मी ताई ची सर्व कीर्तन ऐकते. कीर्तन कसे असावे ह्याचे उत्तम उदाहरण ताई च किर्तन.ताई च्या मुख्यातुन माउली बोलतात ह्याचाच भास होतो.कीर्तन ऐकताना अंगावर रोमांच येतात. कीर्तन ऐकताना खुप सुंदर अनुभव येतात. मन शांत होत.आजच्या काळात ताई सारख्या संताच्या पोस्टमनची समाजाला गरज आहे. माझा साठी ताई संतापेक्षा कमी नाही.🙏🙏 राम कृष्ण हरि ताई 🙏🙏🙏🙏
@rekhasorte5574 ай бұрын
अगदी बरोबर... स्वयंपाक करता करता एक कीर्तन ऐकून घेते रोज...
@Sanskaar_10264 ай бұрын
अगदी बरोबर
@GajananSutar-v4p6 ай бұрын
आमच्या सातारा जिल्ह्याच नाक सांप्रदायातली वाघीण परखड स्वच्छ आणि आचार संपन्न विचाराची माझी आदरणीय रोहीणीताई राम कृष्ण हरि
@anitaathawale75097 ай бұрын
रोहिणी ताई आणि मकरंद बुवा हे माझे खूप आवडते कीर्तनकार आहेत.
@rekhasorte5577 ай бұрын
माझे पण❤❤❤
@kamlakar237 ай бұрын
माझे पण.. सोबत अवंतिका ताई टोळे आणि आफळे बुवा
@kamlakar237 ай бұрын
माझे पण... सोबत अवंतिका ताई टोळे आणि आफळे बुवा
@kanchanshinde31537 ай бұрын
@@rekhasorte557😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮 hmm
@Webdunia-Marathi6 ай бұрын
kzbin.info/www/bejne/Z369lWygmpuSqbc
@madhukarambade25707 ай бұрын
या माउली एक आदर्श कीर्तनकार आहेत ! सद्याच्या कीर्तनकार मुलींनी हा आदर्श आवर्जून घेण्यासमान आहे !
@udaydandekar12657 ай бұрын
सौ.रोहिणी ताई माने परांजपे यांची कीर्तने ऐकणे म्हणजे आनंदाची धार्मिक पर्वणी आप्पा मार्जने बुवा आफळे बुवा व अनेक नामवंत कीर्तनकारांनी रोहिणी ताईंची खूपच वाहवा केली आहे कर्ण मधुर आवाजाची आपल्याला दैवजात देणगी आहे अशाच कीर्तन करत राहा दांडेकर ज्वेलर्स खेड यांजकडून शुभेच्छा
@shreewani7 ай бұрын
रोहिणी ताई चें कीर्तन म्हणजे एक सुंदर पर्वणी च म्हनावी , आपल्या सहज सुंदर बोलण्यांतून श्रोत्यांच्या हृदयाला केंव्हा भिडतो हे कळत नाही व श्रोत्यांची मने फुलत जातात इतके शब्दांचे बळ रोहिणी ताईं कडे आहे .
@rameshkulkarni51176 ай бұрын
श्रीराम...आजच फेस बुक वर वाचलं की ह.भ.प. सौ. रोहिणी ताईंच्या जिभेवर साक्षात सरस्वती वास करते हे अगदी तंतोतंत लागू पडते 🙏🙏🙏🙏🙏
@avinashkhire11174 ай бұрын
खूप सुंदर व आकर्षक अशी कीर्तन सादर करण्याची परंपरा जपत आहेत रोहिनीताई. हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा!
@anitaathawale75097 ай бұрын
मी त्या सुलेखा तलवळकरला कितीदा सांगितले की रोहिणी ताईंना बोलवा पण तिने काही कान हलवला नाही.पण no problem माझी इच्छा आपण पूर्ण केलीत धन्यवाद वेबदुनिया वाले.Thanku very much
@SurprisedCardinal-nm5sq5 ай бұрын
ती सुलेखा नट्या ना बोलवते रोहिणीताई तिला समजेल तरी का 😄
@VijayDike-zw4ts4 ай бұрын
Vijay
@purnimashinde686628 күн бұрын
Hona
@anitajoshi52397 ай бұрын
मी ताईंची सर्व कीर्तने इकत असते. माननीय श्री आफळे बुवा यांची कीर्तने म्हणजे पर्वणीच असते. ताई खूप छान कथा सांगतात. ❤
@sharayushrigadiwar36357 ай бұрын
आत्ता सज्जनगडा वर दासबोध पारायणात रोहिणीताईचं कीर्तन ऐकलं. बाहेर धो धो पाऊस होता आणि आत यांची वाणी. अप्रतिम कीर्तन झालं.संस्थान च्या लोकांनी रेकॉर्डिंग केलं पण आवाज रेकॉर्डिंग झालं नाही. असं वाटलं ते फक्त आमच्यासाठी आणि रामरायासाठीच होतं. अलौकीक अनुभव होता. 🙏
@gopalthorat93806 ай бұрын
धन्य ते माता पिता ज्यांच्या उदरी रोहिनी ताई सारखी कन्या जन्मास आली माझी मुलगी सुद्धा रोहीनी नावाची आहे मला तिचा खुप अभिमान आहे
@shubhadapatankar30575 ай бұрын
मुलाखत उत्तम घेतली. नेटके नेमके प्रश्न विचारल्या मुळे रोहिणी ताईंना भरपूर बोलायची, विचार मांडण्याची संधी मिळाली. उत्तम संवाद ❤❤
@chandrakantugile86557 ай бұрын
रोहिणी ताई च किर्तन, समाज कल्याणचा खजिना आहे, प्रत्येकांनी मनापासून ऐकावे आणि समजून घ्यावे.💐👏
@SarthakKulkarni-x5m6 ай бұрын
माझ्या अतिशय आवडत्या कीर्तनकार रोहिणी ताई,love you so much ताई ❤
@veenapande93927 ай бұрын
रोहिणीताईचे कीर्तन म्हणजे पर्वणी असते... रामकृष्णहरी 🙏🏻🙏🏻
@vasantchavan12216 ай бұрын
आषाढी एकादशीनिमित्त प्रा.रामकृष्ण मोरे सभागृहात सकाळ समूहातर्फे आयोजित "नाचू कीर्तनाचे रंगी" या पाच दिवसांच्या कीर्तनातील एक पुष्प ह.भ.प.रोहिणी ताईंनी गुंफले,जात हाऊस फूल सभागृहातील आबालवृद्ध भान हरपून विठ्ठल मय झाले होते. 👏👏
@rautnp12386 ай бұрын
खूपच छान ताई, आपले किर्तन मी यु ट्युब वर रोज ऐकतो. आपले कीर्तन मला खूप आवडते.
@anandmayekar8727 ай бұрын
रुपाली ताई - वेबदुनिया - मराठी , " किर्तन " माणसाला काय शिकविते हे ज्या अष्टपैलू किर्तनकार ताईंनी मला या वयात (६८} शिकविले अशा माझ्या आदर्श हभप रोहिणी ताईंची आपण मुलाखत सादर करून माझा आजचा दिवस सर्वांर्थाने सार्थ केला ! या बद्दल आपले आणि आपल्या वाहिनीचे मनःपूर्वक आभार 🙏 यापेक्षा या मुलाखती बद्दल जास्त सांगणे न लगे ! सरस्वती माता आणि गणरायाची मती ज्या विदुषी च्या प्रभावी वैखरी तून प्रवाहित होते त्या आमच्या सौ. रोहिणी ताईंना साष्टांग दंडवत 🙏
@pradeepchavan81446 ай бұрын
आपण ह.भ. प रोहिणीताई परांजपे यांची अप्रतिम मुलखात सादर केलीत.आपले व ताईचे मनःपूर्वक आभार .
@minalmapuskar9515 ай бұрын
रोहिणी ताई तुमचं कीर्तन म्हणजे आत्म्याचं परमात्म्याशी एकरूप होणं. तुमच्या मुखातून पडणारा प्रत्येक शब्द परमेश्वर समोर उभा आहे आणि सुख दुःख सगळं आपणच अनुभवतोय इतकं जिवंत रसभरित कीर्तनाची गोडी तुम्ही लावलीत. मी तुमचं प्रत्येक कीर्तन ऐकून प्रसंगानुरूप हसण्याचा भावनिक होऊन रडण्याचा आनंद घेते मग सगळ्यांना शेअर करते. तुमचं कौतुक शब्दात मांडणं कठीण आहे. तुमच्या मुखातून परमेश्वर पाझरतो आणि आम्ही तो ग्रहण करतो. ❤❤🙏🙏👏👏
@SANIkalarang7 ай бұрын
खूप छान.सात्विकता याचं उत्तम उदाहरण म्हणजे रोहिणी ताई
@bhagavanjagadale33352 ай бұрын
खूप सुंदर ताई आज आपले या मुलाखतीच्या निमित्ताने दर्शन झाले मी अंबक कडेगाव तालुक्यातील वारकरी संप्रदायातील एक माळकरी व्यक्ती आपले कीर्तन प्रथमता अंबक पारायण मंडळात ऐकलं होतं तेव्हापासून आपले कीर्तन यूट्यूब ला रोज एक तरी कीर्तन ऐकत आहे आपली या कार्यातील योगदान एक-दोन अखंड चालू राहावे हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना धन्यवाद राम कृष्ण हरी
@pushpasalunke12634 ай бұрын
आई आपण मुक्ताई सारख्या बालपणापासून किर्तन सुरू केले मी सेवानिवृत्त शिक्षिका जुलै महिन्यात स्वेच्छानिवृत्ती घेतली अन् युट्यूबवर आपल्या ज्ञानगंगेत फक्त तिर्थप्राशन करण्याचा सुवर्ण योग आला फक्त 5/6व्हिडीओ मनापासून ऐकते आपल्या स्वर सरस्वती ने तर तन मन धन चिंबचिंब होते आनंदाचे डोही आनंद तरंग अनुभव घेत आहे निरोगी दीर्घायुष्य मिळो हीच पांडुरंग चरणी प्रार्थना
@mr.k.h.kharsekar62606 ай бұрын
नवीन पिढीतील महिला किर्तनकार माऊली रोहीणी ताई फारच छान सुंदर अप्रतिम निरुपण. माऊलींचा तुम्हाला आशिर्वाद आहे.जय जय रामकृष्ण हरी.जय श्री गणेश.
@vitthaldesai82227 ай бұрын
कीर्तन चंद्रिका ह. भ. प. सौ . रोहिणी ताई परांजपे यांचे कीर्तनविषयी प्रगल्भ सात्विक विचार श्रवण करणेस मिळाले . राम कृष्ण हरी 🎉🎉🎉🎉
@dishanaik387 ай бұрын
ह.भ.प. रोहिणीताई आपला वागण्यातला साधेपणा आपला मधुर आवाज आणि आपले कीर्तन अप्रतिम अगदी तल्लीन होऊन जातो आम्ही
@madhurikarmalkar37425 ай бұрын
रोहिणीताई तुमचे कीर्तन ऐकताना वेळेचे भानच रहात नाही.अतिशय सुंदर विषयाची मांडणी, सुंदर खणखणीत आवाज. ऐकतच रहावे वाटते. सध्य स्थितीत तुमच्या सारख्या कीर्तनकारांची देशाला फार गरज आहे. सर्व हिंदू समाज संघटित होऊन आपल्या धर्माची ताकद दाखवतील यासाठी आपण समाज प्रबोधन करालच अशी आशा आहे.
@vijaybakshi91504 ай бұрын
कोल्हापूरात शेवडे गुरुजी, चारुदत्त आफळे, याचे प्रमाणे रोहीणी ताईनी कमी कालावधी त उत्तम कीर्तन कार असा नावलौकिक मिळवला आहे मस्त
@jyotiverulkar73954 ай бұрын
श्री .मकरंद बुवा ह्याचे आमच्या डहाणुला गजानन महाराज मंदिरात झालेले कीर्तन प्रत्यक्ष ऐकले खुप सुंदर असते.तसेच मा.आफळे बुवा .,माऊली रोहिणी ताई तुम्हा दोघांची कीर्तन टीव्हीवर ऐकते खुपच सुंदर कीर्तन असतात मन भारावून जात. 🙏 रामकृष्ण माऊली🙏
@JayanandaKolekar4 ай бұрын
खूप छान वाटले बोलणं आवाज खूप कर्णमधुर वाटला देखणेपणही विचाराप्रमाणेच खूप खूप सुंदर
@Shriramupasana05737 ай бұрын
अतिशय सात्विक आणि रसाळ वाणी ज्यांना लाभली अशा सोज्वळ कीर्तनकार, रसाळ गायन आणि रुबाबदार सादरीकरण विषयानुसार शरीराचे हावभाव, वीर रसातील सादरीकरण एक महिला म्हणून खूपच रुबादार असते. ताईना खुप खुप शुभेच्छा आणि अभिनंदन. 💐💐💐🚩🚩🙏🙏
@rachotiswami78094 ай бұрын
धन्य ताई!!.. ५६ भोग पक्वान्न खाल्यावर मिळणारे समाधान.. आपले विचार ऐकून मन तृप्त झाले... साष्टांग नमन!
@milindraskar6 ай бұрын
रोहिणी ताई आद्यात्मा मधील नाडी ओळखली आपण खूप छान पद्धतीने आपण संत बद्दल लोकांच्या मनात आवडत निर्माण करता. जय योगेश्वर 🙏🏻🙏🏻
@smartmandar4 ай бұрын
वाह उत्तम विवेचन आणि प्रेरणादायक.
@rajashreeshaligram89827 ай бұрын
आम्ही गंधे महाराजां चे कीर्तन खूप ऐकले , आणि मकरंद बुआ रामदासी सुमंत यांचे किर्तन ऐकले , खूप छान मुलाखत
@sureshkukade91085 ай бұрын
ऊत्तम कला आत्मसात केली फारच सुंदर प्रवेचन धन्यवाद!
@laximankatake84906 ай бұрын
धन्यवाद ताई, आपली मुलाखत मला खुप खुप आवडली, अभिनंदन.......
@bharatmahaan29916 ай бұрын
छानच... आजच्या काळात अशा विचारांची खूप गरज आहे.
@anuradhanarkar59904 ай бұрын
श्रवणीय मुलाखत ह. भ. प.रोहिणी ताई च्या kertana ईतकी श्रवणीय
@madhavijage72535 ай бұрын
रोहिणी ताईंचे कीर्तन म्हणजे माझ्या हृदयाला स्पर्श करून जाणारे कीर्तन. मला एक नंबर आवडते त्यांचे कीर्तन.
@RajendraZodge7 ай бұрын
ताईंचे किर्तन समक्ष श्रवण केले खुपच भावले किर्तनात चिंतन मांडण्याची पद्धत खुपच छान आहे आणि ताईंच्या किर्तनात त्यांचा भगवंता विषयी असणारा निस्सीम भाव दिसून येतो. रामकृष्णहरि🙏🙏🙏
@MadhuriKawadaskar4 ай бұрын
नमस्कार रोहिणीताई खुप खुप सुंदर असतात कीर्तन। आम्ही नेहमी ऐकतो मन भारावून जातं।🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
@spupadhye88426 ай бұрын
ताई तुमचं किर्तन आम्हाला खूप आवडते.. मन प्रसन्न होते. किर्तन हे पून्हा , पुन्हा ऐैकावे वाटते.. धन्यवाद ताई 🎉
@हरीभक्तीसेवासंघ6 ай бұрын
अशा माऊली आहेत म्हणून आणि म्हणूनच आज कलियुगात देव देश धर्म याची जाणीव नवीन पिढीला होत आहे. ज्ञान, वैराग्य आणि सामर्थ्य हाच लाभ किर्तन श्रवणातआहे जय जय रघुवीर समर्थ
@GSMkamal6 ай бұрын
बाबा महाराज सातारकर् आणि या रोहिणी ताई परांजपे सर्वोत्कृष्ट कीर्तनकार आहेत 👌🏽👌🏽👌🏽🙏🙏🙏🚩❤
@SangitaJoshi-z2p4 ай бұрын
आदरणीय रोहिणी ताई 🙏 विषय कुठलाही असो विषय कोणताही असो भक्ती आत्मभान होते ऐकतच रहावे असे आपले किर्तन असते . राम कृष्ण हरी🌹🙏
@vimalgaikwad88366 ай бұрын
खुप सुंदर सांगितले ताई धन्यवाद नमस्कार माऊली
@bhagyashrirashinkar2824 ай бұрын
अप्रतिम मुलाखत ताई ची असेच चांगले विचार लोकांना पर्यंत जायला पाहिजे smajyala याची grj आहे तरुण वर्ग या कडे आला पाहिजे आणि सगळ्यानी कीर्तने eekle पाहिजे
@harshadakamat8420Ай бұрын
खूप खूप शुभेच्छा ताई तुम्हाला तुमची किर्तन प्रवचन छान ऐकायला मिळते हे माझे भाग्यच आहे
@anjalivatharkar80087 ай бұрын
रोहिणीताई ....रामकृष्ण हरी🙏🙏मला तुमची कीर्तन ऐकायला खुप आवडतात.अतिशय सुंदर आवाज आहे तुमचा एक वर्ष तुमच्याकडे शिकण्याचा लाभ मिळाला .
@anjalivatharkar80087 ай бұрын
ताईंना खुप खुप शुभेच्छा.कीर्तन ऐकताना मन तल्लीन होत.
@BalasahebHagawane-ui5on5 ай бұрын
**रोहिणीताईंनी आपल्या अमोघ वाणीने सर्वांसाठीकीर्तन खुप खुप लोकप्रिय केले आहे फार फार आभार **
@MOHANSATHAYEАй бұрын
खूप छान! वेब दुनिया-मराठी व सौ रोहीणी ताई! मुलाखत खूप प्रेरणादायी वाटली. आज 'धर्मप्रेम आणि देशप्रेम' या मार्गाने योग-साधना, कीर्तनद्वारा करवून घ्यावी!... आपणा करवी किती उच्च कार्य होत आहे!!! धन्य आपला चॅनल, गुणी कीर्तनकार, अन् धन्य आम्ही श्रोते !!! शतश: प्रणाम! ❤🙏
@moreshwarpimputkar4768Ай бұрын
ताई तुमचं कीर्तन आम्ही ऐकतो खूप छान वाटतं मन तृप्त होते तुम्हाला पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा
@jyotinene92567 ай бұрын
रोहिणी ताई तुमच्या किर्तनातचं तुमचा साधेपणा आहे आणि खूप छान किर्तन तुंम्ही करता मला ऐकायला आवडतं 🎉
@NirdoshGaikar5 ай бұрын
बाबा महाराज सातारकर व रोहिणी ताई मला आवडता त्याचि किर्तन
@madhurikulkarni4667 ай бұрын
रोहिणीताईंचे कि र्तन म्हणजे पर्वणीच खूपछान असते पूर्णसमाधान होते
@PrasadJoglekar-v7h4 ай бұрын
आवजची उत्तम देणगी लाभलालेलं ओजस्वी वाणी ताईचा कीर्तन रुपी प्रसाद आहे.
@advaitoak59357 ай бұрын
खूपच छान मुलाखत झाली आणि घेतली सुद्धा रोहिणी ताई ची कीर्तने मलाही खूपच आवडतात त्यांचे प्रत्यक्ष कीर्तन डोंबिवलीत ऐकले आहेच आणि कीर्तन विश्व च्या माध्यमातून खूप कीर्तने ऐकली आहेत ऐकते त्यांचा अभ्यास खूप दांडगा आहे खूप मोठ्ठा व्यासंग आहे भाषेवरील प्रभुत्व अचाटच आहे रोहिणी ताई तुम्हाला खूप शुभेच्छा ( सौप्राजक्ताओकडोंबिवली)
@PoonamShinde-u2h5 ай бұрын
ताई तुमचा आवाज खूप गोड आहे खूप लहान वयात खुप छान कीर्तने सांगता भाषा खुप सुंदर आहे एकदा समोर भेटण्याची इच्छा आहे 🙏🙏
@VishalKamble-v4d5 ай бұрын
खूप छान असतात कीर्तन ताईंचे
@manjirijoshi6757 ай бұрын
खूप छान कीर्तन करता ताई मी फेसबुक वर पाहते
@snehalchiplunkar52985 ай бұрын
खूप सुंदर,कीर्तन मनापासून समजून घ्यावे.....खूप छान व्यक्ती.....
@saeesatam45595 ай бұрын
मस्त मला शबरी कळली रोहिणी ताई कडून कळल तुम्ही म्हणता की नवीन पीडी साठी ताई पुरे आहेत
@pravinkale40035 ай бұрын
खुप अप्रतिम छान राम कृष्ण हरि ताई 🚩🚩 आजचे हनुमान मंदीर कृष्णानगर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी काल्याचे किर्तन खुप खुप अप्रतिम होते किर्तन ऐकून मन तृप्त झाले . 🙏🙏
@sujatajambukeshwaran25087 ай бұрын
खूप सुरेख सादरीकरण असते सौ रोहिणी ताई ची
@jivandharmadhikari14796 ай бұрын
ताई आपले कीर्तन फार छान असतात त्यामध्ये फापट पसारा नसतो धन्यवाद
@rameshkulkarni51176 ай бұрын
आपल्या कीर्तना इतकीच आजची मुलाखत श्रवणीय वाटली🙏🙏
@rameshkulkarni51176 ай бұрын
इंदोर मधील मुलाखत
@spiritualmakarand64687 ай бұрын
रोहिणी ताईंची कीर्तने मी नेहमी ऐकतो. त्यांचा interview आवडला.
@indumatipawar95324 ай бұрын
रोहिणी ताई महाराज माऊली, तुमच्यासारख्या कीर्तनकार असतील तर तरुण पिढी सुद्धा कीर्तन ऐकण्यासाठी उत्सुक राहीलच. श्रवणीय किर्तन, चिंतनीय किर्तन, एकनाथ सगळे दंग होतात. जय हरी माऊली🎉🎉
@ShwetaJoshi-n8o2 ай бұрын
Madhura खूप छान तुझे कीर्तन मी ऐकते मन भरून जातं.कीर्तनात रंगून जाते.अप्रतिम कीर्तन करतेस great
@sulbhaketkar46117 ай бұрын
फार सुंदर मुलाखत अगदी वेगळ्या स्वरूपात रोहिणी ताईं बघायला मिळाल्या
@RohiniTakale-h1iАй бұрын
खुप छान किर्तन असतं ताईंच मी आजपर्यंत कधीच किर्तन इतकं मन लाऊन ऐकलं नव्हतं,पण आता रोज सकाळी मी ऐकतेच 🙏
@namdeodoifode78967 ай бұрын
ताई सलाम तुमच्या ज्ञानाला व व्यक्त होण्याच्या शैलीला.
@raj519637 ай бұрын
रामकृष्ण हरी माऊली🙏🙏🚩🚩 रोहिणीताईंचे कीर्तन खुप छान असते, मन प्रसन्न होते व समाज प्रबोधन तर अप्रतिम 👏👏👌👌 पुढील कीर्तनासाठी शुभेच्छा 💐💐🙏🙏
@sheelanaik43057 ай бұрын
खूप अभ्यास पूर्ण कीर्तने असतात, साडे गाव la दरवर्षी कीर्तन ऐकण्याचा योग येतोच
@AdagleBapu7 ай бұрын
जय हरी ताई, मी आपले सोशल मिडिया च्या माध्यमातून अनेक कीर्तन चा आस्वाद घेतला आहे. ताई आपण खुप आभ्यासू आहात. एक वेळी प्रत्यक्ष कीर्तन ऐकण्याची इच्छा आहे.
@sulochanalomte20525 ай бұрын
रोहीणीताई बोलुन लागल्या की हे माझ्या मनातलं आहे हे पटु लागतं.ताईंच्या शब्दांची पखरण त्या नवनवीन विचार अंतःकरणात उतरवतात , वसवतात . माझ्या अत्यंत आवडत्या किर्तन कार आहेत. जय जय राम कृष्ण हरि
@sunitasudrik51227 ай бұрын
ताई खूप छान बोलतात , किर्तन अप्रतिम करतात , मला त्यांचे किर्तन आवडते !!🎉🎉
@laxmanwalunj65477 ай бұрын
भारतीय कीर्तन परंपरा फार प्राचीन आणि समृध्द आहे. नारदीय, सांप्रदायिक, राष्ट्रीय कीर्तन अशा विविध प्रकारे कीर्तन सादरीकरण केले जाते. त्या अनुषंगाने छान मार्गदर्शन करत कीर्तनकार रोहिणीताई परांजपे यांनी केले
@purnimashinde68666 ай бұрын
माझ्या आवडता कीर्तनकार सन्माननीय रोहिणी ताई आपण आहात भाग्य लाभले तर भेटायला आवडेल
@suchitramokashi40525 ай бұрын
ही कीर्तन ऐकताना मन फार आनंदी होत !आणि सतत ऐकत रहावं असं वाटत
@prajaktakadkol7967 ай бұрын
वाह... तुमचे कीर्तन ऑनलाईन च ऐकले आहे जसे तुमच्या विषयी कळले किंवा आपली ओळख झाली. आणि ते कायमच भावत गेले. श्रावणविषयीचे महत्व ही पुनः एकदा जाणले 🙏🏻🙏🏻.. तुम्हाला खूप शुभेच्छा.. 🙏🏻
@prakashmusmade70976 ай бұрын
तांईच्या चरणी नतमस्तक
@madhurijoshi99667 ай бұрын
वा वा रोहिणी खूप छान बोललीस. तुझी सर्वच कीर्तने उच्च दर्जाची असतात. मी तुझ्या किर्तनांची चाहती आहे हे तुला माहीत आहेच.❤
@mayurpramod87807 ай бұрын
सौ रोहिणी बेटा I am proud of you Ram Krishna Hare
@bhagyashrirashinkar2824 ай бұрын
खूप छान मुलाखत आपली आपला आवाज खूप सुंदर आहे मी आपली कीर्तने eekle खूप छान वाटते मनात वाईट विचार येत नाही
@diptishailesh7 ай бұрын
खूप छान! माझ्याही आवडत्या कीर्तनकार आहेत रोहिणीताई.🙏🙏 आम्हीही घरात सगळे जण रोहिणीताई आणि मकरंदबुवा यांचे ऐकत असतो. ! जय जय रघुवीर समर्थ!🙏🙏🚩
@PadmajaBorde7 ай бұрын
नमस्कार ताई तुमचे सगळे किर्तन मी नेहेमीच ऐकते तुमचे अप्रतिम सादरीकरण असते प्रत्यक्षात ऐकण्याची इच्छा आहे
@manishachavan26354 ай бұрын
नमस्कार ताई तुमचे किर्तने खूप प्रेरणा दारी आहे.रोज पहाटे मी मी रोज ची सुरुवात तुमच्या कीर्तनाने करते. तुमच्या या प्रेरणादायी कीर्तनाने
@meenakulkarni52727 ай бұрын
अतिशय सात्विक किर्तन करतात ताईंचा आवाज गोड वाणी ओजस्वी आहे
@adityakarmarkar66997 ай бұрын
प्रत्यक्ष ऐकायला अजून मिळाले नाही पण यू ट्यूब वर ऐकले आहे, श्रवणीय कीर्तन ,शुभेच्छा रोहिणी ताई
@VinayaJoshi-v2e6 ай бұрын
रोहिणी खूप छान बोललीस . तुझ्या या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा . तू अगदी सहजगत्या तुझ्या मधूर आवाजात सगळी कीर्तन आख्यान ऐकायला छान वाटते . तुझी सगळीच किर्तन फाफारच श्रवणीय असतात . छान मुलाखत घेतली . रामकृष्ण हरि 🙏🙏🙏🙏🌹🌹
@revatikolekar42562 ай бұрын
रोहिणी ताई खूप छान, धन्यवाद,
@ekanathwankhede34926 ай бұрын
जय श्री राम, रोहिणी ताई आपले किर्तन मला खुप आवडते.मी वेळ काढून नियमीत ऐकतो.आपल्या किर्तनात अध्यात्मावर आधारित खुप छान आहे,त्यात समाजातील ज्या काही वाईट प्रवृत्ती वाढत आहे,त्यावर समाज जागृती विषयावर खुप भर द्याल ही विनंती. .. धन्यवाद माऊली ..... वानखेडे डोंबिवली