Рет қаралды 1,183,313
जावयासाठी केला जेवणाचा बेत 😍 | बायकोच्या माहेरची माणसं - Ambavali, Mandangad (Konkan) मुंबईला जायच्या अगोदर आम्ही सासरोडी साखरीला गेलो होतो. वर्षाचे माहेर मंडणगड तालुक्यातील साखरी हे गाव आहे. आमचे इतर बरेच नातेवाईक साखरी गावात आहेत. आम्ही साखरीला स्कुटीवरून गेलो. गावाला पाऊस पडल्यावर वातावरण एकदम पाहण्यासारखे झालेलं असतं. आम्ही आमच्या आंबवली गावावरून साखरीला निघालो. रस्त्यात खारी हर माझ्या मामाचे गाव लागते. साखरीला पोचलो तेव्हा मेव्हणी तेजल आली होती. मामी घरी होत्या. ताईंनी घरी चिकन सुक्का आणि चिकन रस्सा बनवला होता. मामींनी केळशीतून खेकडी आणली होती. वर्षाने घरी जाऊन भाकऱ्या भाजल्या. वर्षाचे माहेरचं घर खूप सुंदर आहे. मागच्या दारी खूप प्रसन्न वाटतं. हिरवागार परिसर आहे. जावयासाठी खास जेवणाचा बेत सासरोडी केलेला असतो. वर्षाची आजी आता वयस्कर झाली आहे. वर्षाची आजी खूप लाडकी आहे. गावी गेलो की गावाच्या माणसांना भेटता येतं. हितगुज करता येतात. कोकणातील गावची माणसं खूप प्रेमळ आहेत. गावाला आलो की आमच्या नातेवाईकांना आम्ही भेटतो. आम्ही दुपारी एकत्र जेवण केले. जेवण अतिशय स्वादिष्ट झाले होते. आम्ही दुपारी जेवण करून आमच्या गावी यायला निघालो. परतीच्या प्रवासात मामाच्या गावी जाऊन भेटून आलो. मामाचे गाव सुद्धा पाहण्यासारखे आहे. या व्हिडिओमध्ये आम्ही साखरीला गेलो ते दाखवले आहे. कोकणी पाहुणचार दाखवला आहे. वर्षाच्या माहेरची माणसं दाखवली आहेत. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
#JavayasathiKelaJevnachaBet #BaykochyaMaherachiManasa #SasrodiJevanachaBet
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
आमचा घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या टेलेग्रामवर app वर संपर्क करा.
t.me/sforsatis...