Рет қаралды 254
अभिजात म्युझिक फोरम आयोजित लोणावळा खंडाळा संगीत महोत्सव हे तीन दिवसीय निवासी संगीत संमेलन (२० - २२ सप्टेंबर २०१९) अनेक कारणांनी संस्मरणीय झाले,
ज्येष्ठ, अनुभवी आणि युवा असा समतोल साधलेल्या ३२ कलाकारांचा गायन-वादन-नृत्याचा अविष्कार, त्याला संगीत या एकमेव उद्देशाने एकत्र जमलेल्या ४००+ रसिक श्रोत्यांची दाद, लोणावळ्याला मनःशांती केंद्रामध्ये कलाकारांच्या सान्निध्यात तीन दिवस मुक्काम, सुसंवादामुळे कलाकार आणि श्रोते यांच्यामधले कमी झालेले अंतर असे संमेलन आयोजकांचे उद्देश सफल झाले. वेगवेगळ्या शहरांमध्ये अनेक शास्त्रीय संगीत संमेलने अनेक होत असतात. एका वेगळ्या ठिकाणी आयोजित केलेल्या निवासी संगीत संमेलनामध्ये श्रोते वेगवेगळ्या गावामधून येतात इतर सर्व व्यवधाने बाजुला ठेवली जातात आणि पूर्ण लक्ष संगीत ऐकण्यावरच केंद्रित केले जाते. सर्वांचीच दैनंदिन व्यावधाने अनेक असतात, त्याशिवाय आपले लक्ष विचलित होण्यासाठी आजूबाजूला अनेक संधी उपलब्ध असतात. त्याला छेद देण्यासाठी निवासी संगीत संमेलन हा उत्कृष्ट पर्याय आहे.
The artists, the संगीतप्रेमी रसिक audience, the Organizers ..... all the stakeholders of Raga Music are together to rejoice this special atmosphere. A galaxy of artists is lined up for the Event LKSS. These artists and co-artists stay among us music-lovers on the same premises for about forty-eight hours. Comfortable modest accommodation and simple food for all the participants is arranged very close by the Concert Hall.
So, instead of the artists merely presenting their recitals spread over sessions, it'll be possible for the artists to be somewhat freely available to their fans and the inquisitive audience. Rasikas would always look forward to mingling with the artists. This is a unique feature imagined by us for this Sangeet Sammelan.
Here is Vidushi Manjiri Asnare-Kelkar sharing her thoughts about the experience at LKSS of ABHIJAT Music Forum