Рет қаралды 97,336
#BolBhidu #JammuKashmirAssembly #Article370RestortionNews
जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम 370 च्या प्रस्तावावर गेल्या 3 दिवसांपासून गदारोळ सुरू होता. मात्र आता हा मुद्दा जम्मू-काश्मीरच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशपर्यंत पोहोचला आहे. महाराष्ट्रातील निवडणूक प्रचारसभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीर विधानसभेच्या विशेष दर्जाच्या पुनर्स्थापनेच्या प्रस्तावावरून काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर निशाणा साथला आहे. कलम 370 द्वारे काँग्रेसने 75 वर्षे जम्मू- काश्मीरला देशाच्या मुख्य प्रवाहापासून वेगळे ठेवले, असा आरोप पंतप्रधान मोदींनी केला, तसेच ही चूक त्यांच्या सरकारने सुधारली असा दावाही केला. पण जम्मू-काश्मीरमध्ये आता सरकार स्थापन होताच काँग्रेसनं षडयंत्र आखण्यास सुरुवात केली आहे, असा आरोप मोदी शहांकडून करण्यात आलाय. जगातील कोणतीही शक्ती कलम 370 परत लागू करू शकत नाही, असेही पंतप्रधानांनी स्पष्ट केलेलं आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील सांगली आणि कराड येथील सभेतही 370 च्या विषयावरून काँग्रेसला कोंडीत पकडले आहे.
हा झाला प्रचारसभेतील विषय. याच्या दुसऱ्या बाजूला जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम 370 बहाल करण्याच्या प्रस्तावावरून गदारोळ झाला. या गदारोळात, पूर्वीच्या राज्याचा विशेष दर्जा बहाल करण्यासाठी केंद्रानं निवडून आलेल्या प्रतिनिधींशी चर्चा करावी, अशी मागणी करणारा ठराव मंजूर करण्यात आलाय. विशेष म्हणजे जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देण्याचा ठराव चर्चेशिवाय मंजूर करण्यात आला. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज सविस्तर माहिती घेऊ जम्मू काश्मीर विधानसभेमध्ये कोणता ठराव मंजूर झाला आहे, त्यातून काय साध्य होणार आणि या ठरावावर अंतिम निर्णय कोण घेऊ शकतं ??
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/