Рет қаралды 1,014
लोकशाही तत्वज्ञानातून समाजकार्याची मूल्ये उदयास आली आहेत. समाजातील प्रत्येक व्यक्तीने सुस्थितीत जगले पाहिजे. शोषित, वंचित, पिडीत, अभावग्रस्त कोणीही राहू नये ही त्यामागची भावना आहे. सामाजिक न्यायाची भावना, मानव कल्याणाची भावना यामागे आहे. व्यक्तीसहाय्य कार्याच्या मुल्यांना मानवी संस्कृतीचा व मानव सभ्यतेच्या संकल्पनेचा आधार आहे. व्यक्तीनुसार समाज बनत असल्याने आणि समाजानुसार व्यक्ती वर्तन करीत असल्याने व्यक्तीच्या वर्तनाला, विचारांना, आचारांना, दृष्टीकोनाला सामाजिक वातावरणातील, समाजातील घटना आणि घटक प्रभावित करतात.
#bsw #msw #swo#व्यक्तीसहाय्यकार्य #casework #समाजकार्य #samajkayanadhyayan #samajkalyan #socialwork #socialworkeducation