Рет қаралды 50,239
Introduction : Mrs Manisha Mahesh Naik
गीत - शंकर बालाजी शास्त्री
संगीत - वझेबुवा
स्वर - मा. दीनानाथ
नाटक - सन्यस्तखड्ग
नाट्य आणि संगीत आपल्या मनातील भावना प्रकर्षाने मांडत असतात. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात मराठीत अनेक संगीत नाटक लिहिली गेली. या संगीत नाटकांचा स्वातंत्र्य लढ्यात जनजागृतीसाठी माध्यम म्हणून वापर केला गेला. पुढील गीत हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी १९३१ साली, रत्नागिरीत स्थानबद्धतेत असताना लिहिलेल्या “सन्यस्त खड्ग” या संगीत नाटकातील हे गीत. या नाटकाबद्दल थोडक्यात सांगायचं तर …….
गौतम बुद्धांच्या प्रेरणेने शाक्य सेनापती विक्रम सिंह शस्त्रत्याग करून सन्यासी बनतो. जेव्हा शेजारील कौसल राजा शाक्यांवर आक्रमण करतो तेव्हा विक्रम् सिंहाचा मुलगा व सून हे आक्रमण रोखण्यास असमर्थ ठरतात. विक्रमसिंह आपल्या राज्याच्या रक्षणासाठी गौतम बुद्धाशी अहिंसा आणि नैतिकता यावर केलेल्या वाद विवादानंतर, तलवार उपसून शाक्याना विजयी करतो. प्रसंगी सन्यस्त वृत्ती पेक्षा कर्मयोग महत्वाचा हे सांगणाऱ्या नाटकातील हे गीत लिहिल आहे शंकर बालाजी शास्त्री यांनी.