America-America chapter 15 , “ Bavarlele “ and a friend's solo international travel experience

  Рет қаралды 466

Dil Se by Deepa

Dil Se by Deepa

Күн бұрын

१५ ) बावरलेले
१५ ) दिलबाग मोना फारच excited होते. पहिलाच विमान प्रवास, तो पण अमेरिकेचा ! इंटरनॅशनल !!!
सूचनाच सूचना त्यांना मिळू लागल्या. आधीच बिचारे बावरलेले, त्यातून या सूचनांचं confusion !! कसा झाला असेल बरं त्यांचा प्रवास ?
गल्लीत सर्वदूर बातमी पसरली
दिलबाग - मोना अमेरिकेला निघाली
घरोघरी चर्चा सुरु झाली
सूचना देण्याची अहमहमिका लागली
कमरेला एक पाउच बांधा
त्यातच तिकीट,पैसे,पासपोर्ट ठेवा
काही तरी काय सांगतोस बर्व्या ?
तू कधी गेला होतास विमान प्रवासाला ?
ह्याचं काय तुम्ही काय ऐकत बसला ?
पासपोर्ट तिकीट हातातच असू द्या
बॅगा भरायला शेजारी पाजारी आले
प्रवासाला जणू तेच होते निघाले
Banned वस्तूंच्या यादीचे वाचन झाले
पटापट त्या वस्तूंना काढून टाकले
लोणचं चालायचं नाही ना ?
तांदूळ, जीरे पण ban आहेत ना ?
म्हणजे या जिन्नसा पॅक करायच्या नाहीत ना ?
सजनी, please एक काम कर ना !
ज्याला जे हवे असेल, वाटून टाक ना !
उगीचच वाया जायला नको ! हो ना !
कल्लाच कल्ला सुरु होता घरात
पसाराच पसारा पडला होता पुढ्यात
उठा उठा, आता बसू नका निवांत
चटा चटा तो पसारा आवरा बघू झटक्यात
अरे पप्या, तो वजनकाटा कुठे गेला ?
गधड्या ! स्वतःच वजन काय घेत बसला ?
बॅगेचं वजन हवंय ना करायला ?
सामानाचा अंदाज नको का घ्यायला ?
गच्चमुच्च होत्या बॅगा भरलेल्या
त्यांची चेन तयार होईना बंद व्हायला
पप्या ! नुसती गंमत बघत बसू नकोस
विठोबा सारखा उभा पण राहू नकोस
बॅगेवर नीट बस पाहू जरा
हां ! हां !! आता चेन लागली बरं का !
बाप रे ! मोना ! एवढं कुठलं सामान घेतलं ?
मी कुठे ? मी तर एवढंसंच सामान भरलं
असं कसं झालं ? मोनाचं तोंड पार उतरलं
“हे” मिळत तिकडे ! उगीचच कशाला घेतलं ?
खल-बत्ता ? तो ऑफिसर नाक ठेचेल आपलं !
भराभर मग बॅगेतलं सामान बाहेर आलं
आटपा आता लवकर लवकर
नाहीतर उशीर होई पोहचायला एरपोर्टवर
टॅक्सी की ओला ? शेवटी आली उबर
पोहचली जोडी एरपोर्टवर
सामान घेऊन पोहचले काउंटरवर
पण अपराध्याचे भाव का बरं दोघांच्या चेहऱ्यावर ?
तेवढ्यात facetime आला गुरमीत चा
मी काय काय सांगितलं, लक्षात ठेवा
माझा पत्ता फोन नंबर नीट लिहून ठेवा
जास्तीची माहिती देऊ नका कोणाला
समजलं नाही तर घाबरू नका
त्यांना रिपीट करायला सांगा
ठिकठिकाणी water fountain असतात
बाटल्या बिटल्या जवळ ठेवायच्या नसतात
अरे हो रे बाबा ! पुरे !! फोन ठेव आता !!
सुचू दे जरा ! गोंधळ वाढवू नकोस आमचा !
उग्गीचच आपलं !! आम्ही अडाणी आहोत का ?
विचारायला आम्हाला तोंड बिंड नाही का ?
Tension पायी दिलबाग जाम वैतागला होता
त्यात गुरमीत चा सारखा facetime येत होता
शेवटी जमलं सगळं नीट आरामात
बोर्डिंग पास घेऊन बसले विमानात
विंडो सीट मिळाली,तशी मोना आली खुशीत
बसली धीर एकवटून उड्डाणाच्या तयारीत
विमान उतरलं, अमेरिकेला पोहचलं
आता शेवटचं महत्वाचं टेन्शन उरलं !
पण immigration ला फार काही नाही विचारलं
कस्टम clearance पण आरामात झालं
दोघांचंही सामान विनासायास आलं
गुरमीत ने दोघांचं जंगी स्वागत केलं
दिलबाग मोनाचं अमेरिकेत स्वागत झालं
बावरलेल्या मायबापाचं चित्त आता स्थिरावलं
बावरलेल्यांचं चित्त शांत झालं
मायबापाचं चित्त शांत झालं

Пікірлер
UFC 310 : Рахмонов VS Мачадо Гэрри
05:00
Setanta Sports UFC
Рет қаралды 1,2 МЛН
Support each other🤝
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 81 МЛН
BAYGUYSTAN | 1 СЕРИЯ | bayGUYS
36:55
bayGUYS
Рет қаралды 1,9 МЛН