Рет қаралды 249
छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षक की धर्मवीर ? । डॉ. श्रीमंत कोकाटे । स्वर : Rational Marathi ।
-----------------------------------------------------------------
"छत्रपती संभाजी राजांसारखा सुंदर, पराक्रमी आणि बुद्धिमान राजपुत्र मी भारतात पाहिला नाही." असे समकालीन फ्रेंच पर्यटक अॅबे कॅरे लिहितो. तर मोगलांचा इतिहासकार खाफीखान लिहितो "संभाजीराजे मोगलांसाठी शिवरायांपेक्षा दहापटीने तापदायक होते." संभाजी राजे निःस्वार्थी, स्वराज्यनिष्ठ होते, असे समकालीन कृष्णाजी अनंत सभासद लिहितात. जेव्हा शिवाजी महाराज हे संभाजीराजांना स्वराज्याच्या वाटणीबाबत बोलले तेव्हा संभाजी राजे शिवाजीराजांना म्हणतात, "आपणास साहेबांचे पायांची जोड आहे, आपण दूधभात खाऊन साहेबांचे पायाचे चिंतन करून राहीन." दुधभात खाऊन शिवरायांच्या पायांचे चिंतन करून राहीन, परंतु राज्याची वाटणी नको, असे संभाजीराजे प्रस्तुत उद्गारावरून सुचित करतात. यावरून संभाजीराजांची विनयशीलता, प्रामाणिकपणा, स्वराज्यनिष्ठा आणि वडिलांप्रती असणारी पितृभक्ती स्पष्ट होते. संभाजीराजांचे शौर्य, पराक्रम, औदार्य, नैतिकता उच्च कोटीची होती. ते मराठी, संस्कृत, हिंदीसह इंग्रजी भाषेचे विद्वान होते. त्यांच्या बिरुदावलीवरून मतभिन्नता आहे. वाद राजकीय असला तरी वैचारिक पातळीवर त्याचा उहापोह होणे अत्यावश्यक आहे. सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी Video शेवटपर्यंत बघा.
--------------------------------------------------------------
Please, support our channel by like, share & subscribe ! 🙏
--------------------------------------------------------------
#छत्रपतीसंभाजीमहाराजस्वराज्यरक्षककीधर्मवीर
#लेखकडॉश्रीमंतकोकाटे #rationalmarathi
#स्वराज्यरक्षकछत्रपतीसंभाजीमहाराज
#स्वराज्यरक्षकधर्मवीरसंभाजीमहाराज
#छत्रपतीसंभाजीमहाराजांविषयीडॉश्रीमंतकोकाटे
#chhatrapatisambhajimaharajswarajyarakshakkidharmveer
#chhatrapatisambhajimaharaj
#छत्रपतीसंभाजीमहाराजभाषण
#छत्रपतीसंभाजीमहाराजनिबंध
#छत्रपतीसंभाजीमहाराज
#chhatrapatisambhajimaharajjayanti
#shambhurajestatus