Рет қаралды 7,922
© 2000 भू कोतापूर ग्रामस्थ मंडळी ❤
कोकण पट्ट्यात विशेषतः रत्नागिरी संगमेश्वर लांजा राजापूर आणि देवगड व सिंधुदुर्ग या भागात पारंपारिक कोकणी आरत्या करण्याची पद्धत आहे. ही परंपरा खूप प्राचीन आहे. काही आरत्या शिवकालीन म्हणजे रामदास स्वामींनी लिहिलेल्या आहेत तर काही आरत्या रामदास स्वामींच्या समकालीन व त्यानंतरच्या काळात लिहिल्या गेलेल्या आहेत. या आरत्या विशेषतः गणेशोत्सवात व व नवरात्र उत्सव आणि विविध देवतांचे उत्सव याप्रसंगी तबला पेटी च्या साथीने विशिष्ट लयीमध्ये वर्षानुवर्षे म्हटल्या जातात परंतु सध्याच्या काळामध्ये ही परंपरा लुप्त होते की काय अशी भीती वाटू लागली आहे यास्तव जुन्या जमान्यातील हा अमूल्य ठेवा डिजिटल स्वरूपात जतन करण्याचा हा छोटासा प्रयत्न. या आरत्या ज्यांच्या मार्फत उपलब्ध झाल्या त्या सर्वांचे खूप आभार...