Рет қаралды 397,439
Nothing compares to the homemade food made by your mother. As she pours her love and garnishes it with affection, the taste of that comfort food is beyond everything else. Watch Parna Pethe take a stroll down memory lane as she cooks her all-time comfort food with her mother, Rohini Pethe, in this episode of Aaichya Hatcha. For more such content, subscribe to #Bha2Pa now!
वरण फळं/ डाळ ढोकळी/ चकोल्या
साहित्य:
तुरीची डाळ
उकळतं पाणी
हळद
हिंग
कणिक
चण्याचे पीठ
तेल
ओवा
लाल तिखट
गोडा मसाला
मेथीचे दाणे
चिंच
गूळ
लसूण
कढीपत्ता
टोमॅटो
कोथिंबीर
तूप
कृती:
सर्वप्रथम कुकरमध्ये तुरीची डाळ, उकळतं पाणी, हळद आणि हिंग घालून गॅसवर शिजायला ठेवावे. एका बाजूला गरम पाण्यात चिंच व गूळ भिजत घालावे. दरम्यान एक भांडं कणिक व अर्ध भांडं चण्याचं पीठ घेऊन त्यात ओवा, लाल तिखट, गरम तेलाचं मोहन घालून त्याचा गोळा बनवावा. नंतर गरम तेलात मोहरी, मेथीचे दाणे, हळद, कढीपत्ता व शिजवलेली डाळ (वरण) घालून त्यात लाल तिखट, गोडा मसाला व चिंच गुळाचं पाणी घालावं व उकळी येऊ द्यावी. त्यानंतर पिठाच्या गोळ्याची पोळी लाटून शंकरपाळ्यांच्या आकारात काप करून ते उकळत्या वरणात एक एक करून टाकून आणखी काही वेळ पूर्ण शिजवून घ्यावे. सर्व्ह करतांना कच्चा टोमॅटो आणि कोशिंबीर बारीक कापून त्यावर टाकावी आणि तुपाची धार सोडावी.
तांदुळाची उकड
साहित्य:
ताक
तांदुळाचं पीठ
तेल
मोहरी
जिरं
कढीपत्ता
लसूण
लाल तिखट
हळद
कृती:
घुसळलेल्या ताकात तांदुळाचं पीठ टाकून एकत्र करावं. ताक थोडं पातळ राहील अशा प्रमाणात पीठ टाकावं. नंतर कढईत गरम तेलात मोहरी, जिरं, लसूण, कढीपत्ता परतून त्यात ते ताक घालावं. थोड्या वेळाने त्यात हळद आणि लाल तिखट घालून उकड घट्ट होईपर्यंत चमच्याने हलवत राहावं. सर्व्ह करतांना वरून तूप टाकल्यास अधिक उत्तम!
Visit bhadipa.com/ for more videos and events!
Follow us on :
/ bhadipa
/ bhadipa
/ bha2pa
For more comedy & entertainment, subscribe to Bharatiya Digital Party!
/ bharatiyadigitalparty
Featuring :
Parna Pethe
Rohini Pethe
Directed by: Omkar Jadhav
Cinematographer: Aditya Divekar, Ankush Kulal
Creative Producer: Anusha Nandakumar
Editor: Anuja Bhandare, Tanwee Paranjpe
Sound: Sourabh Morgaonkar
Production: Prajakta Salbarde
Production Assistant- Kedar Naidu
Social media team: Aniket Jadhav, Pooja Parab, Karan Sonawane, Tanvi Kulkarni
Creatives: Prajakta Newalkar
Transport- Shubh Tours and Travels- Mahadev Koli
Subtitles - Madhura Bal