यावल कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात घाणीचे साम्राज्य. अनेक राज्यात साथीचे रोग पसरणार..?

  Рет қаралды 144

Vyas Nagari || व्यासनगरी न्यूज

Vyas Nagari || व्यासनगरी न्यूज

Ай бұрын

यावल दि.११
यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात चिखल व घाणीचे साम्राज्य झाले आहे पर्यायी समितीच्या आवारातून केळीचे रिकामे व केळीने भरलेले ट्रक वजन काट्यावर मोजमाप होऊन महाराष्ट्र राज्यासह उत्तर प्रदेश, ( यू .पी .) श्रीनगर,लखनऊ,पंजाब,
हरियाणा इत्यादी राज्यात दररोज रवाना होत असतात याचबरोबर महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाने गोडाऊन मध्ये ठेवलेला हरभरा हा नागपूर येथील प्रसिद्ध अशा हल्दीराम उद्योगाच्या फॅक्टरीत दररोज ट्रक भरून रवाना होत असल्याने घाणीच्या साम्राज्यामुळे महाराष्ट्रासह इतर राज्यातील शेतकरी,व्यापारी,नागरिकांमध्ये साथीचे रोग पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे तरी याकडे बाजार समिती संचालक मंडळाने तात्काळ लक्ष केंद्रित करून बाजार समितीच्या आवारात सिमेंट काँक्रीट युक्त रस्ते व जागा उपलब्ध करून द्यावी अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.
यावल रावेर तालुका हा केळी उत्पादन व व्यवसायाच्या बाबतीत जळगाव जिल्ह्यात एक नंबर वर आहे यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दररोज ५० ते १०० केळीचे रिकामे व केळीने भरलेले ट्रक वजन काट्यासाठी येत असतात व येथून महाराष्ट्र राज्यासह वरील नमूद केलेल्या राज्यांमध्ये रवाना होत असतात,यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे व कृषी उत्पन्न बाजार समिती यावल जिल्हा जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने गोडाऊन उभारणी करण्यात आली आहे, या गोडाऊनची क्षमता १ हजार मेट्रिक टन आहे तसेच कृषी मित्र हरिभाऊ जावळे गोदाम संकुल सुद्धा उभारण्यात आले आहे,याच बरोबर कृषी मित्र हरिभाऊ जावळे धान्य चाळण व प्रतवारी यंत्रणा गोडाऊन उद्योग आणि महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे भव्य असे मोठे गोडाऊन आहे या गोडाऊन मधून नागपूर येथील प्रसिद्ध उद्योग हल्दीराम यांच्याकडे दररोज हरभरा रवाना होत असतो या सर्व उद्योगात शेकडो मजूर, ट्रक चालक, संबंधित व्यक्तीची दररोज महाराष्ट्र राज्य इतर राज्यात सारखी ये जा सुरू असते आणि याच ठिकाणी बाजार समितीच्या आवारात अंदाजे अर्धा किलोमीटर अंतरात मोठ्या प्रमाणात घाण पाणी,घाण व दुर्गंधीयुक्त केळीचा कचरा इत्यादी घाण, साचून चिखल झाला आहे.या चिखलात अनेकांचे ट्रक अडकल्याने ट्रक चालक क्लीनर व गोडाऊन व्यवस्थापक यांना मोठा मनस्ताप व आर्थिक खर्च सहन करावा लागत आहे,परंतु याकडे यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव आणि संचालक मंडळाचे अक्षम्य असे दुर्लक्ष होत आहे तरी संचालक मंडळाने तात्काळ यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात तात्पुरत्या स्वरूपात पक्का मुरूम किंवा खडी,गिरावल टाकून पावसाळ्यात व्यवस्था करावी आणि त्यानंतर यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात केळीचे ट्रक व महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ गोदामात येणाऱ्या ट्रक व इतर वाहनांसाठी सिमेंट काँक्रीट युक्त रस्ते व मोकळी जागा काँक्रीटयुक्त करून द्यावी अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.
यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे व कृषी उत्पन्न बाजार समिती यावल यांचे संयुक्त विद्यमाने भव्य असे गोडाऊनचे बांधकाम करण्यात आले आहे त्याचप्रमाणे कृषी मित्र हरिभाऊ जावळे गोदाम संकुल व कृषी मित्र हरिभाऊ जावळे धान्य चाळण व प्रतवारी यंत्रणा उद्योग आहे हे उद्योग बंद आहे की सुरू आहेत..? तो भाग वेगळा आणि राजकारणाचा असला तरी याकडे सर्व रावेर विधानसभा मतदारसंघाचे लक्ष केंद्रित झाले आहे. इत्यादी उद्योग सुरू असल्याने या उद्योगांची प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून तरी यावल कृषी उत्पन्न बाजार समितीने तात्काळ उपाययोजना न केल्यास येत्या विधानसभा,जिल्हा परिषद, पंचायत समिती व सहकारी संस्था निवडणुकीत हा मोठा राजकीय मुद्दा उपस्थित होऊ शकतो असे सुद्धा संपूर्ण रावेर विधानसभा मतदारसंघात बोलले जात आहे.

Пікірлер
Incredible Dog Rescues Kittens from Bus - Inspiring Story #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 35 МЛН
Real Or Cake For $10,000
00:37
MrBeast
Рет қаралды 60 МЛН
У ГОРДЕЯ ПОЖАР в ОФИСЕ!
01:01
Дима Гордей
Рет қаралды 6 МЛН
UnPanel: Future of Health | Shefali Malhotra @ #privacysupreme
12:52
Incredible Dog Rescues Kittens from Bus - Inspiring Story #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 35 МЛН