Рет қаралды 39,150
संगीत - कौशल श्री. इनामदार Music - Kaushal S. Inamdar
गीत - अशोक बागवे Lyric - Ashok Bagwe
स्वर - हम्सिका Vocals - Hamsika
संगीत संयोजन - कमलेश भडकमकर Arrangement - Kamlesh Bhadkamkar
ध्वनिमुद्रण - अवधूत वाडकर (स्टुडियो V2) Recorded & Mixed by - Avadhoot Wadkar (Studio V2)
This song was recorded for the album Gard Nila Gaganzhula in year 2000.
हे गीत २००० साली प्रकाशित झालेल्या ‘गर्द निळा गगनझुला’ या ध्वनिमुद्रिकेतले आहे.
BUY THE ALBUM ON iTUNES AND SUPPORT ORIGINAL MUSIC - iTunesवर हा अल्बम विकत घ्या आणि पायरसी रोखा
itunes.apple.c...
दे ना रे पुन्हा पुन्हा
गर्द निळा गगनझुला
कोवळ्या गुलाबाची/ पाकळी दवाची/
झेलताना/ तोल गेला/ काळजाला/ भार झाला
आठवण तुझी सारखी
निघे काजव्यांची पालखी
रोज ओले फुलांचे दोन डोळे
रेघ काजळाची कोवळी
चंदनी शहाऱ्याचा/ गंधल्या मिठीचा/
हा किनारा/ आज माझ्या/ जीवनाला/ लाभलेला
डोळे माझे भिरभिरले
मोर पापण्यांचे लाजले
चांदराती फुलांच्या सांजवाती
स्पर्श अमृताचे झेलले
बावऱ्या निखाऱ्याची/ आग ही उराशी/
सोसताना/ श्वास ओला/ केशराचा/ गंध आला
सुनी सुनी रात चालली
साय सावली दाटली
मंद झाले बिलोरी चांदणे हे
नीज पाखरांची मोडली
जांभळ्या क्षितिजाला/ चंद्र हा बुडाला/
पहाटेला/ मोगऱ्याचा/ पूर आला/ सूर झाला
Follow Kaushal S. Inamdar on:
Facebook - / kaushal.inamdar
Twitter - / ksinamdar
Instagram - / ksinamdar
Reverbnation - www.reverbnati...
English Blog - Music in the World of Noise - musicandnoise.b...
Marathi Blog - क्षितिज जसे दिसते - kaushalkatta.bl...
Follow Marathi Asmita on:
Facebook - / marathiasmita.in
Twitter - / marathi_asmita
Website - www.marathiasmi...
© Marathi Asmita, 2015