Рет қаралды 563,639
इथं दररोज 500 लोकांसाठी बनते कंदुरीचे जेवण | अनलिमिटेड खा | तब्बल 15 बोकडांचे मटण शिजते | हॉटेल निसर्ग | Nonveg Hotel | Shivar Food
छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्गावरील फुलंब्री तालुक्यातील हॉटेल निसर्गमध्ये २५० रुपयांत अनलिमिटेड कंदुरी मटणावर ताव मारता येईल. दत्तात्रय पायगव्हाण यांना दिवसभरात शंभर शंभर किलोच्या दोन डेगी कंदुरी मटण दोन टप्प्यात शिजवावे लागते. या हॉटेलमध्ये तर रविवारी, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवारी तब्बल १५ बोकडांचे मटण तांब्याच्या डेगीत शिजवावे. यातील सुपामध्येच मसाले टाकून कंदुरीचा रस्सा बनविला जातो. हॉटेल निसर्गमध्ये महाराष्ट्रातील जेवढे काही नामांकित नॉनव्हेज स्पेशल हॉटेल आहेत, तिथले मालकसुद्धा कंदुरी मटणाची चव चाखायला आळंद गावात येताहेत. फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था इथे आहे. हॉटेलमार्फत लवकरच छत्रपती संभाजीनगरातील खवय्यांना कंदुरी मटण आणि भाकरी घरपोच दिल्या जाणार आहेत. काही दिवसांतच इथे वातानुकूलित रूम्स बांधण्याचे नियोजन आहे.
Address
Hotel Nisarg, Near Aaland Village, Taq. Fulambri. Chhtrapati Sambhajinagar-Jalgaon Road,
Contact No - Mob. 9422717264
#kandurimutton
#nonveg
#hotel
#kandurijevan
#mutton
#hotelnisarg
#hotelmoraya
#shivarfood