No video

अखिल गिर्यारोहण महाराष्ट्र महासंघ निर्मित 'गोपाळ नीलकंठ दाण्डेकर - किल्ले पाहिलेला माणूस'

  Рет қаралды 109,669

Akhil Maharashtra Giryarohan Mahasangh

Akhil Maharashtra Giryarohan Mahasangh

Күн бұрын

Kille Pahilelaa Manus.
ज्यांनी दुर्ग ही तीर्थक्षेत्रे मानली व संपूर्ण आयुष्य दुर्गभ्रमंती मधे झोकून दिले, असे दुर्ग महर्षी - गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर यांच्या आयुष्यावर आणि विचारांवर हा माहितीपट बनवण्यात आला आहे. किल्ले हे स्फूर्ति स्थाने आहेत, त्यांचे जतन संवर्धन हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, हा या माहितीपटामागील दृष्टिकोन आहे.

Пікірлер: 233
@bhushankarmarkar12
@bhushankarmarkar12 2 жыл бұрын
"अप्पा ही नाहीत अणि आता बाबासाहेबही गेले.." हे वाक्य ऐकताना डोळ्यांतून अश्रूंचा बांध फुटला .. मस्त डॉक्युमेंटरी केली आहे. प्रत्येक गडप्रेमिने आवर्जून बघावी अशी.
@atulkachare1694
@atulkachare1694 2 жыл бұрын
खर आहे दादा
@nishantsalunke7077
@nishantsalunke7077 2 жыл бұрын
Ho kharach e
@suhasparkhi4320
@suhasparkhi4320 Жыл бұрын
खरंच रडू कोसळले..😭 ज्यांनी हे वाक्य बोलले त्यांचे नाव काय आहे
@yashhambir7963
@yashhambir7963 2 жыл бұрын
माझ्या लहानपणी साधारण 1980 90 च्या काळात तळेगांव दाभाडे येथे आदरणीय अप्पा यांना बघण्याचा अनुभवण्याचा योग भरपूर वेळा आला.... अप्पा शाळा चौक येथे राहायचे... शाळेत जाताना येताना... शिकवणीला जाताना येताना.. गणेश वाचनालयात सुद्धा अप्पा यांना भरपूर वेळा पेपर मासिक वाचताना पाहिलंय... आपण किती महान आणि मोठ्या व्यक्तीच्या सहवासात आहो.. हे शालेय जीवनात आम्हाला कळण्याचे वय नव्हते... माझे आजोळ विलेपार्ले मुंबई येथे आहे... शाळेच्या सुट्टीला मुंबईला नेहमी जात असे... सुट्टी संपून परत तळेगाव येथे येताना(आई वडीलांबरोबर)...अप्पा मुंबईला कामा निमित्त आले की परतीच्या प्रवासात दादर ते तळेगांव असा ट्रेन (सिंहगड एक्स्प्रेस) च्या प्रवासात बरेच वेळा अप्पांचा सहवास लाभला ... अप्पांचे कार्य आम्हा मावळ तळेगाव दाभाडे येथील लोकांना लाभले.. हे आमचे भाग्य... अप्पा तुम्ही आमच्या कायम हृदयात रहाल....
@rohinipingle12
@rohinipingle12 2 жыл бұрын
खूपच छान!!!अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही !!!अप्रतिम !!!शब्दच नाही माझ्याकडे!!!
@dineshgokhale1643
@dineshgokhale1643 2 жыл бұрын
फारच अप्रतिम माहिती दिली आहे हि क्लिप बघून आपण माहिती सांगताना गडा वरच फेर फटका मारतो आहे असे वाटते. दिनेश गोखले.
@Dhaniwari143
@Dhaniwari143 Жыл бұрын
मी माझ्या जीवनात ३२ गडकिल्ले सर केलेले आहेत पण हा व्हिडिओ पाहिल्याने मला माझ्या आयुष्यात १००किल्ले सर करण्याचे धाडस तयार होते.. It's very good
@santoshpargavkar
@santoshpargavkar 2 жыл бұрын
स्क्रिप्ट कुणी लिहिलीय... एकदम भन्नाट. खुप चांगली कलाकृती
@umeshzirpe2241
@umeshzirpe2241 2 жыл бұрын
श्री.मिलिंद भणगे यांनी लिहिली आहे
@manishmohite5515
@manishmohite5515 2 жыл бұрын
गो नी दा, म्हणजे साहित्य आणि भ्रमंती स्वानुभावाने सांगणारा अवलिया. जय महाराष्ट्र 🚩. अंगावर काटा आला! हीच आप्पांना खरी आदरांजली. खूप खूप धन्यवाद.
@gajananjoshi1146
@gajananjoshi1146 4 ай бұрын
आप्पा दांडेकर यांचे समवेत राजमाची , तुंग तिकोना व रायगड येते शिवप्रभू यांचा राज्याभिषेक सोहळा ( त्रिशताब्दी ) असे तीन दौरे करण्याचं भाग्य आम्हाला लाभलं . त्या सर्व आठवणी जाग्या झाल्या . माहितीपट करणारी सर्व मंडळी , इतर सर्व संबंधित व्यक्तीचं अभिनंदन आणि शुभेच्छा . गजानन जोशी ठाणे
@nandanwandre5339
@nandanwandre5339 2 жыл бұрын
केवळ अप्रतिम, अभुतपुर्व, आप्पा आणि बाबासाहेब आठवणीने डोळ्यातील अस्वे थांबू शकले नाहीत
@WMihir22
@WMihir22 2 жыл бұрын
अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी लघुपट ! कै. अप्पांना विनम्र अभिवादन आणि हा लघुपट तयार करणाऱ्या सर्व टीम चे मनापासून आभार ! 🙏 जय भवानी ! जय शिवराय ! 🙏🚩
@SimantiniTemkar
@SimantiniTemkar 2 жыл бұрын
गो.नि.दा. यांचे आत्मचरित्र'स्मरणगाथा'वाचतांना अनुभवलेल भारावलेपण हा लघुपट पाहतांना पुन्हा तसाच अनुभवला.एका आयुष्यात काय काय आणि किती कता येत हे बघायच असेल तर गोनिदांं' च जीवनचरीत्र उत्तम उदाहरण आहे.....खूपच उत्तम निर्मिती ...
@drmukundpatil5569
@drmukundpatil5569 2 жыл бұрын
आप्पांना विनम्र अभिवादन 🙏🏻💐
@nileshkatkar145
@nileshkatkar145 2 жыл бұрын
आजकालच्या धावपळीच्या जगामध्ये अप्पा म्हणजे एक विश्रांतीचे ठिकाण. अप्पांच कुठलाही पुस्तक वाचले की मन त्यांच्यासोबत थेट त्या गडावर जाऊन पोहोचत. अप्रतिम माहितीपट..
@sunilshindevlogs1560
@sunilshindevlogs1560 2 жыл бұрын
खरोखर अंगावर शहारे येतात....आपण केलेल्या मेहनतीचे चीज होणार..शेवटच्या श्वासापर्यंत सह्याद्री ची सेवा करु
@gauriagashe6666
@gauriagashe6666 2 жыл бұрын
किल्ले पाहिलेला माणूस पेक्षा किल्ले जागवलेला व शिव काल जगलेला माणूस विनम्र अभिवादन अप्पा
@rajivjadhav5945
@rajivjadhav5945 4 ай бұрын
नितांत सुंदर महितीपट या उत्कृष्ट निर्मितीत सहभाग घेणा-या सा-या मावळ्यांचे मनापासुन अभिनंदन
@sandeepdhodre1759
@sandeepdhodre1759 2 жыл бұрын
अप्रतिम व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघावासा वाटतो आणि प्रत्येक वेळी डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.....
@ruchavalwade2107
@ruchavalwade2107 2 жыл бұрын
बरेच दिवसांनी एक अप्रतिम कलाकृती अनुभवली. एवढ्या ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तीमत्वास न्याय देणे, ही सोपी गोष्ट नाही. हे शिवधनुष्य लीलया पेलले आहे. आणि एकप्रकारे ऐतिहासिक वारसा कसा जपायचा आहे आणि पुनरुज्जीवित करायचा आहे, ह्याची जाणीव नवीन पिढीला करून दिली. तुम्हा सर्वांना खुप खुप धन्यवाद 🙏 गोनीदांना त्रिवार वंदन 🙏
@prasadphatak5900
@prasadphatak5900 2 жыл бұрын
खूप छान 👌 नव्या पिढीला नव्या माध्यमातून आप्पा कळणे आवश्यक आहे, ते आपण केल्याबद्दल धन्यवाद..
@sourabhvathare549
@sourabhvathare549 2 жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण.... पाय आपोआप किल्ल्याकडे वळतात......🙏 मनापासून आभार 🚩🚩🚩🚩🚩🚩
@anantparanjpe250
@anantparanjpe250 2 жыл бұрын
अतिशय सुंदर चित्रफीत! अप्पा ना प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला नाही, पण त्यांची बहुतेक सगळी पुस्तके अनेकदा वाचली आहेत. त्या पैकी कादंबरीमय शिवकाल, दुर्गभ्रमण गाथा, ह्या पुस्तकांची तर असंख्य पारायणे झाली आहेत. या दुर्ग वेड्या, तपस्वी माणसाला मानाचा मुजरा! ही चित्रफीत बनवणाऱ्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन!
@Akshayhelande
@Akshayhelande 2 жыл бұрын
शेवटचं वाक्य अगदी हृदयात शिरतं.... आणि अगदी जखम झाल्यावर ज्या भावना उमटतात तशाच भावना मनाला जाणवतात.
@gvkulkarni25
@gvkulkarni25 2 жыл бұрын
खुप छान खुप सुंदर खुप मस्त खुप कौतुक करावं असा माहितीपट शहारुन येते बघतांना खुप खुप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
@Educationlovers368
@Educationlovers368 8 ай бұрын
खूप मोठं काम केले तुम्ही. तुमच्या मुळे आम्हाला इतिहास समजला.खूप छान डॉक्युमेंटरी बनवली आहे.
@nitinmhatre4408
@nitinmhatre4408 2 жыл бұрын
अतिशय सुंदर चलचित्रफित आहे..
@paddykhot2211
@paddykhot2211 2 жыл бұрын
खूप छान काम.. आमच्या सारख्या नवीन पिढी साठी प्रेरणा देण्याचं काम केलेत.. त्याचबरोबर आम्हाला एक माहिती नसलेलं व्यक्तिमत्व डोळ्या समोर खूप छान पद्धतीनं दाखवलं त्या बद्दल तुमचे खूप खूप आभार...
@priyalhitty839
@priyalhitty839 3 күн бұрын
शतशः नमन
@ProfDipikaJangam
@ProfDipikaJangam 2 жыл бұрын
खुप छान माहिती पूर्वक🙏🚩🙏
@sadhanapardeshi2586
@sadhanapardeshi2586 2 жыл бұрын
अतिशय सुंदर डॉक्युमेंट्री . सर्वच टीमचे मनापासून आभार या सुंदर कलाकृतीबद्दल आणि अप्पांना , आणि बाबासाहेबांना नमन. एकदा व्हिडिओ सुरू केला की शेवटपर्यंत पाहणारच असे सुंदर वर्णन केले आहे. Thanks, once again.
@mangaldatar9579
@mangaldatar9579 2 жыл бұрын
मन भारावलेली जीवामृत देणारी कलाकृती बद्दल गुरुवर्य अप्पासाहेब दांडेकर यांना नमन.
@rudrapatil5196
@rudrapatil5196 2 жыл бұрын
अप्रतिम... याच्या पेक्षा जास्त काय बोलू शकतो....अप्रतिम
@vivekkamble5249
@vivekkamble5249 2 жыл бұрын
निव्वळ अप्रतिम लघुपट. धन्य ते छत्रपती शिवराय ज्यांनी त्यांच्या पुढच्या पिढीतील अनेक मावळ्यांना स्फुरण दिले. कमालीचे छायाचित्रण तितकंच सुंदर लिखाण आणि उत्कृष्ट निवेदन. अतिशय रोमांचक सफर, काही वेळा तर डोळे ही ओलावले.. सर्व टीम चे मनःपूर्वक आभार🙏
@sanjaypakle6828
@sanjaypakle6828 2 жыл бұрын
शिवप्रभूंचे असंख्य किल्ले पाहिलेला अवलिया ,गोनिदा यांचा हा video अप्रतिम झालाय.त्यांच्या दुर्गभ्रमंतीची अत्यंत अभ्यासपूर्ण माहिती ह्या video मधून मिळाली. सर्व गडप्रेमींसाठी ही आनंदाची बाब आहे. छत्रपति शिवरायांच्या काळात गेल्यासारखे वाटतेय.
@vishalpatilvlogs8272
@vishalpatilvlogs8272 2 жыл бұрын
असा अवलिया आमच्या पिढीला अनुभवायला न मिळणं हे आमचं दुर्भाग्य आहे.
@rajendrakende5460
@rajendrakende5460 2 жыл бұрын
असा अवलिया होणे नाही. अप्पांची बरिच पुस्तके वाचली. राजगड, रायगड व राजमाची आजही अप्पांची आठवण ताजी करून देतात. अप्पा शतशः प्रणाम. 🙏
@mayawaghmare3068
@mayawaghmare3068 4 ай бұрын
लघुपट अतिशय सुंदर अप्पांना वंदन, धन्यवाद
@sng2157
@sng2157 2 жыл бұрын
आताची पिढी किल्ल्यांना मज्जा मस्तीचे ठिकाण समजतात.
@ranjitrupe1480
@ranjitrupe1480 2 жыл бұрын
एक झपाटलेला भ्रमंतीकार संन्यासी, ह्या दिव्य विभुतीला शत:श नमन 🙏
@yogeshmohite5434
@yogeshmohite5434 2 жыл бұрын
आप्पांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
@govindramchandra7421
@govindramchandra7421 2 жыл бұрын
सर्व बाबतीत सुंदर व्हिडिओ क्लिप. गोनिदा व बाबासाहेबांनी पुस्तकाद्वारे शिवकालाची सुंदर माहिती दिली ती कोणीही विसरू शकत नाही. या क्लिप मुळे शिवकाल व गड किल्ले पुन्हा समोर आले. व्हिडिओ क्लिप निर्मिती मधील प्रत्येकाला मानाचा मुजरा.
@sagarphanse9255
@sagarphanse9255 2 жыл бұрын
खूपच छान..👌👌 आप्पाना विनम्र अभिवादन💐
@shashankkulkarni9734
@shashankkulkarni9734 2 жыл бұрын
अप्रतिम अनुभव. जे लोक प्रत्यक्ष किल्ले बघू शकत नाहीत त्यांनी आप्पांनी लिहिलेले अनुभव त्यांच्या पुस्तकांमधून मिळवावे. धन्यवाद.
@shailaparanjape6463
@shailaparanjape6463 2 жыл бұрын
अप्रतिम 👌👌. आता गडकिल्ले ही पर्यटन स्थळे होऊ लागली आहेत, हे दुर्दैव आहे खरंच. ही जाणीव झाली पाहिजे 😔
@milinddandekar9980
@milinddandekar9980 2 жыл бұрын
खूपच छान... नवीन चैतन्य मिळेल आणि नवीन प्रेरणा मिळेल.... खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे 🚩🚩🚩
@sumitrovelogs8773
@sumitrovelogs8773 2 жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण.............
@shobhatikam1334
@shobhatikam1334 2 жыл бұрын
जय भवानी!जय शिवाजी!!या जय घोषाची आठवण पुन्हा जागी झाली.आप्पांच्या या गडभ्रमंती मधून,त्यांच्या लिखित साहित्यातून आम्हाला त्याचा अनुभव घेता आला.त्रिवार वंदन!मानाचा मुजरा!!!🙏🙏🙏🌹🌹🌹💐
@prakashthasal4350
@prakashthasal4350 Жыл бұрын
शिवप्रेमी आप्पांना प्रणाम
@sangitadalvi6672
@sangitadalvi6672 2 жыл бұрын
अप्रतिम🙏 👌
@kunaltakalkarkt7650
@kunaltakalkarkt7650 2 жыл бұрын
❤️ खूप छान... प्रतेक गड प्रेमींनी अवश्य पहा💕
@neelasawant5348
@neelasawant5348 2 жыл бұрын
अप्रतिम, शब्द नाहीत, मनातील भावना व्यक्त करण्यासाठी. डबडबलेल्या डोळ्यांसमोर आप्पा आणि बाबासाहेब साक्षात उभे राहिले.
@archanatadphale
@archanatadphale 2 жыл бұрын
खरेच सर्व ऐकून, बघून मनाला खूप आनंद मिळाला !
@bhagyashrikakade4413
@bhagyashrikakade4413 2 жыл бұрын
खूपच सुंदर आणि प्रेरणादायी
@mohanedhate9011
@mohanedhate9011 2 жыл бұрын
मस्त🙏🙏😍❤️🚩
@vijaym1906
@vijaym1906 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻. सुंदर व्हिडिओ आणि अप्रतिम निवेदन 🙏🏻🙏🏻
@jaihind421
@jaihind421 2 жыл бұрын
एक अतिशय भन्नाट आणि अविस्मरणीय अनुभव ... गड किल्ले भ्रमंती ... आणि हा व्हिडीओ बघणे ..
@jyotibaal1331
@jyotibaal1331 2 жыл бұрын
अतिशय सुंदर documentary,... निवेदन ही अप्रतिम, गो नी दा ना साष्टांग 🙏🙏🙏🙏
@madhurajoshi-deshpande5062
@madhurajoshi-deshpande5062 2 жыл бұрын
अप्रतिम... ह्रदयस्पर्शी...सर्वांनी शेवटपर्यंत जरूर पहा
@ExplorerSwap
@ExplorerSwap 2 жыл бұрын
अप्रतिम व्हिडिओ. मी हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिला आहे. या प्रकारची व्यक्ती जगाला माहीत नाही हे दुर्दैव आहे. हा व्हिडीओ माझ्या ब्राउझ पेजवर आला म्हणून मलाही कळले. खूप छान व्हिडिओ आहे. अप्रतिम लेखन. छान व्हिडिओग्राफी. आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती सर्जनशीलपणे मांडली गेली आहे. हा व्हिडिओ बर्‍याच लोकांपर्यंत पोहोचावा अशी माझी इच्छा आहे.
@manohartemghare4298
@manohartemghare4298 2 жыл бұрын
खुप खुप धन्यावाद आप्पा तुमच्या कार्यला मानाचा मुजरा 🙏
@SwanandNatu
@SwanandNatu 2 жыл бұрын
अप्रतिम! 💚💙💜
@TheShashin
@TheShashin 2 жыл бұрын
आप्पा तुम्हाला दंडवत 🙏🙏🙏
@pradipshelke5779
@pradipshelke5779 2 жыл бұрын
Khup khup chaan.Appaanche sakshat darshan zale!
@kishorthosar1178
@kishorthosar1178 2 жыл бұрын
अप्पांसाठिची, तुमच्या शब्दांमधली स्तुतीसुमने कितीदा ती गहिवरून आणतात... खर्या अर्थाने राकट सह्याद्री आणि गडकोट जगलेला कणखर अवलीया, अप्पांच्या स्मृतींना प्रणाम.🙏🏻 एका दुर्गविराच्या सह्याद्रीमय मेजवानीसाठी धन्यवाद!! हर हर महादेव!🚩 जय भवानी, जय शिवाजी!! 🚩🇮🇳⛰️🌱🌳🌵♥️
@shruti.ghayal
@shruti.ghayal 2 жыл бұрын
अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी.. खूप सुंदर 🙏
@4Surprise
@4Surprise 2 жыл бұрын
अप्रतिम कलाकृती. गो.नि.दां., किल्ले पाहिलेला माणूस पहाताना अंगावर काटा येतो. शहारून येते. महाराष्ट्राच्या वैभव, इतिहास व किल्ले कसे पहावे हे संस्कार गो.नि.दां मुळे झाले. धन्यवाद.
@ganeshmankar1248
@ganeshmankar1248 2 жыл бұрын
अप्रतिम माहितीपट...👍🏼👍🏼🚩🚩
@KetanTupe
@KetanTupe 2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद..! एक अतिशय सुंदर documenty आपण गोनिदा वर बनवून आमच्या नव्या पिढीला एक अनमोल ठेवा दिला आहे..!👌👌👌👌👍👍👍👍
@makaranddeshpande9990
@makaranddeshpande9990 2 жыл бұрын
अतिशय सुंदर! आप्पांच्या पवित्र स्मृती ला नमन 🙏🏻 . वीसेक वर्ष आधी हडसर ते जीवधन ट्रेक करताना रात्री वाटेतील एका झोपडी वजा घरात वस्ती केली होती. तिथल्या आज्जींनी गोनीदांनी त्यांच्या कडे वस्ती केल्याचे आवर्जुन सांगितले होते.
@sachinpawar2971
@sachinpawar2971 2 жыл бұрын
शतशः प्रणाम, गो. नी. दा.
@bhushanmeher4084
@bhushanmeher4084 2 жыл бұрын
अप्पांच्याच शब्दांत सांगायचे तर, "केवळ अप्रतिम".!! अप्पांच्या दुर्गभ्रमणगाथेच्या पारायणांचा किल्ले भटकंतीचे वेड लावण्यात मोठा वाटा आहे.. शतश: नमन अप्पा🙏🙏
@girdhara_dairy_farm
@girdhara_dairy_farm 2 жыл бұрын
Khup sundar video, purn 40 minutes kontari mazya khup jawalachya vyakti baddal boltay as vatat rahil, shevatachi 15 minutes khup emotional krun gelit.👏👏
@shaileshtupe1546
@shaileshtupe1546 2 жыл бұрын
अप्रतिम चित्रफीत.. आप्पांना विनम्र अभिवादन 💐
@vedatmankelkar1017
@vedatmankelkar1017 2 жыл бұрын
Apratim!
@prashantdeole174
@prashantdeole174 Жыл бұрын
Vandematram
@Pra680
@Pra680 2 жыл бұрын
नितांत सुंदर माहितीपट. संपूर्ण टीमचे खूप खूप धन्यवाद. खरंतर अजून मोठ्या लांबीचा माहितीपट पाह्यला आवडला असता. मुकुंद काकांच्याकडून आप्पांच्या काही आठवणी ऐकण्याचा योग लाभला होता राजमाची ला एकदा. 🙏🙏🙏🙏🙏
@Lalitpawar1998
@Lalitpawar1998 2 жыл бұрын
Manus mhanun mi hai aayushyat Dhanya zaloooo❤️🙏
@shekharkhandagale1288
@shekharkhandagale1288 2 жыл бұрын
आप्पांना विनम्र अभिवादन
@ashwinikelkar4317
@ashwinikelkar4317 2 жыл бұрын
फार छान अनुभव. छायाचित्रण अप्रतिम.
@satwajikokane7027
@satwajikokane7027 2 жыл бұрын
अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण डॉक्युमेंटरी... सर्व टीमचे मनःपूर्वक आभार
@vivek.salunke
@vivek.salunke 2 жыл бұрын
शिवाजी महाराज की जय. अतिशय सुंदर, त्यांच्या आठवणी जाग्या झाल्या. त्यांचं पुस्तक पडघवली मी वाचलं आणि माझ्या कोकणातील गावात मी त्याच प्रतिबिंब शोधु लागलो.
@susmitapatil4838
@susmitapatil4838 2 жыл бұрын
अप्रतिम!! गो नी दांडेकर बद्दल ऐकले होते आज त्यांच्या विषयी बरंच कळले.. अशी ध्येयवेडी माणसं आहेत म्हणूनच नव्या पिढीपर्यंत आपला खरा बलशाली इतिहास पोहोचतोय...छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहेतच पण अप्पांसारखे ध्येयवादी माणसांना त्यांच्या कर्तुत्वाने दैवत्व प्राप्त होते.... तेथे कर माझे जुळती🙏🙏
@pramodjoshi5349
@pramodjoshi5349 Жыл бұрын
Apratim I am a great fan of GND appa
@vivekkalokhe3568
@vivekkalokhe3568 2 жыл бұрын
Khup sundar. Abhiman ahe tumach amhala.
@akashpol3669
@akashpol3669 2 жыл бұрын
किल्ले जगलेला माणूस 🚩🙏
@shreeja_laxmi2445
@shreeja_laxmi2445 2 жыл бұрын
Superb...Apratim...👌🏻
@Dhaniwari143
@Dhaniwari143 2 жыл бұрын
Khup chhan
@milindswami6280
@milindswami6280 2 жыл бұрын
विनम्र अभिवादन 🙏🏻
@ganpatnagupillay4887
@ganpatnagupillay4887 2 жыл бұрын
Very nice documentary. I salute Appa. Go. Ni. Da. Being Talegaonkar. 🙏🙏
@PravinMohite
@PravinMohite 2 жыл бұрын
I always feel lucky to meet GoNiDa ..I was child and was used to trek Raigad ...Learn the history from him during diwali Balshibir and feel blessed ... Great Man and Great Teacher ...
@abhijit_tabla
@abhijit_tabla 2 жыл бұрын
अप्रतिम कलाकृती
@kavitapawar5614
@kavitapawar5614 2 жыл бұрын
🌺ऐसै राजे होणे नाही🌺
@MH15ADVENTUREMaharashtra143
@MH15ADVENTUREMaharashtra143 2 жыл бұрын
🔥🔥🔥🔥🔥
@divyathombare7516
@divyathombare7516 2 жыл бұрын
खूपच अप्रतिम माहितीपट...👏👏 कमाल निवेदन!!! 🙌💯 आप्पांच्या तोंडून किल्ल्यांचा इतिहास, किल्ल्यांसंबंधित आपल्याला असलेले प्रश्न आणि त्यांची अप्पांनी दिलेली उत्तरं, गडमित्रांच्या आठवणी आणि सर्वच माहितीचे संकलन, मांडणी, छायाचित्रण ...निव्वळ अप्रतिम...👏
@sanjayaher356
@sanjayaher356 2 жыл бұрын
अतिशय सुंदर
@vinayakboralkar9693
@vinayakboralkar9693 2 жыл бұрын
खूप छान माहिती
@aratir9565
@aratir9565 6 ай бұрын
आदरणिय गो.नी.दा . उर्फ आप्पांना कोटी कोटी प्रणाम 🙏 चित्र फित खूप अप्रतीम केली आहे , सर्वांचे मनापासून अभिनंदन 🎉🙏
@eventidesolar1213
@eventidesolar1213 2 жыл бұрын
अविस्मरणीय
@jmatange
@jmatange 2 жыл бұрын
फार सुरेख documentary…. सुंदर दृश्य…व निवेदन.एखादी कथा ऐकावी असं वाटतलं.
@swapnilingle2098
@swapnilingle2098 2 жыл бұрын
आप्पा भेटतात शब्दांमध्ये, मृण्मयी, दुर्गभ्रमणगाथा, माचीवरचा बुधा आणि अश्या अनेक पण आज हि चित्रफीत पाहून मन गहिवरून आलं. खूप सुंदर प्रत्येक किल्ले भटकंती करणाऱ्याने प्रेरणा घ्यावं अशी.
@user-Anurag199
@user-Anurag199 8 ай бұрын
I proud of your Jay ma Bharati
@Im_mahi17
@Im_mahi17 2 жыл бұрын
अतिशय अप्रतिम
@shubhangikulkarni7841
@shubhangikulkarni7841 2 жыл бұрын
खूप सुंदर झाला आहे
هذه الحلوى قد تقتلني 😱🍬
00:22
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 91 МЛН