Рет қаралды 166
लळिंग किल्ला
पूर्व- पश्चिम गेलेल्या गाळणा टेकड्यांवर किल्ले लळिंग आहे. त्याची समुद्र सपाटीपासूनची उंची 593 मीटर आहे. किल्ल्याच्या अवशेषांची पडझड झाली आहे. 13 व्या शतकात फारुकी राजवटीत हा किल्ला अत्यंत महत्त्वाचा होता. त्यानंतर मोगल, निजाम, मराठे आणि इंग्रजांनी किल्ल्यावर राज्य केले. दुर्गस्थापत्यात मोगल शैलीचा वापर केलेला दिसून येतो. किल्ल्यावर पाण्याचे टाके, धान्य कोठार आहेत. पायथ्यापासून जवळच असलेला लहानसा घुमट पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो.
धुळे- नाशिक मार्गावर, धुळे शहरापासून दक्षिणेला 9 किलोमीटरवर आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी लळिंग गाव आहे. गावातूनच किल्ल्याकडे जाणारी पायवाट जाते. लळिंग गावापासून किल्ल्यावर जाण्यासाठी साधारणत: एक तासाचा कालावधी लागतो. किल्ले लळिंग पाहून झाल्यावर लळिंगचे कुरण, धबधबा (पावसाळ्यात सुरू असतो.) आणि लांडोर बंगला पाहता येईल. या बंगल्यावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1937 मध्ये काही दिवस वास्तव्य केलेले आहे