Рет қаралды 23,336
महाराष्ट्रात अधिक मासाला धोंड्याचा महिना या नावाने ओळखलं जातं. हिंदू धर्मात अधिकमास अतिशय पवित्र मानला जातो. नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी हा महिना सर्वाधिक खास असतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा महिना म्हणजे जावयालाचे लाड करणाचा महिना असतो.
या महिन्यात सासुरवाशीणीचे आई वडील जावयला घरी बोलवून त्यांना रितसर गंध वगैरे लावून ओवाळतात. पंचपक्वाने त्यांचा मानपान केला जातो. जावयाला अधिकमासाचं वाण दिलं जातं. हिंदू धर्मात मुलगी-जावयाला लक्ष्मीनारायणाचा जोडा मानतात. म्हणून जावयाला तुपात तळलेले तेहतीसच्या पटीत अनारसे देतात. एका चांदीच्या अथवा तांब्याच्या ताम्हणात अनारसे ठेवून त्यावर तांब्याचा दिवा ठेवून तो लावून जावयाला देतात. अनारसे ऐवजी बत्तासे, म्हैसूरपाक, वगैरे जाळीदार पदार्थ द्यावयाचे असतात, यांची संख्या ३३ असावी. या महिन्यात नारळ, सुपाऱ्या, फळे यांसारख्या वस्तू सुद्धा तेहतीसच्या पटीत घेऊन दान करतात.
लक्ष्मी मातेला चांदी अतिशय प्रिय आहे, त्यामुळे जावयाला चांदीच्याच भेटवस्तू दिल्या जातात. धार्मिक दृष्टिकोनातून चांदी हा अत्यंत पवित्र आणि सात्विक धातू मानला जातो. मान्यतेनुसार, चांदीची उत्पत्ती भगवान शंकराच्या डोळ्यांतून झाली आहे अशी मान्यता आहे. चांदीचा संबंध प्रेमाचा कारक शुक्र, धनाचा आणि मनाचा कारक चंद्राशी आहे असे म्हटले जाते. चांदी शरीरातील पाणी आणि घटक नियंत्रित करते. यासोबतच शरीरातील समस्या दूर करण्यासाठीही याचा उपयोग होतो. मुलीचं आयुष्य सुखी करण्यासाठी अधिक महिन्यात जावयाला चांदीच्या वस्तू भेट देतात.
देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा आशिर्वाद मिळविण्यासाठी दिप दानाला महत्त्व आहे. जावयाला निरंजन दिल्यामुळे तुम्हाला लक्ष्मी आणि भगवान विष्णूचे आशीवार्द मिळतात. जेव्हा तुम्ही चांदीचं निरंजन जावयाला देतात तेव्हा तुमच्यावरील यम, शनी, राहू आणि केतू ग्रहांचे वाईट परिणामही कमी होतात असे सांगितले जाते.
----
Used Camera : iPhone 13 Pro Max
Editing Tool: Inshot