Рет қаралды 17,027
कवी गायक आणि संगीतकार - योगेश तपस्वी
तबला, ढोलक, ढोल, चंडा - पद्माकर गुजर
सहगायक - पराग मराठे, जयदीप मराठे, अतुल बांदल, विनेश तपस्वी
मिक्सिंग, रेकॉर्डिंग आणि मास्टरिंग- अभिजित सराफ, म्युझिकल स्टार्स, पुणे
निर्मिती - योगेश तपस्वी, अभिजीत सराफ
©️ योगेश तपस्वी
जगणे अवघड आहे खचुनी जाऊ नको
मृगजळ आहे सारे उगाच धावू नको
मोहाचे क्षण येतील तरीही चळू नको
सत्याचा हा मार्ग भला तो सोडू नको
क्षणभरही तू मनात वेड्या आणू नको संशय
ना चिंता ना भय शंकर बाबा की जय
वाट कितीही अवघड असू दे
सोबत दुसरे कुणी नसू दे
सखा सोयरा शंकर बाबा
श्रद्धा त्याच्या चरणी असू दे
मिळो दुःख वा सुख बाबाला विसरू नको
खोट्या कुठल्या भ्रमात वेड्या राहू नको
सोबत असता शंकर बाबा होईल सदा विजय
ना चिंता ना भय शंकरबाबा की जय
असता पाठीशी शंकरबाबा
मिटून जाती साऱ्या चिंता
येती सात्विक भाव फुलोनी
षड्रीपुची ना चाले सत्ता
दुबळ्यांना दे हात मदतीचा माजू नको
फक्त स्वतःच्या साठी काहीही मागू नको
जेव्हा जे द्यायचे बाबा देतील निःसंशय
ना चिंता ना भय शंकर बाबा की जय
कवी- योगेश तपस्वी