हा प्याला मज पासून कर दूर

  Рет қаралды 11,359

Prerana Bhajan Mandali

Prerana Bhajan Mandali

Күн бұрын

सर्व भजन रसिकांना सलाम ,
आज या शाब्बाथ दिवशी आपल्या समोर पुन्हा एकवार भजन घेऊन येतांना खरोखर आनंद होत आहे . प्रभू येशू ला वध स्तंभावर खिळण्या अगोदर त्याने पित्याला विनंती केली की हा प्याला माझ्यापासून टळू दे पण माझ्या नव्हे तर तुझ्या इच्छेने होउ दे . हीच भावना भजन रुपात सादर करीत आहेत बंधू दिनकर खरात आणि त्यांना पखवाजावर साथ देत आहेत बंधू योहान गजभिवं. आणि भजनाला कोरस ची साथ देत आहेत भजन मंडळीतील सर्व लहान थोर .
आपल्याला अनेक भजन रसिक व श्रोते मंडळी यांनी विनंती केली होती की भजनाचे शब्द टाका त्या विनंतीस मान देऊन येथून पुढे भजनाचे शब्द डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत . यात काही चूक असल्यास क्षमा असावी कारण अनेक पिढ्यांपासून ही भजने गायली जात आहेत त्यात काही शाब्दिक बदल अथवा शब्द वेगळा असण्याची शक्यता नाकारता येत नाही🙏🙏🙏🙏
🌺🌷🌺🌷🌺🌷🌺🌷🌺🌷🌺🌷🌺🌷🌺🌷🌺🌷🌺🌷🌺🌷🌺🌷🌺🌺🌷🌺🌷🌺🌺
भजनाचे बोल खालील प्रमाणे
हा प्याला मजपासून कर दूर
बापा , बापा (४) हा प्याला मजपासून कर दूर // धृ//
का तू माझा त्याग ही केला (२)
नाही तुझा मी शब्द मोडीला
हीच जिवाला हूर हूर
हा प्याला ........................ //१//
माझ्या नव्हे पण तव इच्छेने (२)
होऊ दे रे सर्व धीराने
माझी न काही कुरकुर
हा प्याला ........................ //२//
आज तुला मी खास विनवितो (२)
माझा आत्मा तव हाती देतो
माझी न काही कुर कुर
हा प्याला ................... //३//

Пікірлер: 22
@ganeshkharat2960
@ganeshkharat2960 Жыл бұрын
दिनकर भाऊ खुप खुप सुंदर भजन आहे आणि तुझा आवाज खुप सुंदर आहे परमेश्वराचे आभार तुला आसाच कंठ फुटो ईश्वरचरणी प्रार्थना
@preetamjadhav8812
@preetamjadhav8812 Жыл бұрын
अपना सर्व भंजन मंडळीस प्रभु येशू च्या नावांत सलाम व खुप खुप धन्यवाद मागील विनंती आपण वाचुन हया गीताचे बोल लिहून दिल्या बद्दल सर्व ग्रुपला मी धन्यवाद बोलतो गीत खुप छान आहे प्रभु येशू तुम्हाला व सर्व मंडळी ला खुप खुप आशिर्वादीत करो आमेन मी प्रितम विजय जाधव राहणार नाशिक आपल्या सर्व ग्रुपचे मी आभार मानतो मागील रिक्वेस्ट स्वीकारली व गीत लिरिकस केले आपले मनापासून आभार व धन्यवाद
@dinkarkharat4026
@dinkarkharat4026 Жыл бұрын
देवाचे खुप खुप आभार की देवाने आम्हाला सेवा करण्याची संधी धीली त्या बद्दल देवाचे आभार
@izakkuberji9944
@izakkuberji9944 Жыл бұрын
खूप छान भजन..... खूप छान गायीले.... सर्व भजनी मंडळाचे अभिनंदन
@jesusrameshwari4042
@jesusrameshwari4042 20 күн бұрын
अप्रतिम भजन अमीन
@subhashsalve-ni1tp
@subhashsalve-ni1tp Жыл бұрын
खूप खूप छान खरातसाहेब❤❤❤❤
@PrakashPatekar-od9mo
@PrakashPatekar-od9mo Жыл бұрын
दिनकर दादा अतिशय सुंदर झाले आहे भजन
@nitinkharat91
@nitinkharat91 Жыл бұрын
Mast Bhajan ani Bhajan mandali
@sanjayjadhav6246
@sanjayjadhav6246 Жыл бұрын
अप्रतिम ब्रदर
@nayanmahamuni4546
@nayanmahamuni4546 Жыл бұрын
खूपच सुंदर... देवाचे आभार...
@yohangajbhiv5895
@yohangajbhiv5895 Жыл бұрын
Very nice bhajan god bless all
@shalmonsalvi9565
@shalmonsalvi9565 Жыл бұрын
Very nice Dada
@vaishaligajbhiv1834
@vaishaligajbhiv1834 Жыл бұрын
Very nice bhajan
@leenamagar
@leenamagar Жыл бұрын
Khup Chan mama god bless all
@shalmonsalvi9565
@shalmonsalvi9565 Жыл бұрын
Very nice 👍👍 God bless you both of you
@sukhanandnirmal9935
@sukhanandnirmal9935 9 ай бұрын
खुप छान
@shashikantgaikwad211
@shashikantgaikwad211 10 ай бұрын
Amen
@user-mg7ud5ve4i
@user-mg7ud5ve4i Жыл бұрын
सर मी पण खिस्ती भजन मंडळी चा अध्यक्ष आहे तुमचं गाणं खुप छान आहे मला खुप आवडलं प्रिझ रिलिसं गाणं टाका ना ✝️💟👏
@PrernaBhajanMandali
@PrernaBhajanMandali Жыл бұрын
आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पाहिलंत तर आपणास भजनाचे शब्द पाहायला मिळतील...💐💐💐💐💐💐💐💐
@user-mg7ud5ve4i
@user-mg7ud5ve4i Жыл бұрын
Thank you so much sir ❤
@BaluKamble-qd4dy
@BaluKamble-qd4dy 4 ай бұрын
गाणे यूट्यूब वर लिहून पाठवा तुमचे सगळे गीत यूट्यूब वर
@PrernaBhajanMandali
@PrernaBhajanMandali 4 ай бұрын
नक्कीच सर्व भजने लिखित स्वरूपात उपलब्ध करून देऊ
Bike Vs Tricycle Fast Challenge
00:43
Russo
Рет қаралды 38 МЛН
Modus males sekolah
00:14
fitrop
Рет қаралды 26 МЛН
Electric Flying Bird with Hanging Wire Automatic for Ceiling Parrot
00:15
Devachya Bhetisathi
7:39
Christaai Music - Topic
Рет қаралды 3,9 М.