आपले परमगुरु, महागुरू, धर्मगुरू, व्रतस्थ आणि प्रापंचिक यांनी प्रभूच्या कळपाची सेवा करतांना त्यांची सेवकाप्रमाणे प्रामाणिकपणे सेवा करावी आणि ख्रिस्ताची प्रीती इतरांना त्यांच्या सेवेतून दिसावी म्हणून आपण प्रभू कडे प्रार्थना करू या. ‘भोजन मंदिरी शिष्य त्याने बसविले शेजारी’ असं एक प्रचलित भजन आहे. आज विश्वव्यापी ख्रिस्तसभा आज्ञा गुरूवार साजरा करत आहे. ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांबरोबर शेवटचे भोजन केले. त्यावेळेस तो जुन्या करारातील वल्हांडणाचा सण साजरा करत होता. ‘हे माझे शरीर आहे हे तुम्ही घ्या व खा, हे माझे रक्त आहे हे तुम्ही घ्या व प्या.’ या पवित्र शब्दाने येशूने वल्हांडणाच्या भोजनाचे त्याच्या शरीर व रक्ताचा सोहळा केला. त्याच्या स्मरणार्थ हा सोहळा दररोज साजरा केला जातो. प्रभू येशूच्या पुनरागमनापर्यंत त्याच्या मृत्युची घोषणा केली जाईल, व या भक्तीतून सार्वकालिक जीवनाचा करारच आपण साजरा करत असतो. त्याचा समय जवळ आला असता त्याने त्याच्या शिष्यांवर शेवट पर्यंत प्रेम केले. आपल्या मित्रांकरिता त्याने आपला प्राण दिला व मित्रांवर म्हणजेच त्याच्या शिष्यांवर असलेले प्रेम त्याने प्रकट केले. जशी त्याने प्रीती केली तशी आपणही प्रीती करू या
@opheliagomes180310 ай бұрын
Beautiful lyrics. Beautiful Song sung by Fr. Victor & Lucy. Straight piercing to our heart ❤️