Рет қаралды 234,421
नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.
आपण या व्हिडिओमध्ये मायाक्का देवीचा चमत्कार पाहणार आहोत.
कर्नाटक राज्यातील चिंचणी हे गाव. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली मायाक्का देवीचे भव्य मंदिर चिंचणी या गावी आहे. मायाक्का देवीला मायवा, महाकाली या नावांनी ही ओळखले जाते. लाखो भक्तगण देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, देशभरातून चिंचणी या गावी येतात. देवीची मोठी यात्रा भरते. देवीला पुरण पोळीचा नैवेद्य दाखवला जातो, त्याचं बरोबर भरलेलं वांग व बाजरीची भाकरी या देवीची विशेष आवड असल्याचेही बोलले जाते.. हल्लाळ नदी या चिंचणी गावात आहे.. देवीच्या दर्शन घेण्या आधी.. या नदीवर अंघोळ केली जाते.
मायाक्का मंदिर हे खूपच भव्य व सुंदर आहे. मंदिराचे आवारही खूप भव्य आहे.
चिंचणी गाव नाव गाव
या देवी विषयी अशी अख्यायिका सांगितली जाते की १८८१ मध्ये मायाक्का देवी महाराष्ट्राच्या कोंकण विभागातील माणदेश इथून चिंचणी या गावी आली. चिंचणी या गावी तिने कट्टीला व लीकीला या दोन दुष्ट राक्षसांचा तिने वध केला. मायाक्का हिरीदेवीकडे आली आणि तिला तिच्यासाठी जागा (निवारा) देण्यास सांगितले. हिरीदेवीने काही अटींसह मायाक्का देवीला जागा देण्याचे मान्य केले. त्या अटी आहेत- प्रथम आदर (मूल्य) माझ्यासाठी आणि नंतर तुमच्यासाठी. पहिले नैवेद्य (नैवेद्य) मला, नंतर तुला आणि पहिले दर्शन माझे आणि नंतर तुझे. या सर्व अटी टाकून हिरीदेवीने मायाक्का देवीला जागा देण्याचे मान्य केले. म्हणूनच काही वडिलांनी सांगितले की मूळ (पितृत्व, मूळ) देवी हिरीदेवी आहे आणि ती फक्त ग्रामदेवी आहे. मायाक्का देवीच्या नावानं चांगभलं.. असा जल्लोष करत चिंचणी गावी येतात. देवीची मूर्ती अतिशय मनमोहक अशी आहे. देवीने हिरवी साडी परिधान केलेली असते. कुंकवाने देवीचा मळवट भरला जातो. मायाक्का देवी मंदिराचे बांधकामही अतिशय सुंदर आहे. मजबूत असे दगडी बांधकाम केले गेलेले आहे. भाविकांच्या सोयीसाठी मंदिराच्या परिसरात भाविकांनी स्वतः साठी विश्राम गृहेही बांधलेली आहेत.
Mayakka Temple is a temple of Hindu worshiped goddess Mayakka Devi, who is worshipped by the different names such as Mahakali, Mayakarati, Mayavva etc. The temple is situated in Chinchali village of Raybag taluk in Belagavi district, Karnataka, India.
Chinchali Mayakka Devi Temple in marathi
Mayakka devi chinchali
goddess Mayakka Devi
Shri Mayakka Devi Temple Chinchali
Mahakali, Mayakarati, Mayavva
Temple of Mayakka Devi
#mayankadevi
#mahakali
#chinchani
#karnataka
#devi
#marathimotivationandhistory
✰✰✰ For Any Business Queries Contact Email ☛ marathibusiness25@gmail.com
तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.