Рет қаралды 425,545
श्री.संपत किसन कोथिंबीरे
प्रगतशील शेतकरी
कोथिंबिरे फार्म श्रीगोंदा
ता श्रीगोंदा जि अहमदनगर
मोबाईल नंबर
9226371360
9421993831
विशेष मार्गदर्शन
श्री पद्मनाभ शिवाजी मस्के
तालुका कृषी अधिकारी श्रीगोंदा
श्री आदिनाथ गोपीनाथ फंड
कृषी सहाय्यक श्रीगोंदा
जांभूळ लागवड...
जांभूळ लागवडीसाठी हलकी,भारी,मध्यम कोणतीही जमीन चालते.
#बहाडोली या जातीच्या रोपांची लागवड केली. 15 बाय 15 फूट या अंतरावर लागवड केलेली आहे. लागवडीसाठी 3 बाय 3 चा खड्डा घेऊन त्यामध्ये शेणखत 1कॅरेट,
सुपरफाॅस्फेट पावडर 500 ग्रॅम
क्लोरो डस्ट 50 ग्रॅम व मातीच्या मिश्रणाने खड्डा भरून घेऊन लागवड केली.
लागवडीनंतर पहिल्या तीन वर्षापर्यंत आंतरपिके घेता येतात. लागवडीनंतर तिसऱ्या वर्षापासून उत्पन्नाची सुरुवात होते. चौथ्या वर्षी चांगले उत्पन्न मिळते. कोथिंबिरे फार्ममध्ये एक एकरामध्ये दोनशे रोपांची लागवड केलेली आहे. बहाडोली जातीच्या #जांभूळ झाडाचे डोळे आणून त्यांनी रोपे घरी तयार केली होते.त्यांच्याकडे आजही बारडोली जातीची रोपे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. चौथ्या वर्षी आत्तापर्यंत त्यांनी 5.5 टन जांभूळ विक्री केली आहे. झाडांवर शिल्लक जांभूळ अंदाजे 2.5 टन आहे. एक किलो वजनाचा बॉक्स पॅकिंग करून अडीचशे रुपये किलो दराने विक्री केली. लॉक डाऊन च्या काळामध्ये पुणे शहरातील हाउसिंग सोसायटी व मार्केट कमिटी मध्ये विक्री केली. एकूण उत्पन्न 14 लाख रुपये. एकूण खर्च 4 लाख रुपये. निव्वळ नफा 10 लाख रुपये
शासकीय अनुदान लागवडीसाठी अंतर दहा बाय दहा मीटर आहे
जांभूळ लागवड साठी शासकीय योजना
1/महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना
2/भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
या योजनेअंतर्गत 97 हजार रुपये अनुदान प्रति हेक्टरी मिळते
अनुदान तीन वर्षांमध्ये तीन टप्प्यांमध्ये मिळते
पहिल्या वर्षी 50 टक्के
दुसऱ्या वर्षी 30 टक्के
तिसऱ्या वर्षी 20 टक्के
आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे दर्जेदार व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा
#बळीराजास्पेशल #Balirajaspecial #शेती #शेतकरी
यूट्यूब
/ balirajaspecial
फेसबुक
/ balirajaspecial
इंस्टाग्राम
www.instagram....
ट्विटर
Di...