Рет қаралды 2,653
भारतात शंकराची एकूण १२ महत्त्वाची मंदिरे आहेत. त्यांना १२ (द्वादश) ज्योतिर्लिंगे म्हणतात. धर्मशास्त्राने या ज्योतिर्लिंगांच्या यात्रेचा क्रम सांगितला आहे, तो असा :
१. सोमनाथ (गुजरात -गीर सोमनाथ जिल्हा/वेरावळ)
२. मल्लिकार्जुन (आंध्रप्रदेश - श्रीशैल्य)
३. महांकालेश्वर (मध्यप्रदेश - उज्जैन)
४. ओंकारेश्वर (मध्यप्रदेश - ओंकारेश्वर,खंडवा जिल्हा)
५. वैजनाथ (महाराष्ट्र - परळी, बीड जिल्हा) - उत्तर भारतात झारखंड मधील देवघर स्थित वैद्यनाथ देवस्थानास वैजनाथ ज्योतिर्लिंग मानतात.
६. भीमाशंकर (महाराष्ट्र - भीमाशंकर,खेड तालुका, पुणे जिल्हा)
७. रामेश्वर (तामिळनाडू - रामेश्वर,रामनाथपुरम जिल्हा)
८. नागनाथ - गुजरातच्या द्वारकेतील नागेश्वर देवस्थानास नागनाथ ज्योतिर्लिंग मानतात.
९. विश्वेश्वर (उत्तर प्रदेश - वाराणसी)
१०. त्रेम्बकेश्वर (महाराष्ट्र - त्र्यंबकेश्वर तालुका ,नाशिक जिल्हा)
११. केदारनाथ (उत्तराखंड - केदारनाथ,रुद्रप्रयाग जिल्हा)
१२. घृष्णेश्वर (महाराष्ट्र -वेरुळ,खुल्ताबाद तालुका, छत्रपती संभाजी महाराज नगर जिल्हा )
#anandianand #ukhana #jyotirling