केवळ अप्रतिम... संपू नये, संपू नये असे वाटत असताना कीर्तन संपल्यावर कमालीची हुरहुर वाटली. ह.भ.प. संजय नाना महाराज धोंडगे, गायक, पखवाज वादक, हार्मोनियम वादक, साथीदार टाळकरी, संयोजक, पारतळे दहिवली ग्रामस्थ..सगळ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार. (गायक आणि पखवाज वादक यांचे अभिनंदन करण्यासाठी शब्दच पुरणार नाहीत). फक्त एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की, अधून मधून दाखवल्या जाणाऱ्या जाहिराती रसभंग करतात. त्याऐवजी फक्त एक-दोन वेळा जाहिराती एकदम दाखवून घेतल्या तर; रसभंग होणार नाही. राम कृष्ण हरी...🙏🙏