काही ठिकाणी अर्थाचा अनर्थ झालेला आढळतो. विघ्नहर्ता नंतर लगेच *तू पृथ्वीचा विनाशकर्ता* अशी ओळ आलेली आहे ती अयोग्य व अनर्थ करणारी वाटते.
@babulalpatil8292 жыл бұрын
खुप खुप मनस्वी धन्यवाद आपले आदरणीय श्रीयुत शिवाजी साळुंके सरजी आपल्या अनमोल प्रतिक्रिया रूपी मार्गदर्शनाबद्दल.सरजी..👏👏 तसेच आपण सदरील गीतामधील गीतरचना करतांना लिहिण्यात काही अर्थाचे अनर्थ आपल्या दृष्टीने झाल्याचे आढळुन आले आहे ते मी तुमच्या प्रश्नाचे किंवा शंकेच निरसन मी पुढीलप्रमाणे दूर करण्याचा प्रयत्न करतो सरजी-- 👏 पहिली गोष्ट म्हणजे सदरील "वाट बघतोय रे आम्ही तुझी तुझी रे गणराया।" हे गीत भक्तीरसाने ओतप्रोत भरलेले गीत असल्याने यामध्ये "भगवंताची, ईश्वरशक्ती व भक्तांची भक्तीशक्ती " या दोघा शक्तींना मिळुन आर्तभक्ती संयोग रचलेला आहे.तरी ही *पृथ्वी अर्थात् या धरतीवर जेव्हा इश्वरशक्तीला पूजणार्या ,मानणार्या भक्त लोकांची भक्तसख्या अधिक असते तेव्हा त्या भक्तांवर जीवनात येणार्या विघ्नांना दूर करण्याचे काम *विघ्नहर्ता* म्हणुन ईश्वरशक्ती अर्थात श्री गणपती बाप्पा करतात. व जेव्हा या धरती उलट होते म्हणजे भक्तीहीन अभक्त लोकांची संख्या जेव्हा अधिक वाढते तेव्हा या धरतीचा तूच *विनाशकर्ता* असतो.असा मी गीत लिहितांना मार्मिक,धार्मिक व गर्भित अर्थाचा मिलाप आध्यात्मिक दृष्टीने अर्थपूर्ण भाव घेऊन केला आहे.आपण ज्ञानी,गुणी,वरिष्ठ मंडळींनी प्रत्यक्ष धरतीचा पृथ्वीचा,विनाशकर्ता असा चूकीचा अर्थ न घेता अभक्त असलेल्या लोकांच्या संख्येने युक्त असलेली ह्या धरतीचा प्रत्यक्ष तूच *विनाशकर्ता* असा अर्थ आहे.त्यामुळे असा वरीलप्रमाणे शुद्ध अर्थ व भाव सदरील गीतामधुन समजुन घ्यावा सरजी..👏पूनश्च मनस्वी खुप खुप आभार आपण वेळ काढुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल सरजी..धन्यवाद! जय खांदेश। जय महंराष्ट्र। जय भारत! 😊🙏🚩 *बोला,गणपती बाप्पा मोरया।मंगल मूर्ती मोरया* 🚩