Рет қаралды 301,614
चुलीत भाजलेले मासे जाम भारी लागत होते 😍 | Roasted Fish | केळीच्या पानाचा मोटला (Konkan) कोकणातील माझ्या गावी गेलो की आम्ही जेवणात मासे खूप खातो. कोकणात मासे अतिशय मुबलक प्रमाणात मिळतात. माशांचे कालवण, तळलेले मासे आपण नेहमी बखर असतो परंतु मासे चुलीत निखाऱ्यावर भाजून एकदम जाम भारी लागतात. मी गावी गेलो की आमच्या घरच्या परशामध्ये मासे भाजून खातो. मासे चुलीत भाजायला आम्ही केळीच्या पानांचा उपयोग करतो. मासे स्वच्छ धुवून त्याला मीठ मसाला लावून ते मासे केळीच्या पानात बांधले जातात. केळीच्या पानात या बांधलेल्या माशांना मोटला बोलतात. असे चुलीत मासे भाजून लोकं पूर्वी खूप खायचे. माझी आईतर सांगते रानात फाटी जमा करून वेशवी येथे जाऊन जवळा, ताजे मासे आणायचे ते रानात असेच भाजून खायचे. घरातून फक्त भाकरी घेऊन जायचे, घरी यायला उशीर व्हायचा मग असे भाजून मासे खाल्ले जायचे. #ChulitBhajleleMase #RoastedFish #FishRoasting #sforsatish
केळीच्या पानात भाजलेले मासे अतिशय चवदार लागतात. हे मासे चुलीतील निखाऱ्यावर भाजल्यामुळे त्या माशांना एक वेगळीच चव येते. सोबत केळीची बापाने यामध्ये वेक वेगळाच सुगंध (flavour) त्या माशांना येतो. हे मासे भाजताना आम्ही लेप मासा, कोळंबी, डोमा मासे वापरले आहेत. झिंगा म्हणजे कोलंबी (prawns) भाजून जाम भारी लागते. हे सर्व मासे भाजण्यापूर्वी स्वच्छ धुवून घेतले जातात. कोकणातील गावी तुम्ही सुद्धा गावी गेलात की असे मासे भाजून खाऊन बघा तुम्ही नक्कीच बोटे चाटत बसला आणि तुम्हाला ही पद्धत खूप आवडेल. बरेच जण असे पण असतील जे गावी गेले की, अशा प्रकारे मासे चुलीत भाजून खात असतील अशांनी आम्हाला तुमच्या गावच्या गमतीजमती कमेंट करून सांगा. तुम्हाला हा माशांचा भाजून खाण्याचा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
तुमचे प्रेम असेच कायम असुद्या !
फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा!
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar