आचरा डाळपस्वारी गिरावळ मंदिर ते ब्राम्हणदेव मंदिर

  Рет қаралды 7,817

Swargiya Konkan Vlogs

Swargiya Konkan Vlogs

Күн бұрын

नमस्कार,
मित्रांनो मी पराग आणि तुमचे स्वागत आहे आपल्या "स्वर्गीय कोकण" या मराठी यूट्यूब चॅनेल वर असं कोकण जे माझ्या नजरेतून..
मित्रांनो आचरे गावची डाळपस्वारी तारीख ठरली आणि संपूर्ण आचरा गाव तयारीला लागला आणि हा हा म्हणता तो दिवस अखेर उजाडला..
एक वेगळीच अनुभूती आणि एक वेगळाच अनुभव देणार हा सोहळा याची देही याची डोळा आम्ही अनुभवला आणि देव अखेर आपल्या भक्तांची सुखदुःखे ऐकायला बाहेर पडला..
रस्त्यावर शेणाने सारवण करून सडारांगोळी काढून धूप दीप लावून गुढ्या तोरणे उभारून प्रत्येक भाविक 'श्रीं' च्या स्वगतासाठी सूर्याच्या रखरखीत उन्हातही भाविक हजारोंच्या संख्येने या सोहळ्यात सामील झाले होते. संध्याकाळी मिराशीवाडीमार्गे नागजरी येथील गिरावळीच्या मंदिरात' श्रीं 'ची स्वारी विसावली. सोमवारी विश्रांती दिवस असल्याने श्रीं ची स्वारी तेथेच थाबणार आहे. मंगळवारी दुपारी गिरावळी मंदिरात नारळांची रास पोटाळून बौध्दवाडी, महास्थळमार्गे देव ब्राम्हणमंदिर गाऊडवाडी येथे मुक्काम करणार आहेत.
आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 2 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी 2025 या सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी विश्रांती घेऊन देव गिरावळ मंदिरातून तिसऱ्या दिवशी बाहेर पडतात भंडारवाडी, बौद्धवाडी मार्गे ब्राह्मण देव मंदिर गाऊडवाडी येथे येऊन स्थिरावतात.. हे आणि आपला देव आपल्या भेटीला येणार या उत्साही वातावरणात देवाच्या स्वागतासाठी संपूर्ण आचरा नगरी सज्ज झाली आहे त्याचे काही क्षण आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अनुभवणार आहोत....
मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि जर चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचा सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील....
आचरा डाळपस्वारी 2025 ACHARA DALAPSWARI
• आचरा डाळपस्वारी 2025
@Mi_Dodamargkar_Vlogs
#achara
#dalapswari
#konkan
#kokan
#Rameshwar
#temple
#acharabeach
आचरा डाळपस्वारी 2025
आचरा संस्थानिक डाळपस्वारी
इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे
संस्थानिक डाळपस्वारी
ऐतिहासिक आचरे गाव
आचरे गावातील फिरण्यासाठी ठिकाणे
आचरा समुद्रकिनारा
आचरा रामेश्वर मंदिर
Achara Dalapswari 2025
Achara Sansthanik Dalapswari
Inamdar Shri Dev Rameshwar Sansthan kasaba achara
Sansthanik Dalapswari
Aitihasik Achara gaon
Tourist point in Achara
Achara Beach
Achara Rameshwar Mandir
Thanks For Watching........

Пікірлер: 38
@sandipchavan4678
@sandipchavan4678 5 күн бұрын
अत्यंत अदभूत , अवर्णनीय असा हा देव भक्तांचा सोहळा 👌 खरंच कोकणातील अश्या सण समारंभ आणि सोहळ्यांची पुसटशी कल्पना मुंबईकर असताना नव्हती ती आज कुडाळकर झाल्यावर प्रत्यक्षआणि सत्यात ह्या कोकणी you tuber's चॅनल्स च्या माध्यमातून पाहत आहे. अशा ह्या रूढी परंपरांवरच कोकण अजूनही शाश्वत आहे आणि राहील यात तिळमात्र शंका नाही. श्री देव रामेश्वर कृपेने सर्वांचे कल्याण होवो. हिच नम्र प्रार्थना 🙏 ♥️ 👍
@anantsawant6552
@anantsawant6552 4 күн бұрын
❤ Jai Bramhan Dev ❤
@anantsawant6552
@anantsawant6552 4 күн бұрын
❤ Thanks for sharing 🙏
@namratakambli1017
@namratakambli1017 5 күн бұрын
मी देवगड वरुन हे मनोहर दृश्य पाहत आहे कारण हा - आमचा राजा. आणि आम्ही त्याच्या मागे त्याची प्रजा. असा आमचा सोहा आहे
@swargiyakokanvlogs
@swargiyakokanvlogs 4 күн бұрын
मनपूर्वक आभार 🙏🙏
@shriramjadhav6582
@shriramjadhav6582 4 күн бұрын
अतिशय सुंदर👌 पराग तुला खुप खुप शुभेच्छा🌹
@swargiyakokanvlogs
@swargiyakokanvlogs 4 күн бұрын
धन्यवाद माऊली 🙏🙏
@sujatabagwe4320
@sujatabagwe4320 5 күн бұрын
अप्रतिम सोवळा .. मी खूप मिस करते
@supriyaamberkar8142
@supriyaamberkar8142 5 күн бұрын
पराग कुबल धन्यवाद मी रात्री उशिरापर्यंत रामेश्वर सोहळा पाहिले माझे सगळे चांगले होवूदेरामेश्वररा
@swargiyakokanvlogs
@swargiyakokanvlogs 4 күн бұрын
धन्यवाद ♥️♥️♥️
@unakantpujare6657
@unakantpujare6657 5 күн бұрын
खूप छान वाटले
@swargiyakokanvlogs
@swargiyakokanvlogs 4 күн бұрын
धन्यवाद ♥️♥️♥️
@pratikshaghadi4591
@pratikshaghadi4591 5 күн бұрын
अप्रतिम सोहळा बघायला मिळाला, खुप छान 🎉🎉
@swargiyakokanvlogs
@swargiyakokanvlogs 4 күн бұрын
धन्यवाद ♥️♥️♥️
@anantsawant6552
@anantsawant6552 4 күн бұрын
❤ Shri Parag Kubal aabhaari ahot ❤
@swargiyakokanvlogs
@swargiyakokanvlogs 4 күн бұрын
धन्यवाद ♥️♥️♥️
@rajanpujare
@rajanpujare 5 күн бұрын
पराग कुबल धन्यवाद आपल्यामुळे सुंदर सोहळा पाहता मिळाला राजन पुजारे पळसंब
@swargiyakokanvlogs
@swargiyakokanvlogs 4 күн бұрын
धन्यवाद पुजारे ♥️♥️♥️
@anandpadwal187
@anandpadwal187 5 күн бұрын
अतिशय सुंदर सोहळा।। फार वरषा झाली सोहळ्यात फिरलो होतो। आता कल्याण मधून बघतोय।
@swargiyakokanvlogs
@swargiyakokanvlogs 4 күн бұрын
धन्यवाद ♥️♥️♥️
@vikeshghadivlogs
@vikeshghadivlogs 5 күн бұрын
👍👍👍🙏
@anjalihadkar2632
@anjalihadkar2632 5 күн бұрын
अप्रतिम .पराग तुझ्यामुळे आम्ही लांबून आमच्या देवाचं दर्शन घेऊ शकलो.तुझ्या स्वर्गीय कोकण च नाव सार्थ केलंस.❤
@swargiyakokanvlogs
@swargiyakokanvlogs 4 күн бұрын
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏
@parshuramparadkar4846
@parshuramparadkar4846 5 күн бұрын
🙏🙏
@Oviiii15
@Oviiii15 5 күн бұрын
अप्रतिम सोहळा 🙏🌹
@swargiyakokanvlogs
@swargiyakokanvlogs 4 күн бұрын
धन्यवाद 🙏🌹
@Sunil-x9q3j
@Sunil-x9q3j 4 күн бұрын
🌹🙏 श्री देव रामेश्वर चरणी नमस्कार, जोगेश्वरी (पूर्व ) मुंबई येथून कार्यक्रम पाहत आहोत आपणास धन्यवाद 🙏🌹.
@swargiyakokanvlogs
@swargiyakokanvlogs 4 күн бұрын
धन्यवाद ♥️♥️♥️
@nikhildhekane9786
@nikhildhekane9786 5 күн бұрын
@arunmhatre2465
@arunmhatre2465 5 күн бұрын
आचरे गावातील आहे
@swargiyakokanvlogs
@swargiyakokanvlogs 4 күн бұрын
हो
@eindustry2264
@eindustry2264 5 күн бұрын
दादा कालपासून तुझ्या व्हिडिओ ची वाट बघते आहे 🙏🙏🙏🙏🌼🌼🌼🌼🌼🙏🙏🙏🙏🙏
@swargiyakokanvlogs
@swargiyakokanvlogs 4 күн бұрын
धन्यवाद 🙏🙏🙏🙏🌼🌼🌼🌼🌼🙏🙏🙏🙏🙏
@nandinipadwal7612
@nandinipadwal7612 5 күн бұрын
आह्मी गाऊड वाडीचे पडवळ... Vedant ला ओळखतो.
@sayalisawant769
@sayalisawant769 5 күн бұрын
आम्ही लहानपणी जायचो इतकी गर्दी नसायची आत्ता तर खुप म्हणजे खुप गर्दी आहे डेकोरेशन पण एवढ नसायचं पताके असायचे 35 वर्षा पूर्वी
@swargiyakokanvlogs
@swargiyakokanvlogs 4 күн бұрын
धन्यवाद ♥️♥️♥️
@arunmhatre2465
@arunmhatre2465 5 күн бұрын
Sir १६-२ २०२५ la jagruti आचरेकर हीचे लग्न आहे मी tichy a लग्नाला याऊ शकत नाही तरी तिच्या विवाह सोहळ्याचं व्हिडिओ तुम्ही करावा ही विनंती ती मुलगी आहरे गावातील आहे .
@arunmhatre2465
@arunmhatre2465 5 күн бұрын
आचरे गाव मुलीचे नाव जागृती आचरेकर
Каха и дочка
00:28
К-Media
Рет қаралды 3,4 МЛН
gymnastic vidio
4:28:43
Mr_crazy gymnast
Рет қаралды 6 М.
देवांचा परतीचा प्रवास आचरा डाळपस्वारी #dalapswari #achara #motivation villagelife #viral #friends
44:49
Panipat  1761 (with English subtitles) : Oration by Shri. Ninad Bedekar
3:44:16
Maratha History
Рет қаралды 4,8 МЛН