आयुष्यात ह्या गोष्टी जरूर आचरणात आणाव्या -स्वामी माधवानंद(स्वरूपयोग प्रतिष्ठान)

  Рет қаралды 2,439

Swaroopyog Pratishthan - Swami Madhavananda

2 жыл бұрын

स्वरूपयोग प्रतिष्ठान
● हरि ॐ किंवा आपल्या आवडत्या नाममंत्राचे स्मरण करीत जावे.
● उठल्यावर मनात येणारा व तोंड धुऊन झाल्यावर उच्चारला जाणारा पहिला शब्द मंत्राचा असेल असा प्रयत्न करावा. मंत्राला ईश्वरस्मरण जोडलेले असावे.
● घरातून बाहेर जाताना किंवा आत येताना, कोणतीही गोष्ट सुरू करताना व पूर्ण करताना मंत्राने ईश्वरस्मरण करावे.
● आनंदात, हसतमुख रहावे, काळजी करु नये, मैत्रीपूर्ण जीवन जगावे.
● संध्याकाळी शक्य झाल्यास देवापुढे दिवा लावून, किमान तीन वेळा नाममंत्र स्मरण करून, परमेश्वराला नमस्कार करावा.
● दिवसातून एकदा परमेश्वरापाशी 'मला सांभाळ' आणि 'सगळ्यांचे कल्याण कर' अशी प्रार्थना करावी.
● आपले काम कौशल्यपूर्ण करावे पण ते ईश्वरी शक्तीने चालले आहे याची जाणीव ठेवावी. त्याचे चांगले फळ ईश्वर देईल. त्याचा विचार करू नये.
● निवांत बसावे, डोळे मिटून कपाळाच्या मध्याशी किंवा टाळूशी लक्ष केंद्रित करावे. ॐ, सोऽहं, श्रीराम अशा कमी अक्षरे असलेल्या मंत्रांचे स्मरण मनात सुरू ठेवावे.
● आपले चैतन्यमय आत्मस्वरूप हे ईश्वरस्वरूप आहे म्हणून 'स्व' म्हणजे 'मी' च्या शुद्ध स्फुरणावर लक्ष केंद्रित करून जमेल तेवढा वेळ शांतपणे आत्मभावात राहावे. 'ईश्वर आहे' या भावावर चित्त ठेवावे.
● ईश्वरप्राप्ती म्हणजेच ज्ञानप्राप्ती हेच मानवी जीवनाचे मुख्य ध्येय आहे, याचे स्मरण ठेवून उपासना आवडीने पूर्ण करावी.
● उपासनेतून लाभलेल्या मानसिक स्थिरतेतून एकाग्रतेने आपली जीवन व्यवहारातील सर्व कर्तव्ये पूर्ण करावीत. ईश्वरी सत्तेच्या जाणिवेसह उत्तुंग ध्येय साध्य करण्याचा उत्साहाने प्रयत्न करावा.
स्वामी माधवानंद
स्वरूपयोग प्रतिष्ठान-०२०-२५६५२४५७
#जीवनातीलमहत्वाच्यागोष्टी
#LifePrinciples
#रोजचीसाधना
#दैनंदिनउपासना

Пікірлер
Русалка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 6 МЛН
DO YOU HAVE FRIENDS LIKE THIS?
00:17
dednahype
Рет қаралды 114 МЛН
ТАМАЕВ УНИЧТОЖИЛ CLS ВЕНГАЛБИ! Конфликт с Ахмедом?!
25:37
Русалка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 6 МЛН