Рет қаралды 271
कविता। 👆💑 मंगळसूत्र 🌹
कवी 👨🎤🌊 महाबली मिसाळ
मो। 🕉 ९७३०३४४०४१
प्रिय बायको,
तू काढुन तुझ्या गळ्यातील मंगळसूत्र
माझी मैत्रिण हो ।
जीव लाव तू मला
बायको पेक्षा ही जास्त ।
अन हो माझी सखी,
प्रियसी मैत्रीण........
पण नको होऊ माझी बायको ।
फक्त मंगळसूत्रात अडकलेली ।
मुलात गुंतलेली ,आपलं सर्वस्व हरवलेली ।
तू काढून तुझ्या गळ्यातील मंगळसूत्र ।
माझी प्रियसी हो।मला हवी असलेली
🤔😳💑💑💏💑💑😳🤔
मी सत्ता धारी पक्ष असलो
तू विरोधी पक्ष हो
माझा पक्षात राहून
तू माझा जयजयकार करू नकोस
विरोध कर माझा तू
मी चुकीचे वागल्यावर
अन हो साथ ही दे मला
मी योग्य केल्यावर ।
फक्त मला तू गोड बोलू नकोस
छान छान म्हणू नकोस
प्रखर टीका कर ।
कणखर बोल ।
अन हो, मी रस्ता भटकल्यावर
तू वाट दाखव मला तुझा हृदयात पोहचवनारी
तू काढून तुझ्या गळ्यातील मंगळसूत्र ।
माझी प्रियसी हो।मला हवी असलेली
🤔😳💑💑💏💑💑😳🤔
तुला वाटेल तो ड्रेस तू परिधान कर ।
फक्त साडीत अडकू नकोस ।
अन हो वाटेल ते माघ
शंका कुशंका काही करू नकोस ।
तू जगाचा विचार सोडून दे
मला नावाने हाक मार ।
उगाच अहो, ऐका ना
अशी आर्जवा करू नकोस
अधिकार गाजव तुझा माझावरचा
तू माझी अर्धांगिनी आहे
हे तू विसरू नकोस ।
अन ह्या बंधनातही तू
अडकू नकोस ।
बन माझी प्रियसी
मला हवी असलेली ।
मला उशीर होतो
तुला ही होउदे ।
जसा तुझा माझावर विश्वास आहे
तसा मीही तुझावर दाखवेल ।
अन तू बायकोची प्रियसी झाल्यावर
तू बदलणार नाही
पण मी तुझ्यासाठी नक्कीच बदलेल ।
आता लक्ष देत नाही ना
हट्ट पुरवत नाही ना ।
पुरवेल
अन तुला ।
आता ही प्रेम करतो
प्रियसी झाल्यावर अजूनही प्रेम करेल ।
तुझा सोबत जगेल
अनुभवेल
नवं आयुष्य माझे
होईल ना तू पूर्वीची प्रियसी मला हवी असलेली
तू काढून तुझ्या गळ्यातील मंगळसूत्र ।
माझी प्रियसी हो।मला हवी असलेली
…...............😳…................