Рет қаралды 6,006
किल्ले तळगड
रोहा पासून सुटावलेल्या डोंगर रांगेवर अवचितगड, घोसाळगड, तळगड सारखे किल्ले ठाण मांडून उभे आहेत . त्यापैकी समुद्र सपाटीपासून जवळपास 1000 फूट उंचीवर असणारा तळगड स्वराज्यात मोलाचे स्थान टिकवून होता.
कुंडलिका नदीतुन होणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी या गडाची निर्मिती करण्यात आली. या परिसरात असणारी कुड्याची लेणी, मांदाड ची खाडी, गडावरील खांबटाके यावरून गडाचे प्राचीनत्व लक्षात येते. पुरंदरच्या तहात महाराजांनी आपल्याकडे जे 12 किल्ले ठेवले त्यात तळगडाचा समावेश होता, यावरून गडाचे स्वराज्यातील महत्त्व सुद्धा लक्षात येते.
इथे पोहचायचे कसे?
मुंबई गोवा हाय वे वरील इंदापूर शहरातुन तळाकडे जाणारी एस टी बस किंवा खाजगी वाहनाने तळा शहरात यायचे. ( अंतर 15 किमी).
गडावर पाण्याची सोय: पिण्या योग्य नाही.
जेवणाची सोय: गडाच्या पायथ्याला (तळा शहरात)
मार्गदर्शन:
जर योग्य नियोजन केले तर आपल्याला 1 दिवसात तळगड, घोसाळगड आणि कुड्याची लेणी बघता येते.