Рет қаралды 1,247
आदर्श शिशु विहार व अभिनव बालविकास मंदिर गंगापूर रोड नाशिक २ शाळेत प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी
म वि प्र समाजाचे आदर्श शिशुविहार व अभिनव बाल विकास मंदिर गंगापूर रोड नाशिक २ या शाळेत पर्यावरण पूरक व प्रदूषण मुक्त दिवाळी सण साजरा करण्यात आला . कार्यक्रमाप्रसंगी मविप्र समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीन बाबुराव ठाकरे , महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी बी .टी.पाटील नाशिक शहरी विभाग संचालक ॲड. लक्ष्मण लांडगे, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी दौलत जाधव , मविप्र सेवक सदस्य चंद्रजित शिंदे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका मिनाक्षी गायधनी, जेष्ठ शिक्षिका रंजना पाटील, अर्चना ठाकरे, मंगला दवंगे, विलास जाधव,अर्चना वाळके ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष चेतन बच्छाव व उपाध्यक्षा सुजाता जाधव,पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष , योगेश जाधव ,शालेय समिती सदस्य, संपतराव खेलूकर,हिरामण शिंदे , प्रमोद मुळाणे मराठा हायस्कूलचे मुख्याध्यापक थोरात सर मुख्याध्यापिका पुष्पा लांडगे , ज्योती पवार ,कारभारी तांदळे होरायझन अकॅडमी स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रुती देशमुख, अबॅकस च्या प्रमुख निता पवार तसेच सर्व माजी मुख्याध्यापक उपस्थित होते .सर्व उपस्थित मान्यवर व मुख्याध्यापिका मीनाक्षी गायधनी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वतीपूजन करण्यात आले.शाळेच्या संगीत शिक्षिका नंदिनी आहिरे व गीतमंच यांनी या कार्यक्रमात गाण्यांचे गायन केले.दीपावली पूजन अंबादास मते व अर्चना मते यांच्या हस्ते संपन्न झाले. शाळेच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी गायधनी यांनी आपल्या प्रास्ताविकात शाळेचा उंचावत गेलेला आलेख मांडला. आम्ही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये मराठी भाषेचा आदर व महत्त्व रुजवत असतो. यामध्ये मॉन्टेसरी ते चौथीपर्यतच्या सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग असतो.शाळेमध्ये वर्षभरात विविध उपक्रम राबवले जातात. उत्कृष्ट उपक्रमांमध्ये शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालक व शिक्षकांचे अनमोल असे मार्गदर्शन मिळत असते. त्यामुळे पालकांचे व शिक्षकांचे कौतुक करण्यात आले व दीपावलीचे महत्त्व सांगुन उपस्थित मान्यवरांचे भेटवस्तू व देऊन स्वागत केले व सर्वांना दीपावली च्या शुभेच्छा दिल्या. महानगरपालिकेचे प्रशासनाधिकारी पाटील यांनी आपल्या मनोगतात मराठा विद्या प्रसारक समाज ही संस्था अग्रेसर स्थानावर पोहोचलेली आहे. तसेच अभिनव शाळा उत्कृष्ट कामकाज व उपक्रम चालविणारी शाळा आहे. तसेच नृत्यातील विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरीकरण बद्दल त्यांनी ५०० रुपयांचे बक्षीस देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. व सर्वांना दीपावली दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच त्यांच्यात विविध मूल्ये रुजावी त्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी गायधनी नेहमी प्रयत्नशील असतात. विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यासाठी शिक्षकांना प्रोत्साहन देतात. तसेच कार्यक्रमासाठी पालकांना आमंत्रित केले होते. विद्यार्थ्यांना दिवाळी सणाच्या प्रत्येक दिवसाचे महत्त्व समजावे यासाठी वर्गांमध्ये वसुबारस ,धनत्रयोदशी , नरकचतुर्दशी , लक्ष्मीपूजन पाडवा ,भाऊबीज यांची मांडणी करण्यात आली होती . किल्ले मांडणी करण्यात आली होती. वसुबारस पूजनासाठी प्रत्यक्ष गाय वासरू आणले होते. वर्गांमध्ये आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. तोरण , आकाशकंदिल ,पणत्यांनी शाळेची सजावट करण्यात आली. दिवाळी सणानिमित विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. आदर्श शिशू विहार व प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी महिला सक्षमीकरण यावर आधारित नाटिका, प्रदूषण मुक्त दीपावलीवर आधारित नृत्य सादर केले. दीपावली निमित्त पालकांनी विविध स्टॉल शाळेत लावले होते. मविप्र समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन बाबुराव ठाकरे यांनी आपल्या मनोगतात येथे करण्यात आलेल्या दीपावलीच्या कार्यक्रमामुळे मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. आपली संस्कृती टिकवणे व संस्कृतीची ओळख करून देणे हे काम अभिनवच्या विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांना दाखविण्यात येते. अभ्यंगस्नानाने त्वचेचे आरोग्य चांगले होते व दीपावली च्या प्रत्येक दिवसाचे महत्त्व सांगितले व शाळेत जे काही वैविध्य पूर्ण उपक्रम राबवले जातात त्याबददल मुख्याध्यापिका मीनाक्षी गायधनी ,सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि शाळेच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका मंगला गुळे व पूनम निकम यांनी केले. प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याबद्दल शपथ घेण्यात आली.आभारप्रदर्शन ज्येष्ठ शिक्षिका रंजना पाटील यांनी केले.