Рет қаралды 47,682
खाडीतली काळी खेकडी बिळातून कसे काढतात ? | Crab Cathing In Creek | Konkan Vlog मित्रांनो मी माझ्या कोकणातील गावी आलो की आमच्या भाराजा नदीच्या खाडीमध्ये बिळातील काळे खेकडे पकडण्यासाठी जात असतो. आमचा शेजारी अज्या माझा भाऊ खाडीतली काळी खेकडी हाताने पकडण्यासाठी गेलो होतो. पावसाळ्यात पाऊस कमी झाला की गावातील माणसे बिळातून खेकडे पकडायला जातात. या मोसमात खेकडे भरलेले असतात. खेकडे पकडण्यासाठी विशिष्ट प्रकारची उपकरणे वापरली जातात. खकडे पकडण्यासाठी जी उपकरणे वापरतात त्यातील डानखराडी, पेनकान, जाबरी, कोयती वापरली जाते. बिळातील खेकडी काढण्यासाठी अगोदर आपल्याला खेकड्याची बिळे शोधावी लागतात. पावसाळ्यात खेकड्यांची बिळे ओळखता येत नाही कारण पाऊस पडत असतो. खेकड्यांच्या बिळाच्या बाहेर मऊ चिखल असतो आणि त्यांच्या पायांच्या खुणा असतात. बिळात एका वेळेस दोन दोन नर आणि मादी असे जोडी सुद्धा मिळतात. खाडीतील खेकडे पकडण्याचा समा असतो. पौर्णिमा किंवा अमावस्या झाली की सप्तमी किंवा अष्टमीच्या दिवशी ओहोटी असते तेव्हा खेकडे पकडण्यासाठी जावे लागते. एका वेळेस 20 ते 30 खेकडी बिळातून सापडतात. काही वेळेस खेकड्यांची बिळे बांधलेली असतात. तेव्हा कमी वेळात जास्त खेकडी सापडतात कारण बिळे शोधावी लागत नाहीत.
#CrabCatching #CrabInCreek #HowToCatchCrab #sforsatish
बिळातून खेकडे पकडणे तसे सोपे काम नाही परंतु ज्यांना खेकडे पकडण्याचा अनुभव आहे तेच बिळातून खेकडे पकडू शकतात. बिळातून काढलेले खेकडे भरलेले असतात म्हणजे त्यामध्ये मास जास्त असतो. खेकडे पडण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. पगोली टाकून, जाळ्यातून खेकडे पडतात तसेच बिळातून पारंपारिक पद्धतीने उपकरणे वापरून सुद्धा खेकडे पकडले जातात. तुम्हाला खाडीतल्या बिळातून काळी खेकडी कसे पकडतात हेच या व्हिडिओमध्ये दाखवले आहे. व्हिडीओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुम्ही तुमच्या गावी असे खेकडे पकडता का? आम्हाला जरूर कमेंट करून कळवा.
फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा!
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar