Рет қаралды 21,355
Ya Zopdit Mazya / या झोपडीत माझ्या
किती आनंदी आनंद, या झोपडीत माझ्या ||धृ||
राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली |
ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या ||१||
भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे |
प्रभुनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या ||२||
पहारे आणि तिजोऱ्या, त्यातुनि होती चोऱ्या |
दाराशी नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या ||३||
जाता त्या महाला मज्जाव शब्द आला |
भीती न यावयाला, या झोपडीत माझ्या ||४||
महाली मऊ बिछाने कंदील शामदाने |
आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या ||५||
येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा |
कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या ||६||
पाहून सौख्य माझे, देवेंद्र तोही लाजे |
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या ||७||
'तुकड्या' मती करावी, पायी तुझ्या नमावी
मूर्ती तुझी रहावी, या झोपडीत माझ्या ||८||
****************************************************
गायक/संवादिनी... श्री मिसाळ गुरूजी आळंदी.
तबला/तानपुरा.. डिजिटल तबला मास्टर.
तबला कंट्रोल... श्री रामकृष्ण इंगोले.
टाळ/कोरस..आरोही बिरादार,कशी शिंबरे,प्रतिक इंगोले,
कोरस...
कॅमेरा शुटींग.. श्री रामकृष्ण इंगोले.
****************************************************
आयोजक ...गीतार्थ पाठ,
माऊली पार्क,करवाधर्मशाळेजवळ ,चाकण रोड,हनुमानवाडी केळगाव ,आळंदी.मो.9823150559.
****************************************************