एकच इच्छा मनात माझ्या असते दिनरात प्रेमाने गुरुराया ठेवा माझ्या शिरी हात तान्ह्या बाळा जशी माऊली, ध्यास तसा लागावा ओठी असावे नाम, चेहरा तुझाच सतत दिसावा तव चरणांशी स्वर्ग सारी तीर्थे तुझ्या मठात प्रेमाने गुरुराया ठेवा माझ्या शिरी हात असे करा की विवेक जागृत मनात नित्य असावा सचोटीचा,सन्मार्गाचा पथ मजला सहज दिसावा सदैव असू दे मनात प्रीती,धर्म, नीती दिन रात प्रेमाने गुरुराया ठेवा माझ्या शिरी हात प्रारब्ध कुणाला चुकले नाही आजवरी या जगती मला न त्याची भीती असता सद्गुरु मम सांगाती भक्तोध्दारा शंकर बाबा बसले धनकवडीत प्रेमाने गुरुराया ठेवा माझ्या शिरी हात
@akashboss118 Жыл бұрын
🚩🚩Jaishankar 🚩🚩
@yogeshtapasvi Жыл бұрын
@@akashboss118 जय शंकर महाराज
@vijaygaikwad68945 ай бұрын
जय शंकर महाराज कि जय खूप छान तपस्वी सर तुमच्या आवाजाच्या रूपाने आम्हाला प्रत्यक्ष महाराजांचे दर्शन होत आहे खूप गोड आवाज
@yogeshtapasvi5 ай бұрын
@@vijaygaikwad6894 धन्यवाद.. जय शंकर
@akashboss118 Жыл бұрын
🚩🚩Jaishankar 🚩🚩
@yogeshtapasvi Жыл бұрын
जय शंकर
@shubhangikhatekar9297 Жыл бұрын
तुमचा आवाज गाण्याची शब्द रचना खुपच छान मन प्रसन्न झाले जय शंकर 🙏