Рет қаралды 570
इंटरलाकन हे स्वित्झर्लंड मधील एक अतिशय सुदर असे पर्यटन स्थळ आहे. तळ्यांच्या मधले शहर म्हणून याचे नाव इंटरलाकन असे पडले आहे. या शहरामध्ये बऱ्याच बॉलीवूड सिनेमांची शूटिंग झाली आहे ज्यामुळे इथली ठिकाणे प्रसिद्ध झाली आहेत. प्रसिद्ध हिंदी दिग्दर्शक यश चोप्रा यांच्या योगदानामुळे बरेच भारतीय पर्यटक इथे येतात. म्हणूनच त्यांना स्वित्झर्लंड सरकारने ब्रँड अँबॅसिडर ऑफ इंटरलाकन या खिताबाने गौरविले आहे.