Рет қаралды 176
श्री सद्गुरू विश्वनाथ महाराज रूकडीकर ट्रस्ट कोल्हापूर व श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय व रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने विश्व पंढरी येथे श्री विश्व आयुर्वेद प्रबोधनी या पाच दिवसाच्या निवासी गुरुकुल शिबिरास सुरुवात झाली. श्री आनंदनाथ सांगवडेकर व माझ्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. वैद्य राहुल शेलार यांनी या शिबिराची रूपरेषा सांगितली.
पूज्य श्री दादा महाराज यांनी आध्यात्मिक साधनेतून आयुर्वेदातील विविध औषधांचा शोध करून आजच्या आयुर्वेदामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. आयुर्वेद प्रचार व प्रसाराच्या याच मार्गातील पुढचा टप्पा म्हणजे श्री विश्व आयुर्वेद प्रबोधिनी...!
या वेळी उपस्थित वैद्य गिरीश शिर्के वैद्य सागर कवारे .तसेच सहभागी सर्व वैद्य,विद्यार्थी यांची या प्रबोधिनीतून ज्ञान उन्नती होवो हीच सदिच्छा.....
--- निरंजनदास सांगवडेकर
अध्यक्ष - श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय व रिसर्च सेंटर
विश्वस्त - श्री सदगुरु विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्ट, कोल्हापूर