Рет қаралды 666,128
Mutton Recipe | Spicy Homemade Mutton Recipe | Gatari Special | झणझणीत गटारी स्पेशल मटण | Recipe By Gharcha Swaad
Click here to Download the Meesho App 👉🏽 meesho.com/inv...
Use my Referral Code to sign up on Meesho app to get extra Discount 👉🏽 [ JUNIRYG931 ]
OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 / mihaykoli
Buy Meyer Pans: bit.ly/2RqBNFS
Coupon Code: [ GS15 ] for 15% off
Mutton Vade Recipe | मटण वडे - • आगरी कोळ्यांच्या हळदील...
घरगुती पद्धतीचा स्वादिष्ट मसाला | Traditional Masala - • Agri Koli Homemade Mas...
साहित्य - १ किलो बकऱ्याचे मटण, ४ कांदे पात्तळ काप केलेले, १½ कप भाजलेले सुके खोबरे, २ हिरव्या मिरच्या, मूठभर कोथिंबीर, ३½ tblsp आले लसूण ठेचलेले, १ लसणाचा कांदा ( पर्यायी ) , एका बटाट्याचे फोड ( पर्यायी ), ४ tblsp घरगुती लाल मसाला, १ tsp हळद, ३ तेजपत्ते, ४/५ लवंगा, ८/९ काळीमिरी, २ मसाला वेलची, २ हिरवी वेलची, ½" दालचिनी, १ चक्रीफूल, चवीनुसार मीठ आणि ८/९ tblsp तेल.
कृती - पातेल्यात एक चमचा तेल गरम करून त्यात अर्धा कांदा तांबूस करावा आणि काढून घ्यावा. पुन्हा त्याच पातेल्यात ७/८ tblsp तेल गरम करून त्यात अख्खा गरम मसाला फोडणीला घालावा. गरम मसाला फुटू लागला कि त्यात उरलेला कांदा घालून मऊ करावा. एका बाजूला ३ ग्लास पाणी उकळत ठेवावे. कांदा मऊ झाल्यावर त्यात ठेचलेले आले लसूण घालावे आणि खमंग परतावे. परतून झाल्यावर त्यात हळद आणि घरगुती लाल मसाला घालावा. मसाला तेलात परतून घ्यावा. त्यानंतर यात स्वच्छ केलेले मटण घालावे आणि मसाल्यात एकजीव करून घ्यावे. एकजीव झाल्यावर यात १½ ग्लास उकळते पाणी घावे आणि एकजीव करून वर १५ मिनिटे झाकण ठेवावे. आता मिक्सरला भाजलॆले सुके खोबरे, २ मिरच्या, कोथिंबीर आणि तळलेला कांदा घालून बारीक वाटून घ्यावे. १५ मिनिटांनी झाकण उघडून मटण घोळून घ्यावे. आता यात लसणाचा कांदा, बटाट्याचे फोड आणि चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं आणि पुन्हा वर १५ मिनिटे झाकण ठेवावे आणि वाफ काढावी. १५ मिनिटांनी झाकण उघडून मटण घोळून घ्यावे. आता यात तयार वाटण घालावे आणि जर रस्सा कमी जास्त करावयाचा असल्यास यात पुन्हा गरम पाणी घालून ग्रेव्ही बॅलन्स करू शकता. आता शेवटची १५ मिनिटे वर झाकण ठेवून वाफ काढावी आणि गॅस बंद करावा. तयार वाफाळते मटण हे मटण वड्यांसोबत सर्व्ह करावे. ( मसाला परते पर्यंत गॅस मध्यम ठेवावा आणि गरम पाणी घातल्यानंतर गॅस मोठा करावा. )
#gatarispecialrecipe #muttonrecipe #spicymuttonmasala
If you liked the video, Please Like & Share.
.................................................................................................................
Like Our facebook Page 👉 / gharcha.swad
Follow Us On Instagram 👉 / gharcha_swaad
Join Us On Facebook 👉 / gharcha.swaad
For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com