Рет қаралды 1,315
२१ ) स्थलांतरित
२१ ) तर ! एकंदरीतच, मुलांच्या मागोमाग त्यांचे पालक पण अमेरिकेत स्थलांतरीत होतात. मुलांना मदत व्हावी हा उद्देश त्यामागे असतो. काही पालक रमतात,पण मेजॉरिटी असेच म्हणतात ,” इथे नाहीच रहायचे आम्हास “ कारण त्यांना adjust करणे अवघड जाते अमेरिकेतल्या lifestyle शी. काही काळाने ते भारतात परत जातात. बघूया जरा स्थलांतरीत पालकांचे अनुभव !!!
कर्कश अलार्मने सुलु ला जाग आली
अजून लोळत पडायची इच्छा झाली
भारतातल्या घरी नाही, जाणीव झाली
घाईघाईत उठून आवरायला लागली
इथली,पद्धत आहे स्वावलंबनाची
नो कामवाली ! सर्व कामे स्वतः करायची
मशीन्स असतात अनेक प्रकारची
शिकायला मात्र हवे, ती कशी वापरायची
एकदा मुलगा-सून मागेच लागले
ड्रायविंग लयसेन्स काढायला लावले
सुलूला independant झाल्यासारखे वाटले
नवीन lifestyle स्वीकारणे सोपे गेले
रोजचा मग एक timetable ठरला
सगळी कामे आटपायचा धडाका लावला
एकदा का सोडले नातवंडांना शाळेला
कि जायचे मस्तपैकी walk ला
कधी तळ्यावर,तर कधी पार्क ला
छानसा विरंगुळा तिला सापडला
तिथे walkers चा ग्रुप जमायचा
Walk नंतर गप्पांचा फड रंगायचा
हलकासा व्यायाम पण व्हायचा
दिवस मग उत्साहात जायचा
आर्णव-अनन्या पण रिलॅक्स झाले
आईने हे जीवन स्वीकारले
सुलु आता अमेरिकेत रमली,
वरकरणी तरी तसे सर्वांना वाटले
अन्यथा, उगीचच अपराधी वाटायचे
जबाबदारी टाळतोय,असेच वाटायचे
देवळात जशी जाऊ लागली सुलु
तिथे भेटल्या आशा आणि मालू
Geeta chanting झाले चालू
हा ग्रुप पण वाढू लागला हळूहळू
दिवस कसाही निघून जायचा
तिन्हीसांजेला मात्र जीव कातर व्हायचा
आठव व्हायचा दूर राहिलेल्या मायदेशाचा
वाटे निर्णय नाही ना चुकला स्थलांतराचा ?
Settle होई तो, हाच अनुभव प्रत्येकाचा
Settle होई तो, हाच अनुभव प्रत्येकाचा