Рет қаралды 56,782
#dattatrya abhang #guruwarcha abhang
तीन शिरें सहा हात । तया माझे दंडवत ||१||
काखे झोळी पुढे श्वान । नित्य जाह्नवीचे स्नान ||२||
माथां शोभे जटाभार |अंगी विभूति सुंदर ||३||
शंख चक्र गंदा हातीं। पायीं खडावा गर्जती ||४||
तुका म्हणे दिगंबर । तया माझा नमस्कार ||५||