Рет қаралды 107,918
डाळिंबाच्या पानगळ विषयक
- पानगळ आधीची कामे हवीत
- शेणखत बागेला भरलेले असावे
- पानगळ साठी इथ्रेल व औषधांचे प्रमाण योग्य असावे
- पानगळ नंतर बागेत सेटिंग पर्यंत कोणतीही मशागत नसावी
- पानगळ साठी नेहमीपेक्षा ५० लिटर पाणी जास्त वापरावे
- पानगळ होण्यास १०-१२ दिवसांचा कालावधी शकतो
- पानगळ साठी योग्य PH चे पाणी व पावसाळी स्टिकर नक्की वापरावे
- जास्त ताण बसलेल्या बागांनाच पानगळ दिवशी पाणी द्यावे इतर बागांना ७०-८०% पानगळ झाली पाणी द्यावे
- पानगळ नंतर ६०-७०% पानगळ झाली बोर्डो फवारणी द्यावी
- पानगळ नंतर पहिले पाणी हे ८०-९०% पानगळ झाली कि मग द्यावे
- पहिले पाणी किती दिवसांनी द्यावे यापेक्षा पहिले पाणी हे शेंडा जळण्याआधी, काडीमध्ये लवचिकपणा असतानाच द्यावे
- शेणखत पूर्णपणे ओले होईल इतपत पहिले पाणी असावे.
- पानगळ दृष्टीने वरील सर्व मुद्दे सांगितलेले आहे, त्यात काही शंका असल्यास नक्की विचारावे
धन्यवाद.
श्री सुशांत हिरालाल सुर्वे
जयकिसान कृषी सेवा केंद्र
चिखली संगमनेर
फोन ; ७७-२००९-२०११