सिन्नर: नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या मदतीसाठी दोन ‘फायर बुलेट' दाखल

  Рет қаралды 207

SINNAR LIVE

SINNAR LIVE

Күн бұрын

सिन्नर नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या मदतीसाठी दोन ‘फायर बुलेट' दाखल झाल्या असून त्यामुळे अरुंद जागा असलेल्या गल्लीबोळातील आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळण्यासाठी मोलाची मदत होणार आहे. ‘फर्स्ट रिस्पॉन्डर' म्हणून फायर एक्स्टींग्वीशर टॅंकने सज्ज असलेल्या या बुलेट तत्काळ आग विझवण्यासाठी उपयोगी ठरणार आहेत.
महाराष्ट्र राज्याच्या भूकंप पुनर्वसन विभागाकडून सिन्नर नगरपालिकेला या दोन फायर बुलेट पाठवण्यात आल्या आहेत. त्यात चालकाच्या सुरक्षेसाठी हेल्मेट सह इतर सर्व उपकरणे देण्यात आली आहेत. याशिवाय प्रत्येक बुलेटवर पाठीमागच्या बाजूस प्रत्येकी दोन ९ लीटर क्षमतेचे फायर एक्स्टींग्वीशर टॅंक देण्यात आले आहेत. याशिवाय ऑक्सिजन सिलेंडरही देण्यात आले आहेत. ३५० सीसी क्षमतेची ही लाल रंगाची बुलेट आणि आग विझवण्याचे इतर साहित्य मिळून एका सेट साठी शासनाने तब्बल १२ लाख ८ हजार रुपये खर्च केले आहे. प्रथमोपचार पेटीही समवेत ठेवण्यात येणार आहे. सिन्नर नगरपालिकेला आग विझवण्यासाठी सुसज्ज अशा २४ लाख १६ हजार ६८० रुपये किमतीच्या दोन ‘फर्स्ट रिस्पॉन्डर' बुलेटचा पुरवठा करण्यात आला आहे.
शहरात काही ठिकाणी अरुंद गल्लीबोळा आहेत. आग किंवा अन्य काही दुर्घटना घडल्यास मदत कक्षात माहिती मिळताच अग्निशामक दलाला अरुंद रस्त्यांमुळे घटनेच्या ठिकाणी पोहोचण्यास विलंब होतो. किंबहुना काही ठिकाणी अग्निशामक बंब न गेल्यामुळे आग विझवणे कठीण जाते. अशावेळी फायर बुलेट ''फर्स्ट रिस्पॉन्डर'' म्हणून तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन आग नियंत्रणात आणण्यासाठी मदत करेल. आग प्राथमिक स्वरूपात असतानाच फायर बुलेट आग नियंत्रणात आणण्यासाठी मदत होईल. त्यामुळे आर्थिक आणि जिवित हानी टाळता येईल.
#news #marathinews #maharashtranews #fire

Пікірлер
MY HEIGHT vs MrBEAST CREW 🙈📏
00:22
Celine Dept
Рет қаралды 78 МЛН
Help Me Celebrate! 😍🙏
00:35
Alan Chikin Chow
Рет қаралды 89 МЛН
What's in the clown's bag? #clown #angel #bunnypolice
00:19
超人夫妇
Рет қаралды 25 МЛН
小蚂蚁会选到什么呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:47
火影忍者一家
Рет қаралды 120 МЛН
MY HEIGHT vs MrBEAST CREW 🙈📏
00:22
Celine Dept
Рет қаралды 78 МЛН