No video

Devendra Fadanvis | देवेंद्र फडणवीस, तुमच्या भाजपला थोडी जरी शरम असेल तर एकनाथ शिंदेंना लवकर हाकला !

  Рет қаралды 273,489

Lay Bhari - Mumbai Socio-Political News

Lay Bhari - Mumbai Socio-Political News

2 ай бұрын

#devendrafadnavis #eknathshinde #voting #votingresults #bjp #LoksabhaElection2024 #SharadPawar #NarendraModi #amitshah #ब्रेकिंगन्यूज #बातमीमहाराष्ट्राची #कामाचीबातमी #मंत्रालय #LayBhariNews #लयभारीन्यूज #मराठीन्यूज #लयभारीबातम्या
देवेनभाऊ, तुमच्या भाजपकडे अन् तुमच्या अनैतिक महायुतीकडे मराठी मतदारांनी नाकं मुरडलीत. तुमच्या पक्ष नेत्यांनी महायुतीचा अश्लिल प्रयोग केला होता. हे अश्लिलपण अगदी गावच्या वेशीवर आणून ठेवलं होतं. राजकारणातील हा नागडेपणा गुजराती संस्कृतीचा भाग असू शकतो. असला फाजिलपणा मराठी मातीत चालत नाही, हे मतदारांनी दाखवून दिलयं. त्यामुळं तुमच्या भाजपला जर थोडीफार लाज, शरम असेल तर या नागडेपणाभोवती काहीतरी वस्त्र गुंडाळा. तुमच्या पक्षीय अश्लिलपणाचा मराठी जनतेला वीट आलाय. म्हणूनच मराठी मतदारांनी तुम्हाला धडा शिकवलाय. तुमच्यासाठी मोठा इशाराय. तो इशारा तुम्ही समजून घ्यायला हवा. महत्वाचं म्हणजे, तुमच्या मोदी - शाह या जोडगाळीला सांगा, तुमचं गुजराती गटार महाराष्ट्रात आणू नका. महाराष्ट्राची संस्कृती बिघडवू नका. नवीन गलिच्छ पायंडे महाराष्ट्रात पाडू नका.देवेंद्रभाऊ, तुम्ही स्वतः एक हुशार व उच्चविद्याविभूषित आहात. केंद्रात नरेंद्र मोदींचा उदय होण्यापूर्वी तुम्ही सुसंस्कृत होतात. पण नरेंद्र मोदी व अमित शाह यांच्या नादाला लागून तुम्ही सुद्धा बिघडलात. महाराष्ट्रात तुमची प्रतिमा ही खलनायकी, कारस्थानी, पाठीत वार करणारी, गृहखात्याचा गैरवापर करून लोकांना त्रास देणारी अशीच आहे.
राहूल गांधी यांची काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना व शरद पवार यांची राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांच्या महाविकास आघाडीला महाराष्ट्रातील जनतेनं स्विकारंलय. याउलट मोदी - शाह यांची भाजपा, एकनाथ शिंदे यांची कायद्याच्या चौकटीतील शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला लोकांनी झिडकारलंय.
मुळात तुमच्या भाजपाने आतातरी महाराष्ट्राच्या विरोधात व मराठी माणसांच्या विरोधात कारस्थानं करायचं थांबवलं पाहीजे.लोकसभा निवडणुकीच्या निकालात महाराष्ट्रात तुमच्या अनैतिक महायुतीला जनतेनं अवघ्या १७ जागा दिल्या आहेत. याउलट महाविकास आघाडीला ३१ जागा दिलेल्या आहेत. देवेंद्रभाऊ लक्षात घ्या, तुमच्या नरेंद्र मोदी व अमित शाह या नेत्यांनी महाराष्ट्राच्या गल्लीबोळात सभा घेतल्या होत्या. तुम्ही स्वतः पायाला भिंगरी बांधून फिरत होता. सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी वारेमाफ पैसा उधळला होता. तुम्ही स्वतः मुलुंडला धावत कशासाठी गेला होता, हे लपून राहिलेलं नाही. तिथल्या ६ खोल्यांमधील बॅगांमध्ये काय सापडलं ते तुम्हीच तुमच्या अंतर्मनाला विचारून बघा. तुमच्या अजितदादांनी बारामतीत काय केलं. एकनाथ शिंदेंनी नाशिक, कोल्हापूरला काय नेलं होतं, हे लोकांपासून लपून राहिलेलं नाही.विकत घेतलेली मतं. सरकारी सत्तेचा केलेला यथेच्छ दुरूपयोग आणि निवडणूक यंत्रणेला स्वतःच्या मर्जीनुसार तुम्ही राबवून घेतलं... श्रीरामाला सुद्धा सोडलं नाही. बरं झालं. श्रीराम तुमच्यावर कोपला. तुम्हांस कशाबशा १७ जागा तरी मिळाल्या आहेत. ते तुमचं यश नाही. तुम्ही केलेल्या भानगडींमुळे लंगोट सुटता सुटता वाचलंय.
आता तुम्ही चिंतन करायला सुरूवात केली असेल. तुम्हांस मी मराठी जनतेच्या मनातील स्पष्ट आणि खरं सांगतो. तुम्ही भ्रष्ट, हावरट, हालकट, मराठी संस्कृतीला काळीमा फासणारे नेते तुमच्यासोबत आणले. ते करायला नको होतं. म्हणून तुम्हाला सांगतो. तुम्ही पहिल्यांदा एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदावरून हकालपट्टी करा. सोबत अजित पवार यांच्या पार्श्वभागावर सुद्धा लाथ मारा. एकनाथ शिंदे व अजित पवार ही दोन लोकं जोपर्यंत सरकारमध्ये असतील तोपर्यंत महाराष्ट्राचं कधीच भलं होणार नाही. तुमच्या स्वतःमध्येही सुधारणा करा. तुम्हाला सुधारणा करणं शक्य नसेल तर नितीन गडकरींसारख्या सभ्य माणसाकडे पुन्हा महाराष्ट्र द्या. हे माझे एकट्याचेच म्हणणे नाही. तुमच्या फेसबुक पेजवर तुमच्याच कार्यकर्त्यांनी काय काय सल्ले दिले आहेत ते बघा.चोरांना तुम्ही तुमच्या पक्षात घेतलं. त्याच्या ऐवजी तुमच्याच निष्ठावंत कार्यकर्त्यांना मोठं केलं असतं तर काय बिघडलं असतं, हा माझा तुम्हांस सवाल आहे.तुमच्या नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवलं. तुमच्यावर सुद्धा अन्यायच झाला. भलेही तुम्ही कितीही कारस्थानी असला तरी एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यापेक्षा मुख्यमंत्रीपदासाठी तुमची लायकी मोठी आहे. मोदी व शाह यांनी तुम्हांस मुख्यमंत्री होवू दिलं नाही. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं. मला सांगा, कोणत्या अँगलने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री वाटतात. मुख्यमंत्रीपदाचा एकतरी गुण त्यांच्याकडे आहे का ?बाहेरच्या राज्यातील एखाद्या व्यक्तीला किंवा परदेशी व्यक्तीला आमचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे, हे सांगायला सुद्धा लाज वाटते, इतकी मानहानी तुम्ही महाराष्ट्राची करून ठेवली आहे. एकनाथ शिंदे हे बिल्डर, ठेकेदार व कंत्राटदार यांचे नेते आहेत. जिथं पैसा दिसेल तिथं त्यांचे डोळे चमकू लागतात. मेंदू वेगानं काम करू लागतो. अहो, त्यांच्या कार्यालयात एक बोगस माणूस सात - आठ महिने ओएसडी म्हणून काम करत होता तरी अख्ख्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला त्याचा थांगपत्ता लागला नाही. याचं कारण मुख्यमंत्री कार्यालय घोटाळ्यांमध्ये इतकं बुडून गेलंय की, कुणीही घोटाळेबाज आला तरी चिखलात विरगळून जावा, तसा तो मिसळून जातो.
लय भारी फेसबूक
/ laybhari16news
लय भारी वेबसाईट
laybhari.in/
लय भारी ट्विटर
/ laybhari3
लय भारी यूट्यूब
/ @laybharinewslive
'लय भारी'च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
chat.whatsapp.com/I4rXoBGcMIp...

Пікірлер: 375
@PravinOtawanekar-qw8ll
@PravinOtawanekar-qw8ll 2 ай бұрын
पर नागडा केला तरबुजला . पण हा निर्ल्लज्ज सुधारणार नाही
@damekarnandkishor9865
@damekarnandkishor9865 2 ай бұрын
100 टक्के खरं आहे सर धन्य वाद
@jamir699
@jamir699 2 ай бұрын
Right sar😢
@eknathdalvi6728
@eknathdalvi6728 2 ай бұрын
लय भारी विश्लेषण, देवेंद्र खरोखरच खलनायक झाला आपले मनःपूर्वक अभिनंदन आपण खरोखरच छान आणि वस्तुनिष्ठ विश्लेषण केले आहे महाराष्ट्रातील सुसंस्कृत राजकारण देवेंद्र ने गुजराती फेकू आणि तडीपार च्या नादाला लागून संपूर्ण महाराष्ट्रा नासवला आहे एकदम छानच सडेतोड विश्लेषण मराठी मनातील भावना नितिन गडकरी ना पण साईड ट्रक करण्यात याचाच हात आहे
@laxmanmadye1352
@laxmanmadye1352 2 ай бұрын
योग्य वाटले साहेब आपल्या सडेतोड बोलण्याच स्वागत
@Shantaram336BK
@Shantaram336BK 21 күн бұрын
000
@madhukargawade8688
@madhukargawade8688 2 ай бұрын
योग्य विश्लेषण केले साहेब. हिच चपराक आहे भाजपला.
@gajananpawar6138
@gajananpawar6138 2 ай бұрын
खूप चांगलं सुनावलं देवेंद्र फडणवीस साहेबाना... ! आता तरी कपट कारस्थान करणे बंद करा.
@appasahebkhalde9870
@appasahebkhalde9870 Ай бұрын
शक्य नाही याची खात्री आहे
@harishchandramulik3285
@harishchandramulik3285 2 ай бұрын
खूप खूप छान माहिती दिल्याबद्दल सर आपणास या रिटायर फौजीचा सलोट करतो जय हिंद जय महाराष्ट्र एक्स आर्मी
@gajananpawar6138
@gajananpawar6138 2 ай бұрын
खूप छान व सडेतोड,बिनधास्त प्रश्न विचारलेत साहेब. आपलं चॅनेल असंच बारकाईने निरीक्षण करून यांची प्रकरणे अशीच वेशीवर टांगा ...
@bt-yx9tv
@bt-yx9tv 2 ай бұрын
निष्टावताचीवाटलावलीतेचपाप.देवेद्रायरजातयवाटत एकटीमवापरायच.
@lahugaikwad5283
@lahugaikwad5283 2 ай бұрын
बरोबर बोललात साहेब
@jitendrashelke4789
@jitendrashelke4789 2 ай бұрын
टरबूज ने ढुंगाच सोडुन डोक्याला बांधलय त्या कशाचि शरम ना लाज
@gangaramdhamal262
@gangaramdhamal262 2 ай бұрын
लय भारी, विवेचन,
@PiyushGadepatil
@PiyushGadepatil Ай бұрын
To
@mahendraparab9126
@mahendraparab9126 Ай бұрын
शिदें.फडणवीस.म्हाराष्ट्राला.कंलक.लागलेले.आहेत.वीधान.सभेलाही.आम्ही.भाजप.शिदेंगट.पवारगट.हॅना.पाडनार.म्हणजे.पाडनारच.व.हॅन्चा.सुपडा.साफ.करनार.म्हाराष्ट्रा.मधे.आम्हाला.महायुतीच.सरकार.नकोच.फक्त.महा.वीकास.आघाडीच.सरकारच.हव.
@PopatraoPawar-jz5es
@PopatraoPawar-jz5es 2 ай бұрын
सत्य. पत्रकार
@KiranPatil-yz8cc
@KiranPatil-yz8cc 2 ай бұрын
तिघही तेवढेच जबाबदार आहेत तिघांनीही राजीनामा द्यावा. लोकं ह्याना कंटाळलेली आहेत. येत्या विधानसभेमध्ये यांची सफाई होणार एवढं निश्चित. 😂😂 जय हिंद जय शिवराय जय महाराष्ट्र
@vinayakchavan2966
@vinayakchavan2966 2 ай бұрын
मस्त
@satishhatkhambkar5385
@satishhatkhambkar5385 2 ай бұрын
सर्वसामान्यांचे विचार आपण व्यक्त केले आहेत. असाच आसूड या कपटी निर्लज्ज मराठी द्वेष्टे आणि भ्रष्टाचारी नेत्यांवर ओडत रहा. आपले सडेतोड विचारच यांना धडा शिकवतील. धन्यवाद.
@sureshraut668
@sureshraut668 2 ай бұрын
भरास्ताचरी जमवा पार्टी चे निर्माते फसनविस होय ।😊
@suhasparab3459
@suhasparab3459 2 ай бұрын
राजीनामा स्वतःहून देण्याऐवजी, राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त करतोय! ह्यातूनच ह्या स्वयंघोषित चाणक्यचां ढोंगीपणा सिद्ध होतोय. हे सर्व तुझ्या पक्ष श्रेष्ठींना सांगायला हवं होते. पत्रकारांना सांगायची काय गरज? शून्य सहानभुती, तू अनाजी पंतच राहणार!
@maheshgawade4769
@maheshgawade4769 2 ай бұрын
ग्रेट पत्रकार सलाम तुमच्या कसमगिरीला 🙏
@gajananpawar6138
@gajananpawar6138 2 ай бұрын
शिंदेने बॅग नेल्या तेव्हा त्या हेलिकॉप्टर मधून उतरले तेव्हाच त्या का चेक केल्या नाहीत...? आतलं सगळं काढून त्यात तुम्ही पुन्हा चड्ड्या, बॉड्या, कपडे भरून नंतर पोलिसांसमोर उघडून दाखवता बॅग्स चेक केल्या म्हणून ?
@SuhasParab-hm5fp
@SuhasParab-hm5fp 2 ай бұрын
खरोखर चांगल विश्लेषण साहेब असेच सत्य लोकांसमोर सादर करून लोकांमध्ये जनजागृती करा
@santoshsawadatkar2382
@santoshsawadatkar2382 Ай бұрын
लय भारी आणि तेवढंच सत्य बोललात भाऊ तुम्ही.
@pravindeore9689
@pravindeore9689 2 ай бұрын
साहेब काहीच उपयोग होणार नाही यांना हे सांगून अहो ठाणे आणि रत्नागिरी या जागा महा युतीला आजही विश्वास बसत नाही हा म्हस्के ५ वर्षात सात पिढ्या बसून खातील इतके कमावून ठेवेल
@sandeepkadu9026
@sandeepkadu9026 2 ай бұрын
खऱ्या घटना उजेडात आणणं सर्वांना च शक्य नसते,,, उत्तम कामगिरी.👍
@kavitarane8587
@kavitarane8587 2 ай бұрын
फारच वाईट परंपरा चालू ठेवली. कुठे नेऊन ठेवलाय हा महाराष्ट्र..
@vijaysawant6832
@vijaysawant6832 2 ай бұрын
बरोबरच आहे. तुमचं मत
@gajananpawar6138
@gajananpawar6138 2 ай бұрын
खाणं हाच त्यांचा मूळ धंदा आहे. उध्दव साहेबांच्या काळात त्यांना हवं तसं खाता आलं नाही, म्हणून ते बाहेर पडले... आता खा खा खात आहेत.
@vijaybhosle3850
@vijaybhosle3850 2 ай бұрын
खरय
@user-cr9bd4dx2o
@user-cr9bd4dx2o Ай бұрын
बरोबर.आहे.पत्रकार.साहेब
@bt-yx9tv
@bt-yx9tv 19 күн бұрын
एकनबरभाषणमूदेसुदवाटतयवाफत
@jayawantgaonkar7833
@jayawantgaonkar7833 2 ай бұрын
ग्रेट पत्रकार छान विचार मांडले खरे जगासमोर आणले
@manohardabhane3397
@manohardabhane3397 2 ай бұрын
नितीन गडकरी साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करायला व प्रधानमंत्री झाले तर महाराष्ट्राला अंनद होईल 🙏🙏
@sanjaysingpatil7271
@sanjaysingpatil7271 2 ай бұрын
राजीनामा घ्या मराठी जनता चिडली
@mangeshshinde2521
@mangeshshinde2521 2 ай бұрын
सर एक सांगुका थोडे काँग्रेस ला पण सांगा भले विदर्भात काँग्रेस त्यांच्या जीवावर जिंकली असेल पण बाकी ठिकाणी म्हणजे कोल्हापूर सोलापूर अमरावती धुळे मुंबई याठिकाणी शिव सैनिकांनी जीवच रान करून जिंकून आणले भिवंडी पण तशी मदत काँगेस ने केली नाही
@SAP.-739
@SAP.-739 2 ай бұрын
भाजप यांनी इतर दोन पक्षांना जवळ करून डोक्यावर बसवले आहे .अत्यंत चुकीचा निर्णय आहे आणि स्वाभिमान गहाण ठेवणारा आहे. भाजपचे 100 पेक्षा अधिक जागा आमदार असताना दुसऱ्या पक्षांना मुख्यमंत्रीपद देणे म्हणजे ...
@mahadevjadhav4828
@mahadevjadhav4828 Ай бұрын
शिदे मराठा आहे मराठा साधे अर्थात हे सरव लोकाना माहित आहेतयामुले शिदेना फसविले तयाचे लागले होणार नाहि
@nalinigaikwad1867
@nalinigaikwad1867 2 ай бұрын
Jay Maharashtra 🙏 🚩
@sureshpatil8642
@sureshpatil8642 Сағат бұрын
खरात सर मराठी व आम जनतेकडून तुमच्या निस्प्रह पत्रकारितेला खुप खुप धन्यवाद 🎉
@Jast9593
@Jast9593 2 ай бұрын
फसनविस भाजपात असणे आवश्यक आहे,तो विधानसभा निवडणुकीत भाजपाला संपूर्ण घेऊन डुबेल
@SanjayShinde-hp4tr
@SanjayShinde-hp4tr 2 ай бұрын
खरात सर,😂😂 बेस्ट. काळजाला भिडलं ❤❤
@smitarane
@smitarane 2 ай бұрын
फडणवीस साहेबाना राजीनामा मग्ण्यापेक्षा इतर दोघांनी राजीनामा द्यावा.
@ramchandrabhosale8123
@ramchandrabhosale8123 2 ай бұрын
अगदी बरोबर बोललात
@sambhajibhadale5229
@sambhajibhadale5229 2 ай бұрын
अतिशय सुंदर अतिशय योग्य महाराष्ट्राची बाजू पत्रकार म्हणून जी मांडली अतिशय योग्य आहे जय महाराष्ट्र
@sanjaykhade7213
@sanjaykhade7213 2 ай бұрын
Manatil सगळे खरे बोलता saheb
@user-ut5yj5wc6q
@user-ut5yj5wc6q 2 ай бұрын
सर तुम्हाला खऱ्या गोष्टी सांगितल्या बद्द्ल वाकुन नमस्कार.
@manohardabhane3397
@manohardabhane3397 2 ай бұрын
खुप छान वाटले सडेतोड विश्लेषण 👍🙏🙏
@dattatraysasane7377
@dattatraysasane7377 2 ай бұрын
एकदम बरोबर बोललात दादा आपले लाख लाख धन्यवाद जय महाराष्ट्र
@suryakntmundhe
@suryakntmundhe 2 ай бұрын
खरात सर आई शपथ टरबूज मिधे आणि मुतारी विधानसभेत आपटणार. उद्धवजी ठाकरे जिंदाबाद
@mandasangle7866
@mandasangle7866 2 ай бұрын
खूप छान
@rajendra2862
@rajendra2862 2 ай бұрын
सर कडक शब्दात मांडणी अस्सल गावरान भाषेत समजवल
@MahadevAmbad
@MahadevAmbad 2 ай бұрын
आरे हे नाटक आहे देवेन्द्र नाही जानार विस्वास ठेवू नका
@mangeshvishwasrao4567
@mangeshvishwasrao4567 2 ай бұрын
योग्य विश्लेषण आहे
@shridharwatekar-mm3mi
@shridharwatekar-mm3mi 2 ай бұрын
लयभारी 🙏👍👌
@sanjaymyakalwar3126
@sanjaymyakalwar3126 2 ай бұрын
अगदी बरोबर
@pratapraodesai3690
@pratapraodesai3690 2 ай бұрын
मित्रा लई भारी
@santoshpadwal528
@santoshpadwal528 2 ай бұрын
जे झालं ते योग्य बोललास पण हे निवडून आलेले संत नाहीत जोपर्यंत महाराज बाबासाहेब फुले यांची शिकवण जनता आत्मसात करणार नाही तोपर्यंत असे आलेले आणि गेलेले जनतेची सतत दिशाभूल राहणार हे लक्षात घेतलं पाहिजे
@anandraonikam946
@anandraonikam946 2 ай бұрын
ज्या काय मराठी लोकांनी वोट बिजेपीला दिली आहेत ते विधानसभा ला अजून कमी होतील
@raghunathbane8500
@raghunathbane8500 2 ай бұрын
Saheb Tumhala Lakh Lakh Dhanyawad 🌹🙏
@gangadharwele3123
@gangadharwele3123 2 ай бұрын
Yes 👍🙌
@charushilamohite6262
@charushilamohite6262 2 ай бұрын
लय भारी ,👍👍👍👍👍
@Star_gamer271
@Star_gamer271 2 ай бұрын
असा स्पष्टवक्तेपणा प्रत्येक माणसाकडे असावा असेच विडीओ बनवत राहा खुप खूप धन्यवाद
@WamanraoSarode
@WamanraoSarode 2 ай бұрын
अहो एवढंही साल्ट निघेपर्यंत धुवू नका!
@anantaagivale2683
@anantaagivale2683 2 ай бұрын
LLB ची उपयोग कुरघोडया करण्यासाठी करत आहे
@bt-yx9tv
@bt-yx9tv 2 ай бұрын
खुप आभ्यासपुर्णभाषण आहे भाऊ.आसभाषण.फारगरजेचवाटतछानछानबोलतातपुनयेनारेरेसाठी
@vrushalikhese465
@vrushalikhese465 2 ай бұрын
एक नंबर विश्लेषण
@jaiprakashlad6619
@jaiprakashlad6619 2 ай бұрын
साहेब,चांगले शाल जोडीतले मारले.
@vijaysawant6832
@vijaysawant6832 2 ай бұрын
धन्यवाद साहेब.
@user-du2ym8wz1j
@user-du2ym8wz1j Күн бұрын
आभारी आहे दादा खरोखर माझ्या मनातील भावना व्यक्त केली. या गुजरात घारजिणया पंतांनी मोदी शांहांच ऐकून महाराष्ट्र 50 वर्ष विकासा मागे गेलाच..... पंताना बाजूला काढून नितीन जी सारखे चेहरे फुडं आणुन भाजपच्या मुळ चेहऱ्यांना संधी मिळाली तरचं भारतीय जनता पक्षाचे खरं! नाही तर.........
@vijaysawant2572
@vijaysawant2572 Ай бұрын
खूपच चांगल्या भाषेत सुनावलत फडतूस गृहमंत्र्याला...😛😛😛😛😛 सर खूपच छान पध्दतीने आपण सर्व मुद्द्यांना हात घालून बीजेपीचे डोळे उघडले आहेत धन्यवाद...🙏🙏🔥🔥🔥🔥🔥
@user-fe8ru3vb6p
@user-fe8ru3vb6p 2 ай бұрын
Right. GOOD THOUGHT AND OPINION
@charudattakarangale1435
@charudattakarangale1435 2 ай бұрын
एकदम झकास सूचना 👌✌🏻🇧🇴
@nitinshirode1572
@nitinshirode1572 2 ай бұрын
तो फडणवीस ने चांगला अभ्यास केला पाहिजे होता त्या मुळे त्याची पिसिंग पिसींग झाली आहे साहेब अजून एक शब्द राहिला नष्ट
@hemanttare7774
@hemanttare7774 2 ай бұрын
खरंच तुम्ही लय भारी
@rajeshjadhav6869
@rajeshjadhav6869 2 ай бұрын
100 persent barobar aahe saheb
@kishorchanda8432
@kishorchanda8432 2 ай бұрын
Hich takat pahije khar bolnyachi.
@kaluzore9959
@kaluzore9959 2 ай бұрын
सहदेव प्रमेश्र्वर आशिर्वाद देणारे आहे साहेब
@manoharlaher3114
@manoharlaher3114 26 күн бұрын
साहेब आपण अगदी बरोबर बोलत आहात धन्यवाद
@user-ut5yj5wc6q
@user-ut5yj5wc6q 2 ай бұрын
प्रत्येक गोष्ट बरोबर.
@charudattakarangale1435
@charudattakarangale1435 2 ай бұрын
अशीच झणझणीत चपराक देतरहा 👌✌🏻👆🏻
@vilasgaikwad3803
@vilasgaikwad3803 2 ай бұрын
बरोबर आहे
@AwsmTany5822
@AwsmTany5822 Ай бұрын
एकदम बरोबर बोललात तुम्ही 2019 ला विरोधात बसले असते काही पक्षी पक्षी फोडायची गरज नव्हती तर जनतेने 2024 ला 40 खासदार बीजेपीला दिले असते
@shankarkumbhar249
@shankarkumbhar249 Ай бұрын
🚩 सडेतोड जवाब दिला आहे. अभिनंदन 🎉 🚩
@ChabukswarShivappa
@ChabukswarShivappa Ай бұрын
पत्रकार साहेब तुमचं योग्य विचार बोलात सोलापूर
@deepakkonekar2813
@deepakkonekar2813 2 ай бұрын
अतिशय परखड मेंदूची शस्त्रक्रिया
@tanajidumbre4362
@tanajidumbre4362 9 күн бұрын
तुषार भाऊ खुप खुप धन्यवाद. टरबूज पुर्ण फोडून टाकले. (संपूर्ण नागडे)केले.जयमहाराष्ट्र.
@sambhajipatil2279
@sambhajipatil2279 Ай бұрын
साहेब तुमचे बरोबर आहे पन तुम्ही आसे त्यांना सल्ये देऊनका माहाविकास आघाडी चे सरकार येउदा
@ganpatsurve1781
@ganpatsurve1781 2 ай бұрын
Jay Maharashtra. लय भारी ।
@ahilyashitole9007
@ahilyashitole9007 2 ай бұрын
किती छान सडेतोड बोलले सर अगदी मनातले बोलले
@vilasyewale3331
@vilasyewale3331 2 ай бұрын
Very good sir great ekdm barobr bolat pn he tyana klnar nahi ani te neet vagnar ase disat nahi
@vrushalighagare3645
@vrushalighagare3645 2 ай бұрын
अतिशय बरोबर खरचं खर बोललात सर
@balasahebgavhad5928
@balasahebgavhad5928 Ай бұрын
सहि कहा आपने सुपर अभिनंदन तुमचं
@pratibhapanchal212
@pratibhapanchal212 2 ай бұрын
छानच , सुनवले चांगलेच वागा नाहीतर भाजप हद्दपार होईल
@ArunWalve
@ArunWalve 2 ай бұрын
लय भारी असेच सडेतोड बोलतरहा.
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 19 күн бұрын
सर,तुम्ही एकदम चांगलं व सत्य व परखड मत मांडले म्हणून तुमचे अभिनंदन.
@gajananuingole9761
@gajananuingole9761 Ай бұрын
यांना फक्त रेडीमेड पाहिजे यांच स्वताहाच काय आहे पुर्ण पक्ष ओढुन ताणुन तयार केला
@krishnaakhade9297
@krishnaakhade9297 8 күн бұрын
शांभास साहेब, लय भारी सर, अगदी खडे बोल आणि फडणवीसना आणि गद्दार ग्यागची त्यांची जागा दाखवलीत..
@chandrakantgurav8189
@chandrakantgurav8189 26 күн бұрын
कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा.
@bharatigawade7453
@bharatigawade7453 Ай бұрын
लय भारीच विश्लेषण एक नंबर जय हो..🚩
@nalinigaikwad1867
@nalinigaikwad1867 2 ай бұрын
He khar ahe amla ghan rajkarn awdal nhi bhajp ne amla marathi mansala harvcha tarval ami marthi ahot lakshat teva jay marathi 🙏🚩🙏
@mumtazroomaney8922
@mumtazroomaney8922 2 ай бұрын
Kharach khup chan.sabse best short pan ekdum kharr.apne bahot sahi kaha ek ek bat sahi.
@user-rf7zg6di9p
@user-rf7zg6di9p Ай бұрын
अगदी बरोबर आहे गुरु
@ejazjazi62
@ejazjazi62 15 күн бұрын
Khup Chan Agdi barobar
@shashikalakasewar2778
@shashikalakasewar2778 Ай бұрын
Khup cchan kan pilale bhau thank you
@BaburaoYedage-bg7qe
@BaburaoYedage-bg7qe 2 ай бұрын
एकदम बरोबर आहे
@manohardabhane3397
@manohardabhane3397 2 ай бұрын
खुप छान विश्लेषण साहेब 👍👍
小宇宙竟然尿裤子!#小丑#家庭#搞笑
00:26
家庭搞笑日记
Рет қаралды 19 МЛН
Алексей Щербаков разнес ВДВшников
00:47
SPILLED CHOCKY MILK PRANK ON BROTHER 😂 #shorts
00:12
Savage Vlogs
Рет қаралды 15 МЛН