Рет қаралды 49,059
माझी शाळा, माझा अभिमान!
भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालयात १० वी पर्यंत, तर ११ वी व १२ वी सह्याद्री ज्युनिअर कॉलेजमध्ये करून मी माझ्या शिक्षणाचा पाया भक्कम केला. या शाळेने मला सुंदर आठवणींसह बरंच काही दिलं. इथले शिक्षक, प्राध्यापक व माझे विद्यार्थी मित्र-मैत्रिणी, या सर्वांनी माझ्या बालपणीच्या आठवणींमध्ये सुंदर क्षणांची भर घातली आहे.
यंदा सह्याद्री ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेल्या ११ वीच्या विद्यार्थ्यांचा आज कॉलेजचा पहिला दिवस होता. यानिमित्त माजी विद्यार्थी म्हणून मला आमंत्रित केलं होतं. आपल्या कॉलेजमध्ये जाणं ही माझ्यासाठी नेहमीच आनंददायी गोष्ट असते. कार्यक्रमात सहभागी होऊन माझ्या कॉलेजच्या मुलांसोबत मनसोक्त गप्पा मारल्या, या शाळेसंदर्भातील माझ्या आठवणी त्यांना सांगितल्या व गप्पांच्या माध्यमातून मित्रत्वाच्या नात्याने त्यांना भविष्यातील वाटचालीबद्दल मार्गदर्शनही केलं. खरंच हा अतिशय अविस्मरणीय अनुभव होता.
सह्याद्री ज्युनिअर कॉलेजमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाचा व्हिडीओ तर पहाच, पण कमेंटमध्ये तुमचं मतही नक्की मांडा!
सह्याद्री विद्यालय, सह्याद्री ज्युनिअर कॉलेज किंवा सह्याद्री महाविद्यालयाचे तुम्ही देखील आजी-माजी विद्यार्थी असाल, अथवा या ठिकाणी तुम्ही काम केले असेल तर याबद्दलही कमेंटमध्ये नक्की सांगा!
For more such videos follow me on:
Instagram:
/ satyajeettambe
Twitter:
/ satyajeettambe
Facebook:
/ satyajeet.tambepatil
LinkedIn:
/ satyajeet-tambe-82525610
Visit:
www.satyajeett...