Рет қаралды 21,667
रामाय
यंदा म्हणजेच द्विदशकपूर्तीच्या निमित्ताने गिरगांव ध्वजपथक नवी संकल्पना घेऊन येतंय ती म्हणजे... रामाय
आता रामाय म्हणजे नेमकं काय?
एका चांगल्या प्रवृत्तीने वाइट प्रवृत्तीवर मिळवलेला विजय, मग तो वैचारिक असो किंवा आचरणातून मिळवलेला असो.
राम आणि रावणाच्या युद्धातूनही हाच विषय अधोरेखित होतो.
हेच सार असलेल्या या संकल्पनेला ढोल, ताशा डफ, झांज अशा वाद्यांच्या माध्यमातून आणखी प्रभावशाली पद्धतीने मांडायचा आम्ही प्रयत्न करतोय!
एखादी व्यक्ती रागारागात कशी व्यक्त होईल??
एखाद्याचं प्रस्थ कसं काय सुशोभित करता येईल?
एखाद्या व्यक्तीचं नुसतं असणं किती प्रभावी असेल?
हे सगळं संगीताच्या माध्यमातून दर्शवता आलं तर?
युद्ध म्हणजे निव्वळ तयारी नाही, त्यातला रोष, त्यातलं आक्रमण, त्यातला स्वाभिमान, त्यातले शह काटशाह, त्यातला जिवंतपणा...
हे सगळं आमच्या अनोख्या तालामधून संगीतबद्ध केलं गेलंय आणि होय हेच संगीत ऐकता ऐकता पहायचंय सुद्धा!
म्हणूनच या अभूतपूर्व संकल्पनेचे साक्षीदार व्हा...
तारीख - 9 april 2024
वेळ - sakali 8.30
युद्ध भूमी - नित्यानंद चौक