चांगले विचार | चांगले संस्कार | Life Changing Marathi Motivation By Anuja Jadhav | Best lines

  Рет қаралды 2,181,973

Anuja's Motivation Hub

Anuja's Motivation Hub

Жыл бұрын

चांगले विचार | चांगले संस्कार | Life Changing Marathi Motivation By Anuja Jadhav | Best lines
My KZbin Equipment (Direct Buy Link)👇
Best Mic For Recording
amzn.to/3DWNlYa
Best Ring Light
amzn.to/3OCEsrK
Big Size of Bulb for studio
amzn.to/3P1pGw6
Best Tripod Stand
amzn.to/3KIBgtk
Best Camera For Recording
amzn.to/44efrsB
Laptop
amzn.to/44ePby4
--------------------------------------------------------------------------------
#anujasmotivationhub #marathimotivation #inspring #bestlines #viralvideo #anujajadhav #moralstories #status #motivationalquotes #motivationalvideo #motivationalspeech #motivation #inspritionalspeech #inspirationalquotes #suvichar #marathistatus #suvicharmarathi #bestmotivationalvideo #bestvideo
स्वतःला इतकं बदला की दुनिया पाहतच राहील
1. नेहमी लक्षात ठेवा जिथे आपल्याला कोणी बोलावलं नाही तिथे कधीही जायचं नाही.
2. तुम्ही तुमचं आयुष्य इतक स्वस्तही करू नका की कोणीही येईल आणि तुमची लायकी काढून जाईल.. कारण बऱ्याच वेळा आपण कोणत्याही व्यक्तीला इतका भाव देतो आणि त्याचे आदरातिय्या करतो की आपणं स्वतःचेच महत्त्व विसरून जातो त्यामुळे समोरची व्यक्ती देखील तुम्हाला महत्व द्यायला विसरू जाते.
3. ज्या गोष्टी स्वतःहून कोणी आपल्याला सांगत नाही तोपर्यंत त्या गोष्टी स्वतःहून आपण विचारायच्या सुद्धा नाहीत.
4. ज्या ठिकाणी आपल्याला शेवटी बोलावलं जातं तिथे तर कधीच जायचं नाही कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कोणाची इच्छाच नसते त्यामुळे तिथे जाऊन स्वतःचं महत्त्व हे कमी करून घेऊ नका.
5. त्या लोकांना नशिबाला दोष देण्याचा काहीच हक्क नाही, ज्या लोकांनी यश मिळवण्यासाठी आयुष्यात कधीच प्रयत्न केलेले नाहीत.
6.आयुष्याला कधीही दोष देत बसू नका. उलट जीवनामध्ये असे काही करून दाखवा की जे लोक तुम्हाला सोडून गेलेत त्यांना पश्चाताप झाला पाहिजे.
7. आयुष्यामध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्या गोष्टी नशिबाने मिळत नसतात काही गोष्टी मिळवण्यासाठी स्वतःला सिद्ध करावं लागतं.
8. जीवनामध्ये कोणाचाही स्वभाव ओळखायचा असेल तर त्याला फक्त एवढेच विचारा माझी मदत करशील का मग त्याचा खरा स्वभाव तुम्हाला लगेच कळेल.
9. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा उंच उडण्यासाठी पंखांची गरज ही पक्षांना असते पण माणूस जेवढा जमिनीवर राहील तेवढी त्याची प्रगती जास्त होते.
10. संघर्ष करताना माणूस हा नेहमी एकटाच असतो, पण तेच यश मिळाल्यानंतर पूर्ण जग त्याच्याबरोबर असतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळेमध्ये जर तुम्ही एकटे असाल तर वाईट अजिबात वाटून घेऊ नका कारण संघर्ष हा एकट्यानेच करावा लागतो.
11. जीवनामधील काही जखमा ह्या अशा असतात की त्या दिसत तर नाहीत परंतु याचा अर्थ असा नाही की त्या दुखत नाहीत.
12. जीवनामध्ये जेव्हा जेव्हा तुमच्या जवळची लोक तुमच्या पासून दूर जायला लागतील तेव्हा समजून जा की त्यांच्या गरजा पूर्ण झालेले आहेत. बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल गरजेच्या वेळी लोक तुमच्या जवळ येतात तुमचे हालचाल विचारतात पण त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या की तुमच्याबरोबर बोलणं देखील बंद करतात अशा लोकांपासून तर नेहमी दूर राहा कारण ते लोक मतलबी असतात.
13. नेहमी लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत देव सुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. तुम्ही मंदिरात जाता देवाला फुलं पाहता नारळ पाहता देवावर पूर्ण विश्वास ठेवता पण स्वतःवर विश्वास ठेवायची वेळ आली तर माञ डाऊट घेता की हे काम मी पूर्ण करू शकेन की नाही.
14. ज्या ठिकाणी तुम्हाला महत्व दिलं जात नाही त्या ठिकाणी कधीही जाऊ नका आणि जी व्यक्ती तुमचा नेहमी अपमान करते त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात परत स्थान देऊ नका पण बहुतेक लोक याच्या उलट वागतात म्हणजे जी व्यक्ती नेहमी तुमचा अपमान करते तुम्ही सारखं सारखं तिथेच जाता अशी व्यक्ती तुमची कधीच कदर करत नाही.
15. आयुष्यामध्ये स्वतःला महत्त्व द्यायला शिका स्वतःचे महत्त्व ओळखा आणि त्यानुसार लोकांबरोबर वागा.
16. मोठ्या व्यक्ती तर त्याच असतात. ज्यांना आपण भेटल्यानंतर आपल्याला आपल्या मध्ये काहीतरी कमी आहे असं कधीच वाटत नाही किंवा समोरची व्यक्ती आपल्याला असं कधी भासवून देत नाही.
17. प्रार्थना कधीही वाया जात नाही पण लोक योग्य वेळेची वाट पाहत नाहीत त्यामुळे ज्या गोष्टी त्यांना मिळणार होत्या त्याही मिळत नाहीत.
18. जीवनामध्ये साधे सरळ लोकं ही नेहमी धोका खात असतात कारण ते चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतात बऱ्याच वेळा तुमच्या बरोबरही असं होत असेल की तुम्ही चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवता आणि मग तुम्हाला धोका मिळतो.
19. माणसांना समजणे खूप अवघड आहे कारण माणूस वेळ आणि परिस्थितीनुसार त्यांचा स्वभाव बदलतो जशी वेळ आणि परिस्थिती बदलते तसा माणूस देखील बदलतो.
एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करत असते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी मरायला देखील तयार आहे पण काही वेळ गेल्यानंतर तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन तर याच्यामध्ये बदललं काय तर फक्त वेळ आणि परिस्थिती.
20. जीवनामधला प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून नसतो तर परिस्थितीवर अवलंबून असतो. कारण एक मुलगा फुगे घेऊन खुश होतो तर दुसरा फुगे विकून खुश होतो.

Пікірлер: 386
@rameshjagare3250
@rameshjagare3250 Жыл бұрын
स्वाभिमानी बनण्यासाठी खुप चांगला व्हिडिओ आहे. मला हा व्हिडिओ खुप आवडला. ही पथ्थे मानसाणे पाळली तर मानसाची स्व:ताची प्रगती नक्कीच होईल व माणूस स्व:ता प्रगत होईल .
@kalpanajadhav1307
@kalpanajadhav1307 Жыл бұрын
खूप छान वाटले, सगले विचार तंतोतंत आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडींवर आधारित असून ते विचार करायला लावणारा आहे 👌👍
@namratashirsekar3238
@namratashirsekar3238 Жыл бұрын
खूप छान ताई मी अनुभवलं आहे आणी अजून अनुभवते आहे धन्यवाद 🙏🏻🙏🏻👍🏻🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌹
@anitadange3706
@anitadange3706 Жыл бұрын
जीवनात मन दुखावले जाणारे प्रसंग पावला पावलावर येत असतात त्यावेळी असे विचार सहाजिकच प्रेरणा देतात 🙏🏻🙏🏻 खूपच प्रेरणादायी🌹😊
@Vishma0916
@Vishma0916 Жыл бұрын
😊
@devidassolanke5289
@devidassolanke5289 Жыл бұрын
Life is not once more but the changing the appourtunity of my life it is real story of my life. Devidas solanke patil pune.
@Ranjanadhasj4825
@Ranjanadhasj4825 Жыл бұрын
जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वतःमध्ये बदल करण्या साठी उपयुक्त.
@nilimabartakke3236
@nilimabartakke3236 Жыл бұрын
अगदी बरोबर सांगितले आहे.आपल्या चांगुलपणाचा आपलेच लोक जास्त फायदा घेतात.त्यामुळे कुठल्या जवळच्या रक्ताच्या नात्यावर पण विश्वास नाही राहीला.
@Swara2191
@Swara2191 Жыл бұрын
Yes
@sushmakarangle6754
@sushmakarangle6754 9 ай бұрын
Yes
@shardalanjewar8095
@shardalanjewar8095 5 ай бұрын
Ho na
@abhirajsalve6750
@abhirajsalve6750 Жыл бұрын
खरचं खूप छान माहिती दिलीत तुम्ही यातल्या बऱ्याच गोष्टी माझ्यासोबत घडल्यात कारण मी खूप सरळ वागते पण आपल्या आजूबाजूला तसे लोक नाहीत आपलेच लोक आपल्याला फसवतात आणि हे त्रिवार सत्य आहे🙏🙏
@spiritualscience6808
@spiritualscience6808 Жыл бұрын
*येस धम्मो सनंतनो..!* जो पर्यंत तुम्हि आणि मी एकच आहोत ही भावना विकसित होत नाही तो पर्यंत दु:खच मिलनार..! एकात्मता भाव Equanimty हीच आनंदाची गुरू किल्ली आहे..! दु:ख निर्मितीसाठी तुम्ही जन्म घेतलेला नाही..! विश्व चेतना आनंद देण्यासाठी सदैव तय्यार आहे परंतू तुमचे हात देण्यासाठी उंच असावे लागतात.. मागणारे नसावेत..! समाधानी प्रव्रूत्ती हीच आनंदाची पहिली शिडी आहे..! जगात येतांना काय घेवून आलात, व जातांना काय देऊन जाणार..?? जे कांही घेतलं आहे ते सर्व दुस-याकडूनच घेतलं आहे.. तुमचं काय आहे.. की तुम्ही समजता सर्व माझेच आहे..?? चित्तव्रुती निरोध:! प्रपंच संस्कार एक फसवे म्रुगजल आहै..! Illusion..! भ्रमित मानसिकतेत किती जन्म खपविलेत..??? ध्यान करा.. Do self introspection..! सब्ब पापस्स अकरणम कुसलस्स उपसंपदा सच्चितपरियोदपनम येतन बुध्दान सासनंम..!!
@allroundersan3718
@allroundersan3718 Жыл бұрын
खुपच चांगले विचार आहेत.❤
@kishorkure5470
@kishorkure5470 Жыл бұрын
जे लोक एकमेकांना चांगले समजून मित्र बनतात आणि एकमेकांजवळ येतात. सारे काही व्यवस्थीत चालते. पण त्यापैकी एकाला असे जाणवते की समोरील व्यक्ती मित्रत्वाच्या नावाखाली फक्त स्वतःचा फायदा पाहत आहे. प्रत्येक गोष्टीत आपलीच मदत घेत आहे. कुठलेही काम मित्राकडून करवून घेऊन बाहेर जाऊन लोकांना स्वतः केलं असा सांगतो. नेहमी स्वतःचा विचार करत आहे आणि तो व्यक्ती आपल्या मित्राच्या प्रगतीचा किंवा त्याच्या पुढे जाण्याच्या बद्दल विचार सुध्दा करत नाही. त्याचे काम केले तर त्याला आनंद होतो आणि काम नाही केलं तर दुःख होते अशा या व्यक्तीबद्दल तुमचं काय मत आहे?
@nutaniswalkar3641
@nutaniswalkar3641 Жыл бұрын
खुप छान ahe विचार मस्त 👌
@padmakargurav4554
@padmakargurav4554 Жыл бұрын
तुमचे विचार खुप छान आहेत. मला खुप आवडले 👌👌👍🏻
@sujatatelpande212
@sujatatelpande212 Жыл бұрын
Khoop Chhan vichar, agadi khare aani preranadai aahet.
@pushpagadkari5640
@pushpagadkari5640 Жыл бұрын
Khup chan aahe
@user-sz2rg7rn9q
@user-sz2rg7rn9q Жыл бұрын
फार सुंदर सुविचार आहेत
@priyalondhe3864
@priyalondhe3864 Жыл бұрын
अगदी बरोबर
@ganeshmahakal8161
@ganeshmahakal8161 11 ай бұрын
खूप छान खूप सुंदर अप्रतिम प्रेरणादायी श्रवणीय सुविचार धन्यवाद 🙏
@green050
@green050 Жыл бұрын
10000000000000000 % बरोबर आहे
@isuryanshi6582
@isuryanshi6582 Жыл бұрын
० lhitanA zop lageltika kay
@shaligramatole842
@shaligramatole842 Жыл бұрын
अतिशय सुंदर मेजवानी ताई आज तुम्ही समाजासमोर सादर केलेले आहेत आज समाजात खरोखर ज्या गोष्टींची गरज आहे ते तुम्ही तंतोतंत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे खूप धन्यवाद ताई सुंदर
@ganeshkale769
@ganeshkale769 Жыл бұрын
Khupch chan,
@geetapatil1243
@geetapatil1243 Жыл бұрын
Khup sundar vichar Tank you so much 🙏
@SuvarnaAvinashChavan-zh8wq
@SuvarnaAvinashChavan-zh8wq Жыл бұрын
अप्रतिम व योग्य विचार आहेत
@rajashreekshatriya8796
@rajashreekshatriya8796 Жыл бұрын
खूप छान आणि जिवनातलं सत्य शिकवणारा व्हिडीओ 👌👌🙏🙏
@archanaagarkar2338
@archanaagarkar2338 Жыл бұрын
तुमचा हा आवाज खरंच खुप छान, शांत आहे. अगदी महत्वाचे आणि प्रेरक विचार, योग्य प्रकारे सांगितले आहेत तुम्ही. खुप धन्यवाद तुम्हाला मॅडम 🙏🏻🙏🏻💕🌷🌺🌌☮️🍑💖🙏🏻🙏🏻
@shantanuupasani1305
@shantanuupasani1305 Жыл бұрын
अप्रतिम एक नंबर मुद्दे मांडलेत...अगदी जीवनाशी निगडित आहेत....सत्य परिस्थिती कथन केलीयेस मॅम तुम्ही...😊😊👌👌👍👍
@swapnilsontakke6276
@swapnilsontakke6276 Жыл бұрын
खूप छान,प्रेरणादायी विचार.Real Life Facts.
@ramdaschavan3863
@ramdaschavan3863 Жыл бұрын
अप्रतिमबोध छानसुविचारताई💯🙏🚩🌺
@pratapzende7349
@pratapzende7349 11 ай бұрын
छान आहेत विचार ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@user-ec4oc1sw1h
@user-ec4oc1sw1h Жыл бұрын
Khupach chhan... Utkrushta...❤
@sangitaawari2238
@sangitaawari2238 Жыл бұрын
विचार छान मांडलेत, आम्हाला नक्की फायदा होईल
@ashiwinisawant2986
@ashiwinisawant2986 Жыл бұрын
छान आहे वीडवो शीकायला मिळाले
@rekhatelang5716
@rekhatelang5716 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली
@sumitsawant6378
@sumitsawant6378 Жыл бұрын
खुपच सुंदर माहीती
@jaywantdabholkar6285
@jaywantdabholkar6285 Жыл бұрын
सर्व विचार पटण्यासारखे आहेत कारण ते अनुभवसीद्ध आहेत असे वाटते. 👍🌹
@rahuldhok8233
@rahuldhok8233 Жыл бұрын
Nice khr aahe 👌👍👌👌
@pranavyenare7774
@pranavyenare7774 Жыл бұрын
Khup chhan
@anildeshmukh-om5ih
@anildeshmukh-om5ih Жыл бұрын
Good tips thanks
@meenadarvatkar3703
@meenadarvatkar3703 Жыл бұрын
खर तर हेच बरोबर आहे. 👌 👌
@sindhushirke704
@sindhushirke704 Жыл бұрын
खुप खुप छान छान विचार आहे धन्यवाद धन्यवाद
@jaysingnikam4158
@jaysingnikam4158 Жыл бұрын
Khup chan very good knowledge
@pralhadpatil441
@pralhadpatil441 Жыл бұрын
मस्त सुविचार
@JavedAli-qx4zl
@JavedAli-qx4zl 2 ай бұрын
अगदी खरं आहे जग हे मतलबी च आहे, गरजा पूर्ण झाल्या कि ते लांब जातात, 💯
@chitrakudrimoti7133
@chitrakudrimoti7133 Жыл бұрын
Sunder vichar aahet.thank you.
@archanagawade9551
@archanagawade9551 Жыл бұрын
खूप सुंदर विचार.thank you so much.
@kalyanibansod6037
@kalyanibansod6037 Жыл бұрын
Apne bohot aache se baat samjhaye 😊🙏
@santoshshelke8999
@santoshshelke8999 Жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली आहे
@user-nb6dz1xl6h
@user-nb6dz1xl6h Жыл бұрын
हे विचार खुप चांगले सागुन जातात .than ks you tai छान आहे.👌👌
@rukhminikhupchankulthe1262
@rukhminikhupchankulthe1262 Жыл бұрын
Khup chhan vichar.thank you so much ma'am 👏👍
@geetapatil5021
@geetapatil5021 Жыл бұрын
Khupch Chan 👌👌
@sanjaymohite6042
@sanjaymohite6042 Жыл бұрын
एकदम सुंदर आणि खरे विचार आहेत.
@anaghamanjrekar5696
@anaghamanjrekar5696 Жыл бұрын
खरंच अशीच लोक मिळतात आणि फसायला होते 👌👌🌹
@priyakamble2831
@priyakamble2831 Жыл бұрын
Osum
@supriyakumbhar5052
@supriyakumbhar5052 Жыл бұрын
खुप छान आहे
@satappapowar5137
@satappapowar5137 Жыл бұрын
अतिशय मार्मिक बोलला तुम्ही
@ranjanakore1686
@ranjanakore1686 Жыл бұрын
खूप छान विचार आहेत 👌
@user-lj1zb9um8p
@user-lj1zb9um8p Жыл бұрын
तुमचे वीचार खूप छान आहेत मनाला फार छाण वाटले
@chitradeshpande7600
@chitradeshpande7600 Жыл бұрын
तुमचे विचार खुप चांगले आहे मला आवडले खरोखर च आहे
@vikasbhandalkar1109
@vikasbhandalkar1109 Жыл бұрын
छान आहे
@kavita7475
@kavita7475 Жыл бұрын
Shree Swami Samarth jai jai swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏
@mangeshghag8916
@mangeshghag8916 Жыл бұрын
खुप प्रेरणादायी विचार
@maithilijoshi3404
@maithilijoshi3404 Жыл бұрын
अप्रतिम विचार शेवटचा मुद्दा खुप छान आहे
@chhayakamble8148
@chhayakamble8148 Жыл бұрын
खूप छान विचार आहेत.मनाला खूप पटलं.
@jayantkulkarni1636
@jayantkulkarni1636 Жыл бұрын
नमस्कार आपण अतिशय वस्तूस्थिवर आधारित परीस्थितीच वर्णन केले. तथापि मला पहीला मुद्दा पटला नाही. सार्वजनिक जीवनात असे प्रसंगच येतात. तिथे न बोलवता पण जाव लागत. धन्यवाद
@appasahebpunde5982
@appasahebpunde5982 Жыл бұрын
Veary good information
@positive_katta
@positive_katta Жыл бұрын
Thank you Tai ekdam perfect reality sagitlit 😊
@pokemonworld2418
@pokemonworld2418 Жыл бұрын
खुप छान सुविचार सांगितले आहेत.
@ulhaspatil4298
@ulhaspatil4298 Жыл бұрын
खूपच सुंदर 🙏💐
@ghardar7756
@ghardar7756 Жыл бұрын
Khup chan vichar aahet tai
@hiramannarkhede1997
@hiramannarkhede1997 Жыл бұрын
Very very nice of out standing😊😊😊👌👌
@anitatotare5851
@anitatotare5851 Жыл бұрын
बरोबर आहे 👍👍
@akshadajadhav6776
@akshadajadhav6776 9 ай бұрын
खुपचं छान आहे हि सर्व माहिती
@smitatoraskar2699
@smitatoraskar2699 Жыл бұрын
तुमचे विचार ऐकून खूप चांगले वाटले आधार वाटला आपुलकी वाटली धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 🙏🙏🙏
@user-yv3yn8rm3i
@user-yv3yn8rm3i Жыл бұрын
खरच खूप चांगले विचार आहे
@monikavishalkharat9573
@monikavishalkharat9573 Жыл бұрын
Thank you so much 🙏🙏🙏
@sugandhabhave4046
@sugandhabhave4046 Жыл бұрын
खूप छान सुविचार
@SurekhaWadile
@SurekhaWadile Жыл бұрын
Khup chan 👌
@nandagaikwad1010
@nandagaikwad1010 Жыл бұрын
Thanks a lot for sharing this best thoughts 👍👍🙏🌷🌺💐🙏
@itzme1744
@itzme1744 Жыл бұрын
Thank you so much
@aajichya_gosti
@aajichya_gosti Жыл бұрын
खूप छान
@shripadrayarikar3830
@shripadrayarikar3830 5 ай бұрын
खूपच छान विचार सांगितले.
@motivationalquotes8309
@motivationalquotes8309 Жыл бұрын
Very great
@shubhamwadurkar8102
@shubhamwadurkar8102 Жыл бұрын
Very sweet voice.. and very beautiful thought
@rutujagadade895
@rutujagadade895 Жыл бұрын
Anuja mam your thoughts' very good thoughts, thanks for the video sharing.
@amarburondkar1752
@amarburondkar1752 Жыл бұрын
सत्य प्रेम आनंद ! खुप छान , अति सुंदर अभ्यास पुर्ण मार्गदर्शन
@gitanjalideore8223
@gitanjalideore8223 Жыл бұрын
Kupach cchan
@sumatishinde3015
@sumatishinde3015 Жыл бұрын
Ho नक्कीच आवडला खुपचं सुंदर
@anupriyasalvi6091
@anupriyasalvi6091 Жыл бұрын
Khup chan mahiti dilit he kharch aahe 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@kirantelang6758
@kirantelang6758 Жыл бұрын
खरच खूप खूप छान सुवविचाचर आहे
@mansivalve6128
@mansivalve6128 Жыл бұрын
👍
@eknathshinde1063
@eknathshinde1063 Жыл бұрын
खूप छान सुविचार आहे 🙏🏻🙏🏻
@ArchanaPawar-cj6vh
@ArchanaPawar-cj6vh Жыл бұрын
Tumhen khoob samjhaen Sangli vichar thank you
@artisatalkar3119
@artisatalkar3119 Жыл бұрын
👍कळतंय पण वळत नाही
@sandeepshinde2772
@sandeepshinde2772 Жыл бұрын
Khup Khup chhan vatle tai tumcha mana pasun abhar
@reapergaming2140
@reapergaming2140 Жыл бұрын
Right 👍👍
@bhartipatil4758
@bhartipatil4758 Жыл бұрын
Khup Chan video 🎉🎉🎉🎉
@sangitachaudhari9470
@sangitachaudhari9470 Жыл бұрын
Kuph chan 👌
@santoshmanchare6284
@santoshmanchare6284 Жыл бұрын
Chan vichar tai
@janhavijadhav-8584
@janhavijadhav-8584 Жыл бұрын
Khup chaan video khup changla aahe
@archanabarde4105
@archanabarde4105 Жыл бұрын
खूपच सुंदर विचार सांगितले thank you very much
@rajkumarkawade2431
@rajkumarkawade2431 Жыл бұрын
खरोखरच खूप छान माहिती दिलीत
@sumedhmhaiskar-wg6yg
@sumedhmhaiskar-wg6yg Жыл бұрын
Khrch khup Chan vichr ahe je jivnat awshk ahe ,
@amitmane6692
@amitmane6692 Жыл бұрын
खूप छान वाटले एकदम बरोबर आहे सर्वांच्या इच्छा पूर्ण होऊदे ही ईश्वरचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@karandevinodini05
@karandevinodini05 Жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏🙏🙏
@NandaRamteke
@NandaRamteke Жыл бұрын
खूपच, सत्य आणि मनासारखे,v जुन्या आठवणी देणारे विचार मांडले जणू माझी परिस्थिती समोर आली असे वाटले thanku very much
Llegó al techo 😱
00:37
Juan De Dios Pantoja
Рет қаралды 54 МЛН