Рет қаралды 437
जिव्हेश्वर या देवतेचा जन्म भगवान शंकर यांच्या जिव्हेपासून (जिभेपासून) झाला आहे, अशी श्रद्धा आहे. जिव्हेश्वर हे साळी (महाराष्ट्रातील विणकर) समाजाचे कुलदैवत असते.
जिव्हेश्वर भगवान
आद्यवस्त्र निर्माण करता म्हणून वेदमूर्ती भगवान श्री जिव्हेश्वर यांना ओळखले जाते. भगवान श्री जिव्हेश्वर यांचा जन्म भगवानशिव (महादेव) यांच्या जिव्हा/जीभेतून झाला. भगवान जिव्हेश्वर अंखंड साळी समाजाचे (भारत) दैवत आहे. भगवान जिव्हेश्वर हे भगवान शंकराचे (महादेव) चे अवतार आहे. सर्व देवांनी भगवान जिव्हेश्वर यांना पृथ्वी तलावर वस्त्र (कापड) निर्माण करण्यासाठी भगवान जिव्हेश्वर यांना जन्माला घातले, त्यामुळे यांना आद्यवस्त्र निर्माण करता म्हणुन ओळखतात.