या पद्धतीने भाजी करून तर पहा ! न खाणारे सुद्धा आवडीने💯%मागून खातील !padawal chi bhaji recipe marath

  Рет қаралды 75,810

Priyas Kitchen

Priyas Kitchen

Күн бұрын

साहित्य व प्रमाण
अर्धा किलो पडवळ
दोन टेबलस्पून तेल
पाव चमचा मोहरी
पाव चमचा जिरे
पाव चमचा हिंग
अर्धा चमचा हळद
एक छोट्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा
एक चमचा गोडा मसाला
अर्धा चमचा धने-जिरे पावडर
चवीपुरतं मीठ मूठभर
बारीक चिरलेली कोथिंबीर
थोडसं ओलं खोबरं
अर्ध्या लिंबाएवढा गूळ
(वरील प्रमाणातली भाजी चार ते पाच लोकांसाठी पुरेल)
#padawalchibhaji
#bottlegourdsabji
#priyaskitchen
#padawalchibhajibysaritaskitchen
#yourfoodlab

Пікірлер: 89
@swatihakke
@swatihakke 4 ай бұрын
मला खूप आवडते ही भाजी. मी भिजवलेली हरबरा डाळ घालून करते ही भाजी. पाणी न घालता, अंगच्या पाण्यातच शिजते पडवळ, त्यामुळे चविष्ट लागते. तुझी आमसुलं आणि खोबरं घालून करण्याची पद्धत पण खूप आवडली प्रिया👌.
@Pym1s2z
@Pym1s2z 4 ай бұрын
खरंच आरोग्याच्या दृष्टीने ही भाजी खूप उपयुक्त आहे नक्की या पद्धतीने करून पाहीन❤
@Artandcraftteacher5379
@Artandcraftteacher5379 4 ай бұрын
खूप छान पद्धतीने पडवळाची भाजी सांगितली मी पण तुझ्यासारखेच भाजी करते पण त्यात थोडा ओवा घालते कारण सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत ना तीही भाजी खूप छान होते धन्यवाद प्रिया
@shilpapawaskar8677
@shilpapawaskar8677 4 ай бұрын
मस्तच प्रिया माझ्या घरी आम्ही यात वाल किंवा मटकी भिजवलेली घालून सुद्धा करतो. पडवळ चवीला छान आणि शरीराला उपयुक्त ..❤
@nehapatil8553
@nehapatil8553 4 ай бұрын
भाजी खूप मस्त. पडवळ+ मोड आलेले वाल/ पांढरे वाटणे ही भाजी पण खूप मस्त होते.
@amrutabhawalkar5656
@amrutabhawalkar5656 4 ай бұрын
खूपच छान ....पाहूनच खावीशी वाटते आहे. मी खूप साध्या पद्धतीने करायचे. आता तुम्ही दाखवलेल्या पद्धतीने करेन. खूप धन्यवाद प्रिया ताई🙏🌹
@sulbhamorhil6610
@sulbhamorhil6610 3 ай бұрын
छानच आहै
@shilpapingulkar3323
@shilpapingulkar3323 3 ай бұрын
👌👌
@swapnalibhgat11bhagat36
@swapnalibhgat11bhagat36 4 ай бұрын
खुप सुरेख.
@manasi4147
@manasi4147 4 ай бұрын
ताई तळणीचे मोदक केलेले फारच अप्रतिम बनले होते खुप धन्यवाद. पडवळ ची भाजी ही सुरेख दिसत आहे आमच्या कडे अशीच बनवतात 😊
@Geeteditz_geetu
@Geeteditz_geetu 4 ай бұрын
Walachya birdyat khup chan lagte,bhaji hot alyavar ola khobara ani kothimbir chan lagte
@nayanasunthankar7637
@nayanasunthankar7637 4 ай бұрын
मी कोकणातलीच आहे.आम्ही नेहमी पडल्याची भाजी करतोच. मी यात फोडणी मध्ये राई, कांदा,टाॅमेटो घालून हळद,लाल तिखट,गोडा मसाला, धणे जिरे पावडर गूळ,मिठ घालून चिरलेली भाजी घालते . कढईवर झाकण ठेवून त्यावर पाणी घालून वाफेवर शिजवणे.शिजल्यानंतर ओलं खोबरं कोथिंबीर घालते. तुमची पद्धतही छान आहे.
@ManishaMulay-lo9fx
@ManishaMulay-lo9fx 4 ай бұрын
पडवळाची भाजी मी कधीच केली नव्हती, आता नक्की करून पहाणार! धन्यवाद प्रिया!!?
@kalpananimbalkar121
@kalpananimbalkar121 4 ай бұрын
पडवळ बद्दल खूप छान माहिती, नक्की करून बघेन 🎉❤
@arunaagni2636
@arunaagni2636 4 ай бұрын
वालाची डाळ घालायची. मस्त लागते 🙏🏻
@chandangandhi2524
@chandangandhi2524 4 ай бұрын
👌
@arunaagni2636
@arunaagni2636 4 ай бұрын
थोडं ओलं खोबरं मस्त 🙏🏻
@suvarna76
@suvarna76 4 ай бұрын
Science च्या वर्गात बसल्यासारखे वाटले 😊
@yogitamhatre4641
@yogitamhatre4641 4 ай бұрын
खूपच छान पडवळाची भाजी मीही अशीच करते मस्तच लागते धन्यवाद प्रियाताई ❤
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार ताई🙏😊❤️
@MadhuMinusKitchen
@MadhuMinusKitchen 4 ай бұрын
Nice recipe. ..mi pan hi bhaji jast khat nahi..nakki try karein hi bhaji😊 hi bhaji itki healthy ahe mahit navta...khup chaan information dili ahe. Thank you ❤️ New Subscriber😊
@SangitaDhakwal-b6o
@SangitaDhakwal-b6o 4 ай бұрын
Khup mast zali aahe bhaji
@sunitahaval6040
@sunitahaval6040 4 ай бұрын
Khupach chan tai
@meenakulkarni2743
@meenakulkarni2743 4 ай бұрын
Khup chan nakki karunpahin
@madhavigarud6279
@madhavigarud6279 4 ай бұрын
Wasaaa khupach gunkari bhaji mi chana dal kiva trass hoto dalicha tyani phutana dal mi kadave wal pan ghalte khup apratim lagate khup chan aata aamsule ghalun baghen karun mastach👌👌👌
@sshubhangipalkar837
@sshubhangipalkar837 4 ай бұрын
Tai Rava modak banvle khupach chan zale❤
@tejashreekalsekar2823
@tejashreekalsekar2823 4 ай бұрын
Chhan
@oamyway975
@oamyway975 4 ай бұрын
👍
@janhavijoshi7429
@janhavijoshi7429 4 ай бұрын
मी हरभरा डाळ घालून वाफेवर शिजवून घेते खूपच छान होते माझी आवडती भाजी
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार❤🎉🙏🙏💐😊
@swaaaee3064
@swaaaee3064 4 ай бұрын
प्रियाताई,तुमच्या वड्यांच्या (मालवणी वडे, काकडीचे वडे) रेसिपीसाठी मी परमेश्वराचे आभार मानते. कारण उडीद डाळीशिवाय इतके सुंदर वडे तुम्ही केलेत... मला उडीद डाळीचा त्रास होतो, त्यामुळे वडे करणे मी टाळायची..पण आत्ता वरचेवर तुमच्या पद्धतीचे वडे सर्वानाच आवडू लागले आहेत. तुमच्या रुपात देव भेटला.मनःपूर्वक धन्यवाद!🙏🙏🌷🌷
@SangitaDhakwal-b6o
@SangitaDhakwal-b6o 4 ай бұрын
Khup fayadeshir aahe hi bhaji me nakki karen
@aratikarkhanis8456
@aratikarkhanis8456 4 ай бұрын
Khup janana avadate. Amhi mod aalelya dalimbya ghalun karto.varun ole khobare ghalayache.
@neeladeshmukh9726
@neeladeshmukh9726 4 ай бұрын
तेलात मोहरी ,जिरे, हिरव्या मिरच्या,हिंग ,हळद घालून त्यात बिया परतून मीठ घालून चटणी वाटावी. छान लागते. तसेच यात बेसन घालून खमंग परतावे. अप्रतिम चव येते.
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद बियांची चटणी ची कृती सांगितली त्याबद्दल
@anujagodse3530
@anujagodse3530 4 ай бұрын
Me pan kartethode til pan ghalavet chatnit
@aratikarkhanis8456
@aratikarkhanis8456 4 ай бұрын
Amachya kade karatat.
@PrachiKarnik-gw2dp
@PrachiKarnik-gw2dp 4 ай бұрын
Padwal vilivar kivha surine tasun ghyava.nantar chirlyavar tyala mith lavun thevave.ani algad pani dabun kadhave mhanje tyacha harvas vas jato.mazi aai ani sasu asa karat hoti .mi pan tech karte.
@latikasaigaonkar3435
@latikasaigaonkar3435 4 ай бұрын
अगदी बरोबर अशी भाजी छान लागते
@wasudeomarathe6417
@wasudeomarathe6417 4 ай бұрын
पाणी/रसाबरोबर पोषक द्रव्येही वाहून जातील असे वाटते.कारल्याचा कडूपणा घालवायला ही पद्धत वापरतात.
@helengonsalves532
@helengonsalves532 4 ай бұрын
I add a little more onion, also, tomatoes n at the end beat 2 or3 eggs and add. Yummy.
@ashwinigandhi1308
@ashwinigandhi1308 4 ай бұрын
पडवळ ,घोसावळे ह्या भाज्या चिरण्यापूर्वी सालकाढणीने नुसती तासून घ्यावी लागते. किंवा विळीवर घासून घ्यावा. त्यातील वरचा खरबरीत अंश निघून जातो.
@MhetreTab
@MhetreTab 4 ай бұрын
Mujhe pasand hai yeh sabji.ander ka beej aur fiber dosa ke ate me grind Kiya to dosa bahut achcha hota hai
@someshwartupate9556
@someshwartupate9556 4 ай бұрын
Kaahi loka ya la meeth laaun thevta ta, te kiti barobar
@archanakadam5179
@archanakadam5179 4 ай бұрын
मी याच पध्दतिने करते
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 4 ай бұрын
kzbin.info/www/bejne/j2G9nHxtba6FqLssi=qwc3TxiuQhBGMvya डायबेटिस, वजन कमी करण्यासाठी, ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी , रामबाण उपाय म्हणजे बहुगुणी "मल्टीग्रेन भाकरी" मल्टीग्रेन भाकरी खाण्याचे फायदे व महत्त्व टम्म फुगलेली भाकरी बनवण्याची साधी सोपी पद्धत!
@vedgunjal2007
@vedgunjal2007 4 ай бұрын
Chanadal or valache birde ghalun gharguti masalyat sunder hote
@seemashintre3677
@seemashintre3677 4 ай бұрын
खुप छान भाजी केली आहे आम्ही वरुन पण तासुन घेतो पण कांदा घालत नाही बाकी अशीच करतो
@ashwinigandhi1308
@ashwinigandhi1308 4 ай бұрын
बरोबर . पडवळ आणि घोसावळे तासूनच घ्यावे लागते.
@mugdhadhaygude9258
@mugdhadhaygude9258 4 ай бұрын
Exact हेच सांगणार होते की साल काढणी ने थोडेसे साल काढून घ्यावे लागते
@ashwinigandhi1308
@ashwinigandhi1308 4 ай бұрын
@@mugdhadhaygude9258 साल नाही काढायचे. फक्त विळीवर तासून घ्यावे. त्याचा एकदम पातळ थर निघून जातो. नंतर घोसावळे किंवा पडवळ धुवून घ्यावेत म्हणजे त्याला चिकटलेला भाजीचा थर निघून जातो. सालकाढणीने भाजी वाया जाते.
@mugdhadhaygude9258
@mugdhadhaygude9258 4 ай бұрын
@@ashwinigandhi1308 हो तेच मला विळीवर जमत नाही मी साल काढणी ने तासते. अगदी पातळ थर.
@sandhyajeste5201
@sandhyajeste5201 4 ай бұрын
आम्ही रत्नागिरीकर कडवे वाल खोबरे गूळ कोकण करतो कांदा घालत नाही गणपतीला पहिल्या दिवशी करतो. ऐरावी चण्याची डाळ किंवा उखादालेले हरबरे गाळून करतो लहान मुले आनंदाने खातात. नॉर्थ वाले ही खात नाही जंगम खात नाही. ते कांही मजेशीर आहे.
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 4 ай бұрын
माझ्या सासूबाई सुद्धा गुहागरच्या आहेत त्या सुधा कडव्या वाला मध्ये नेहमी पडवळाची भाजी करतात
@manishapethkar419
@manishapethkar419 4 ай бұрын
मला खूप आवडते,पण पडवळ कसं घ्यावं तेही सांगा,जसं दूधी भोपळा कसा घ्यायचा सांगितलं
@SangitaDhakwal-b6o
@SangitaDhakwal-b6o 4 ай бұрын
Mala pan padawal chi bhaji nahi aavadat pan mi aata ashi karen hi bhaji
@rncakeshorts
@rncakeshorts 4 ай бұрын
Kal rava naral modak try kelte Chan zalte...
@rncakeshorts
@rncakeshorts 4 ай бұрын
Pn Shira khallyasarkhe lagat hote...
@vijaymadankar2343
@vijaymadankar2343 4 ай бұрын
ताई ॲपल च्या शिरा ची रेसिपी टाका न plzzzzz....
@SangitaDhakwal-b6o
@SangitaDhakwal-b6o 4 ай бұрын
Soppi aahe karayala aani zatpat pan hote
@anujagodse3530
@anujagodse3530 4 ай бұрын
Besan peeth perun or vaal solun ghatle tari mast hote
@prakashk48
@prakashk48 4 ай бұрын
पडवळाची साल काढून भाजी केली तर आणखीन छान लागते.
@sheelalimaye9302
@sheelalimaye9302 4 ай бұрын
मुगाची डाळ घालून याची रस भाजी छान होते
@wasudeomarathe6417
@wasudeomarathe6417 4 ай бұрын
बरोबर अगदी कडवे वाल किंवा वालाची डाळ किंवा हरभरा डाळ घालून सुद्धा छान होते.आहार विषयक खूप चिकित्सक नसलो तर तेलाचं प्रमाण थोडं जास्त असेल तर भाजी जास्त चविष्ट होते!
@anjalisharangpani9139
@anjalisharangpani9139 4 ай бұрын
छान आहे.कशीही केली तरी पडवळाची भाजी छान लागते.पण या भाज्यांमध्ये कांदा,लसूण, टोमॅटो हे नाही घातले तर मूळची चव झाकली जात नाही.
@pradnyamadye4817
@pradnyamadye4817 Ай бұрын
चण्याची डाळ भिजवत ठेऊन ती पण घालून छान लागते
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Ай бұрын
हो चणाडाळ घातलेली भाजी तर अप्रतिम होते👍👍👌👌❤️😊
@gayatrideo4404
@gayatrideo4404 4 ай бұрын
खूप सुन्दर ❤❤ पडवलाची साल काढली नाही तर शिजते का ती मऊ? मी कायम साल काढून केली आहे. पडवळ जुन असेल तरी साल न काढता शिजते का?
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 4 ай бұрын
कवळा असेल तर साल काढण्याची गरज नाही जर कवळा नसेल तर साल काढून घ्यायची आणि मग चिरायचा
@jayashreepawar2300
@jayashreepawar2300 4 ай бұрын
Tai amcha kade padval manje The tondli sarke distat fakt the tondli peksha mothe astat.ase nahi betat..asi kakadi betate tya padvlachi pan ashich bhaji banvaychi ka tai.tai dhirde dakvnar na tumi
@wasudeomarathe6417
@wasudeomarathe6417 4 ай бұрын
पडवळची छोटी आवृत्ती म्हणजे हरसूल , आमच्या विदर्भात पडवळ साधारण मिळत नाही हरसूल मिळतात चव तशीच असते.गौरीच्या वेळेस आवर्जून ही भाजी करतात.
@vaidehideshpande2496
@vaidehideshpande2496 4 ай бұрын
Te tondli sarkhe diste ani mothe aste tyala 'Parvar' mhantat. Te Padwal nave.
@zeem1030
@zeem1030 4 ай бұрын
Baheril baju ne tasun ghya aani koknat bhajit kadipatta ghalat naahit ... Aani kapun zalyawar meeth lavun thoda vel theva
@sugandhamuzumdar3037
@sugandhamuzumdar3037 4 ай бұрын
Yat Navin Kay kela?
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 4 ай бұрын
kzbin.info/www/bejne/Z5DCcoONidWljs0si=888wdZtynMTW986E लहान मुलं सुद्धा आवडीने खातील अशी 💯 % कडू न होणारी "भरली कारली" ! कारल्या मधली "जीवनसत्व" टिकून राहण्यासाठी सुद्धा खास टिप्स व योग्य पद्धत!
@jayantdeshpande4485
@jayantdeshpande4485 4 ай бұрын
शक्यतो साल काढण्याने अगदी हलकी साल काढून घ्यावी म्हणजे मऊ शिजते.
@kausarshaikh2714
@kausarshaikh2714 4 ай бұрын
ये पडवळ क्या होता है?
@wasudeomarathe6417
@wasudeomarathe6417 4 ай бұрын
Snake gourd लंबा होता है साप जैसा और सफेद हरे रंग का.
@nayanasunthankar7637
@nayanasunthankar7637 4 ай бұрын
माझी एक केरळी मैत्रीण आहे.ती त्यात शिजल्यावर एक अंड फोडून घालते व पुन्हा एक वाफ काढते.
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 4 ай бұрын
ही नवीनच पद्धत कळाली खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार🙏🙏🙏😊
@LeenaTushar
@LeenaTushar 4 ай бұрын
पडवळ आधी मीठ चोळून म ऊ करून नाही घेतल का..साल चिवट असत ना शिजत नाही अस .आम्ही आधी कारल्यासारख मीठ लावून ठेवतो मग नरम पडल की थोड पिळून काढतो .मग अशी मिरचीवर किंवा वाटणात बिरड घालून करतो
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 4 ай бұрын
पडवळ कवळा असेल तर हे सगळं करण्याची गरज नाही👍😊
@vaishaligokhale2609
@vaishaligokhale2609 4 ай бұрын
हिरव्या मिरच्यांऐवजी लालभडक तिखट‌ घातलं तर भाजी जास्त तजेलदार आणि चटकदारही होईल. तुम्ही एकदा चवबदल म्हणून करून बघा. या
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 4 ай бұрын
डाळिंब यांच्या उसळी सोबत करतो तेव्हा आम्ही लाल तिखट घालतो😊👍
@rachanadhotre1802
@rachanadhotre1802 4 ай бұрын
Tai sorry मी तुमची चूक काढत नाही पण तुम्ही साहित्य ani प्रमाण मध्ये kanda vaparta ते लिहिले नाही. क्षमस्व
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद चूक लक्षात आणून दिल्याबद्दल🙏 लगेच कांदा साहित्यामध्ये ऍड करते👍😊
@prajaktapatil6088
@prajaktapatil6088 4 ай бұрын
आमसूल पण नाही लिहिले, गुळ बरोबर चिंच टाकून, मिठाचे प्रमाण ही लिहीले पाहिजे, तुमच्या सर्वच रेसिपीज छान आहेत, मी करते
@kausarshaikh2714
@kausarshaikh2714 4 ай бұрын
ये पडवळ क्या होता है?
@mugdhadhaygude9258
@mugdhadhaygude9258 4 ай бұрын
Snake gourd
Chain Game Strong ⛓️
00:21
Anwar Jibawi
Рет қаралды 41 МЛН