardik shubecha til good ghya goad goad bola 🎉🎉❤❤❤,, 🙏🙏🏻
Aaichi sadi lay bhari ahe nauvari ❤❤padravar mast mor ahet..
@seemabhosle152 Жыл бұрын
Mast sajri Keli sankart,,tumhala sarvana makar sankratichya khup shubhechha
@jitendrainamke64611 ай бұрын
खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृती आपण जपत आहात. मानल तुम्हाला.👏
@latahole56317 ай бұрын
खूप सुंदर बाणाई तुम्ही किती निर्मळ आहात खूप छान 👌👌❤️
@mohinibhalekar123 Жыл бұрын
बानाई आमटी छान, बनवली पोळ्या पण छान
@shakuntalaambhore2468 Жыл бұрын
💐मकर संक्रांत निमित्त हार्दिक शुभेच्छा, तिळ व गुळ प्रतिक आहे स्नेहाचे असेच नाते रहावे सदैव सर्वा चे ❤🙏💐 सागर ला गोड पापा आई व बाबा यांना नमस्कार 🙏 बाणाई हाके दादा व अर्चना किसन दादा,मामा सगळ्यांना मकर संक्रांत निमित्त हार्दिक शुभेच्छा
@swarupakulkarniofficial Жыл бұрын
किती आनंद आहे चेहऱ्यावर....खूप छान व्हिडिओ ताई🙏
@bhavanaborse2033 Жыл бұрын
किती ते छान मिक्सरसाठी पापा वरवंटा , फॅन्ससाठी वरती वरती गोणपाटच झाप स्वंयपाकसाठी ना गॅस पिकासाठी ना मैदा खुप सुंदर.
@pranu3735 Жыл бұрын
किती संघर्ष हसत मुखाने करत सुंदररित्या जीवन जगतात,
@anandmk2902 Жыл бұрын
बानाईंना बघीतले का, संघर्ष, मेहनत, दिसते,, आणि डोळ्यात आश्रु येतात बानाईंकडे बघुन ,,,, सर्वांना तिळगूळ घ्या आणि खुप खुप गोड बोला ,,
@nishajadhav1777 Жыл бұрын
तुमचे सर्व व्हिडिओ मी नेहमी पहाते, खूप छान आहे आजचा संक्रांतीचा व्हिडिओ, खूप आवडला. तुम्हाला सर्वांना भेटायची खूप इच्छा आहे बघू कधी योग येतो.