Рет қаралды 42,804
#BolBhidu #ShivJayanti2023 #ChhatrapatiShivajiMaharaj #ShivsrushtiProject
आपल्यातल्या प्रत्येकाला असं वाटत असणार ना कि शिवाजी महाराजांच्या काळात आपण जन्माला आलं पाहिजे होतं. प्रत्यक्ष स्वराज्य बघता आलं असतं. पण भूतकाळात जाऊन हे अनुभवणं शक्य नसलं तरी वर्तमानात आपल्याला ते प्रत्यक्ष डोळ्याने पाहता येणार आहे आणि महाराजांचा आवाजही ऐकता येणार आहे...शिवसृष्टी मध्ये. हो शिवकाळाची अनुभूती घेण्यसाठी पुण्यातील नऱ्हे - आंबेगावमध्ये शिवसृष्टी हा ऐतिहासिक थीम पार्क उभारला गेलाय. हे थीम पार्क आशिया खंडातलं सर्वात मोठं ऐतिहासिक थीम पार्क असणार आहे. या शिवसृष्टीचं लोकार्पण आज गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पार पडलं. आजपासून हि शिवसृष्टी शिवप्रेमींसाठी खुली करण्यात आलीय. शिवसृष्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर थोड्याच वेळात तुम्ही साडेतीनशे वर्षे मागे शिवाजी महाराजांच्या काळात जाल. आजच्या या व्हिडीओमध्ये जाणून घेऊया, शिवरायांच्या कर्तृत्वाने आजच्या पिढीला झपाटून टाकेल,अशा शिवसृष्टीबद्दल...
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/