Рет қаралды 151,610
वसईतील लग्नसोहळे म्हणजे चार-पाच दिवस चालणारा एक उत्सवच असतो. वसईकर लग्नात विविध रीतिरिवाज असतात जे ह्या सोहळ्यात एक आगळीवेगळी रंगत आणतात.
ह्या रीतिरिवाजांपैकी एक म्हणजे 'नावळ'. लग्न लागल्यानंतर वर आपल्या वधूला नेण्यासाठी तिच्या घरी नावळ म्हणजे वरात घेऊन जातो. ह्या नावळीत त्याचे कुटुंबीय, नातेवाईक, गावकरी मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. ब्रास बँडच्या तालावर नाचणारे वऱ्हाडी धमाल करताना पाहणे म्हणजे एक पर्वणीच असते. दुसऱ्या बाजूला नववधू आपल्या नवीन घरी म्हणजे सासरी जात असताना तिला तिचे आईबाबा, कुटुंबिय हृद्य निरोप देतात. ह्यावेळी पारंपरिक गाणी गायली जात असताना वधूचे जवळचे लोक तिला 'खॅम' म्हणजे मिठी मारतात तेव्हा वातावरण भावनिक होऊन जाते व आजूबाजूला जमलेल्या स्रियांना स्वतःच्या लग्नातील ह्या प्रसंगाची आठवण आल्याशिवाय राहत नाही.
ह्या व्हिडीओद्वारे आपण ह्यापैकी काही बाबी जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत.
आपण अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा व घंटीचे बटणही दाबा. धन्यवाद.
छायाचित्रण व संकलन: अनिशा डि'मेलो
वसईवरील आमचे इतर व्हिडीओ
वसईतील लग्नसोहळा - आयज
• वसईतील लग्नसोहळा - आयज...
वसईतील लग्नसोहळा - हाऊरॉ
• वसईतील लग्नसोहळा - हाऊ...
वसईचा दूधवाला एक माहितीपट - भाग १
• वसईचा दूधवाला एक माहित...
वसईचा दूधवाला एक माहितीपट - भाग २
• वसईचा दूधवाला एक माहित...
वसईचा केळीवाला - एक माहितीपट
• वसईचा केळीवाला - एक मा...
वसईतील पानवेल - विड्याची पानं
• वसईतील पानवेल/विड्याची...
मातीच्या तव्यावरील तांदळाच्या भाकऱ्या
• मातीच्या तव्यावरील तां...
वसईच्या ऑर्किडची कहाणी
• वसईच्या ऑर्किडची प्रेर...
सफर वसई किल्ल्याची
• सफर वसई किल्ल्याची | व...
प्राचीन वसईचा इतिहास
• प्राचीन वसईचा इतिहास |...
वसईतील बैलगाडीवाले शेतकरी
• २०२० मध्ये बैलगाडी वाप...
#vasaiculture #vasaiwedding #sunildmello #vasaicustoms #vasaiheritage